Raj Thackeray Allance with NCP : विधानसभेत आघाडीसोबत मनसेचं इंजिन धावण्याची शक्यता

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 21, 2019 | 20:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

Raj Thackeray Allance with NCP : सध्या लोकसभा निवडणुकीचे प्रचार सभा जोरदार सुरू आहेत.  नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे.  मात्र लोकसभानंतर विधानसभा निवडणुकीचे वारे देखील आताच वाहू लागले आहेत. 

Raj thackeray
Raj Thackeray Allance with NCP : विधानसभेत आघाडीसोबत मनसेचं इंजिन धावण्याची शक्यता  |  फोटो सौजन्य: Facebook

Raj Thackeray Alliance with NCP Upcoming Assembly Elections  : लोकसभा निवडणूक २०१९ साठी जोरदार प्रचार सभा सुरू आहेत. यात नेते एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यात मागे पुढे पाहत नाही आहेत. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीतून माघार घेतलेल्या मनसेनं भाजपाला जिंकू न देण्याचा पवित्रा हाती घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचार सभा घेऊन भाजपला मतदान न करण्याच आवाहन महाराष्ट्रातील जनतेला करत आहे. त्यासाठी महाराष्ट्र दौरा करून  राज ठाकरे यांनी सहा सभा घेतल्या. त्यांच्या या  सभेचा पहिला टप्पा नुकताच पार पडला. या सहा सभांमध्ये राज ठाकरे यांनी भाजपची पोलखोल केली. राज ठाकरे यांच्या सभेवर भाजपनं पक्षचिन्ह देखील उपस्थित केलं होतं. मनसेचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी उभा नाही, मग त्यांच्या प्रचार सभा कोणासाठी असा प्रश्न विनोद तावडेंनी उपस्थित केला होता. दरम्यान राज ठाकरे विधानसभेत आघाडीसोबत हातमिळवणी करतील असं भाकित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 

मी भविष्यवाणी करतो,  ही ओपन डील असून येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मनसे युती करेल, असं मुख्यमंत्र्यांनी  एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. एवढंच काय तर राज ठाकरे घेत असलेल्या सभा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी प्रायोजित केलेल्या असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.  मुख्यमंत्री इतकंच बोलून थांबले नाही तर पूर्वी सायकल भाड्याने मिळायची, बस मिळायची आता  शरद पवारांनी इंजिन भाड्यानं घेतल्याचा टोला देखील मनसेला लगावला आहे. 

आम्ही मनसेला गांभीर्यानं घेत नाही कारण ते प्रतिस्पर्धी नाहीत. मनसे नॉन प्लेअर आहेत. जर का आम्ही त्यांचे व्हिडिओ दाखवायला सुरूवात केली तर त्यांना लाज वाटेल असा टोलाही  मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलाखतीत लगावला आहे. 

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांची बाजू सावरून घेतली आहे. मनसेसोबत कोणतीच डिल झाली नसल्याचं छगन भुजबळांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात राज ठाकेर सभा घेत आहेत. हे दोघं देशाला नष्ट करतील म्हणून त्यांच्याविरोधात प्रचार सभा घेत असल्याचं भुजबळांनी सांगितलं. आणि जर का विधानसभा निवडणुकीत मनसे आघाडीत येण्यास इच्छुक असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करू असं म्हणत भुजबळांनी राज ठाकरेंचं इंजिन आघाडीसोबत धावेल असेच स्पष्ट संकेत दिले आहेत. 

तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मनसेसाठी २५ जागा सोडणार असल्याची देखील चर्चा आहे. एवढंच काय तर राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांनी आपला सुपुत्र पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी  राज ठाकरे यांनी देखील सभा घ्यावी अशी मागणी केली होती.

यापूर्वी मनसेला आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसने नकार दिला होता. समविचारी पक्षासोबत आघाडी केली जाते असे काँग्रेसचे वायव्य मुंबईचे उमेदवार संजय निरूपम यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.  त्यानंतर शरद पवार यांनी एपीबी माझाशी बोलताना सांगितले की,  राज ठाकरे यांनी स्पष्ट केले होते की, ते लोकसभा निवडणूक लढविणार नाही. विधानसभेत ते जागा लढविणार आहेत.  काँग्रेसने त्यांना आघाडीत घेण्यास या पूर्वी नकार दिला होता. पण आता हेच काँग्रेसवाले त्यांच्या मतदार संघात राज ठाकरे यांची प्रचार सभा लावण्यासाठी मला विनंती करताहेत असा गौप्यस्फोट पवार यांनी यावेळी केला होता. 

 लोकसभा निवडणुकीत  मनसेला आघाडी घेण्यासाठी नकार देणारे काँग्रेसचे नेते, विधानसभेवेळी यावर आता  काय निर्णय घेतील हेचं पाहावं लागेल.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Raj Thackeray Allance with NCP : विधानसभेत आघाडीसोबत मनसेचं इंजिन धावण्याची शक्यता Description: Raj Thackeray Allance with NCP : सध्या लोकसभा निवडणुकीचे प्रचार सभा जोरदार सुरू आहेत.  नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे.  मात्र लोकसभानंतर विधानसभा निवडणुकीचे वारे देखील आताच वाहू लागले आहेत. 
Loading...
Loading...
Loading...