राज ठाकरेच्या सभांमुळे १२ ते १३ टक्के मतदान फिरू शकते :  धनंजय मुंडे 

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 18, 2019 | 14:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

 Dhananjay Munde on Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उतरविला नसला तरी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात प्रचाराचा धडाका लावला आहे. 

Raj Thackeray rally
राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा  |  फोटो सौजन्य: Facebook

थोडं पण कामाचं

  • राज ठाकरे यांच्या सभांना महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद
  • राज ठाकरे यांच्या सभांचा अप्रत्यक्ष काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा
  • राज ठाकरेंच्या सभांमुळे होणार परिणाम, धनंजय मुंडेचा दावा

बीड :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधातील प्रचाराला महाराष्ट्रातील जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या सभामुळे महाराष्ट्रातील जनतेला सत्यस्थिती कळू लागली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील त्यांच्या प्रचार सभांमुळे एकूण १२ ते १३ टक्के मतदान फिरू शकते, असा अंदाज विधान परिषदेचे विरोध पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. 

परळी जिल्ह्यातील नाथ्रा गावात मतदान केल्यानंतर एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना धनंजय मुंडे यांनी हा दावा केला.  राज ठाकरे यांच्या सभांना महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.  त्यांच्या डिजीटल सभांमुळे हा सूर्य हा जयद्रथ होत आहे. त्यामुळे लोकांची मते बदलण्यात मदत होत आहेत. त्यामुळे एकूण १२ ते १३ टक्के मतदानाचा स्विंग पाहायला मिळू शकतो. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईच्या  गुढीपाडवा सभेपासून मोदी-शहा यांच्या विरुद्ध मोर्चा उघडला आहे. त्यानंतर १२ एप्रिलला नांदेड, १५ एप्रिलला सोलापूर, १६ एप्रिलला कोल्हापूर, १७ एप्रिलला सातारा आणि आज राज ठाकरे यांची पुण्यात सभा आहे. या मागील सभांमध्ये ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशनच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी भाजप सरकारची आणि मोदींच्या खोट्या दाव्यांची पोलखोल केली आहे.  मोदी पाच वर्षांपूर्वी काय बोलले होते आणि आता त्यांची काय भूमिका आहे. याचे व्हिडिओच ते जनतेला आपल्या भाषणात दाखवत आहेत. 

या सभांमुळे भाजप-सेना युतीला मोठा फटका बसताना दिसत आहे. तशा प्रतिक्रिया या भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडून येत आहेत. या राज ठाकरे यांच्या 'ए लाव रे तो व्हिडिओ' वरूनही सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात मिम्स तयार करण्यात येत आहेत. 

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला इतक्या जागा... 

सध्याचे वातावरण पाहता काँग्रेस राष्ट्रवादीला महाराष्ट्रात चांगले यश मिळण्याची शक्यता यावेळी धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली.  लोकांमध्ये सरकार विरोधी मत तयार झाले आहे. त्यामुळे एकूण विविध सर्वेंचा विचार करता, महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला एकूण २९ जागा मिळू शकतात, असा दावा धनंजय मुंडे यांनी यावेळी केला. 

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
राज ठाकरेच्या सभांमुळे १२ ते १३ टक्के मतदान फिरू शकते :  धनंजय मुंडे  Description:  Dhananjay Munde on Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार उतरविला नसला तरी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात प्रचाराचा धडाका लावला आहे. 
Loading...
Loading...
Loading...