VIDEO: राज ठाकरेंनी 'अशी' केली मोदी सरकारची पोलखोल

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 19, 2019 | 21:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

Raj Thackeray on Modi Government: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथे जाहीर सभा घेतली. या सभेतही राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत भाषण करत मोदी सरकारवर टीका केली आहे.

Raj thackeray expose modi government scheme
'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत मोदी सरकारची पोलखोल  |  फोटो सौजन्य: Facebook

मुंबई: मोदी आणि भाजप सरकार विरोधात प्रचार करण्यासाठी लोकसभा निवडणुकांत राज ठाकरे आपल्या राज्यभरात प्रचारसभा घेत आहेत. राज ठाकरेंच्या पहिल्या टप्प्यातील शेवटची सभा रायगडातील महाड येथे पार पडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडमधील आपल्या जाहीर सभेत मोदी सरकारवर निशाणा साधत टीका केली आहे. इतकचं नाही तर मोदी सरकारच्या योजना कशा फसल्या आहेत हे दाखवत पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आहे. पाहूयात राज ठाकरे यांनी रायगड येथे झालेल्या जाहीर सभेत कशा प्रकारे मोदी सरकारची पोलखोल केली आहे. राज ठाकरेंच्या जाहीर सभेचं अनकट भाषण पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.

राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी आपल्या जाहीर सभेत विदर्भातील हरीसाल या डिजिटल गावाची परिस्थिती दाखवली होती. त्यानंतर आता राज ठाकरेंनी एक खासदार एक गाव या दत्तक योजनेची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आहे. राज ठाकरे यांनी जाहीर सभेत म्हटलं की, पंतप्रधान झाल्यावर मोदींनी एक फतवा काढला की प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घ्यायचं आणि खासदार निधीतून त्या गावाचा विकास करायचा. अशाच प्रकारे मोदींनी एक गाव दत्त घेतलं. मोदींनी दत्तक घेतलेल्या या गावाची काय परिस्थिती आहे त्याचं विदारक चित्र राज ठाकरेंनी व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून दाखवलं. मोदींनी गाव दत्तक घेतलं मात्र, या गावात कुठलंचं काम झालं नाही, दूषित पाण्याची समस्या आहे. नाल्याचा प्रश्न आहे. जे गाव मोदींनी दत्तक घेतलं त्याकडे पाहू शकले नाही तर तुमच्याकडे कसे पाहतील असेही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

यानंतर राज ठाकरे यांनी देशातील पहिलं डिजिटल गाव अशी जाहिरात करण्यात आलेल्या धसई गावाची स्थिती दाखवली. नोटबंदी नंतर सरकारने कॅशलेस व्यवहार करण्यावर भर देण्यास सांगितलं. त्यानंतर महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात असलेल्या मुरबाड तालुक्यातील धसई हे गाव देशातील पहिलं डिजिटल गाव असं जाहीर करण्यात आलं. मात्र, या या गावात आता कॅशलेस व्यवहार होत नसल्याचं राज ठाकरेंनी व्हिडिओतून दाखवलं. कारण, या गावात कॅशलेस गाव काय असतं हे लोकांना माहितीच नाहीये. या गावात एकही व्यवहार रोखी शइवाय होत नाहीये असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रातील अमोल यादव याला विमान प्रकल्पासाठी सरकारने दिलेलं आश्वासन, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, नोटबंदी, हरीसाल डिजिटल गाव, एक खासदार एक दत्तक गावाची योजना, देशातील पहिलं कॅशलेस गाव यासारख्या विविध विषयांवर राज ठाकरेंनी भाष्य केलं आहे. इतर सभांप्रमाणेच या सभेत सुद्धा राज ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत सरकारी योजनांची पोलखोल केली आहे.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIDEO: राज ठाकरेंनी 'अशी' केली मोदी सरकारची पोलखोल Description: Raj Thackeray on Modi Government: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथे जाहीर सभा घेतली. या सभेतही राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत भाषण करत मोदी सरकारवर टीका केली आहे.
Loading...
Loading...
Loading...