VIDEO: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेतील महत्वाचे मुद्दे

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 23, 2019 | 21:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Raj Thackeray Mumbai rally live: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत जाहीर सभा पार पडली. राज ठाकरे यांची सभा पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.

Raj Thackeray rally live in Mumbai
राज ठाकरेंची मुंबईत जाहीर सभा  |  फोटो सौजन्य: Facebook

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील जाहीर सभेला अखेर परवानगी मिळाली. आज राज ठाकरे यांची सभा मुंबईत पार पडली. मुंबईतील काळाचौकी परिसरात असलेल्या शहिद भगतसिंग मैदानात ही सभा झाली. राज ठाकरे यांनी आपल्या या जाहीर सभेत मोदी सरकारची पोलखोल केली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभा केलेला नाहीये. मात्र, भाजप विरोधात राज ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात जाहीर सभा घेत आहेत. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील पहिला टप्पा नुकताच पार पडला होता. त्यानंतर आता आजपासून राज ठाकरे यांच्या सभांचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या दुसऱ्या टप्प्यात राज ठाकरेंची पहिली सभा मुंबईत पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आता राज ठाकरेंची तोफ मुंबईत धडाडली आहे. पाहूयात राज ठाकरे नेमक्या कुठल्या मुद्द्यांवर भाष्य केलं.

राज ठाकरेंची अनकट सभा पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा

राज ठाकरेंच्या सभेतील महत्वाचे मुद्दे

 1.      संकट या देशावरचं दूर होवो इतकीच मी ईश्वराकडे प्रार्थना करतो
 2.      काळजावर दगड ठेवा पण मोदी आणि शहा ही दोन माणसं या राजकीय क्षितिजावर दिसता कामा नये
 3.      शिवसेनेला मतदान म्हणजे मोदी आणि अमित शहा यांना मतदान करण्यासारखं आहे 
 4.      भाजपला मत देणं म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शहा यांना मतदान करण्यासारखं आहे 
 5.      नोटबंदीची चौकशी केली तर तो देशभरातील सर्वात मोठा घोटाळा ठरेल
 6.      मोदी आणि अमित शहा यांना सांगू इच्छितो तुम्ही आता विरोधीपक्षात जाल आणि तेव्हा ईडीच्या धाड पडतील तेव्हा सर्व समोर येईल
 7.      अटल बिहारी वाजयेयी सरकारच्या काळात कारगिरचं युद्ध झालं मात्र, त्यांनी त्याचं कधी भांडवल केलं नाही
 8.      पुलवामा हल्ल्यानंतर मोदी वेगवेगळे कपडे घालून फिरत होते, असे कपडे घालून फिरणारे मोदी फकीर नाही तर बेफिकीर
 9.      एअर स्ट्राईकच्या नावाने मोदी मत मागत आहेत
 10.      पुलवामातील शहीद जवानांच्या नावाने मत मागत आहेत 
 11.      इतके जवान मारले जात असताना तुम्ही नवाज शरीफांना केक भरवतात मग आम्ही तुम्हाला काय बोलायचं देशप्रेमी की देशद्रोही
 12.      सरकारी कंपनी देशात असताना सुद्धा अनिल अंबानींना कंत्राट दिलं जात. या बद्दल आम्ही बोलायचं नाही का?
 13.      सहाशे कोटींचं विमान देशाने सोळाशे कोटींना खरेदी का केलं?
 14.      अनिल अंबानीने आजपर्यंत कधी विमान बनवलं आहे का?
 15.      ज्या व्यक्तीवर कोट्यावधी रुपयांचं कर्ज आहे अशा व्यक्तीला राफेलचं कंत्राट दिलं जातं 
 16.      जेट एअरवेज प्रकरणात पंतप्रधान, अर्थमंत्र्यांनी मध्यस्थी का नाही केली, का इतक्या लोकांना बेरोजगार केलं
 17.      जेट एअरवेज बंद होण्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत होत्या मग पंतप्रधान या सर्वात का नाही पडले
 18.      जेट एअरवेज बंद झाली, ५० हजार लोक एका रात्रीत बेरोजगार झाले
 19.      नोटबंदी नंतर देशातील उद्योग डबघाईला आले     
 20.      मोदी सरकारच्या काळात जितके बलात्कार झालेत तितके बलात्कार आतापर्यंत झाले नाहीत
 21.      देशातील गुन्हेगारीचे आकडे वाढले आहेत
 22.      मराठमोळा वैमानिक अमोल यादव, ज्याने विमान बनवलं त्याला खोटी आश्वासनं दिली, आता तोच अमोल अमेरिकेत जायला निघालाय
 23.      देशाने तुम्हाला बहुमत दिलं आणि तुम्ही खोटं बोलत राहीलात
 24.      या गोष्टी करण्यासाठी देशाने तुम्हाला बहुमत दिलं?
 25.      किती खोटा प्रचार करणार?
 26.      भाजपच्या आयटी सेलमधील काहीही खोट्या जाहीराती, बातम्या पसरवतात
 27.      जाहीरातीमध्ये फोटो असलेल्या कुटुंबाला व्यासपिठावर बोलावल आणि खोट्या जाहीरातीची केली पोलखोल
 28.      राज ठाकरेंकडून भाजप सरकारची पुन्हा पोलखोल
 29.      या देशातील पत्रकार, चॅनल, वर्तमानपत्र यांना धमक्या देऊन बातम्या थांबवल्या जात आहेत
 30.      श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडला तर मोदी म्हणतात दहशतवाद थांबवायचा असेल तर भाजपला मतदान करा
 31.      संपूर्ण पाच वर्षे मोदींनी खोटा प्रचार केला, खोटी आश्वासनं दिली
 32.      विमानातून प्रवास करत असताना मोदींना कळलं की पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान नवाज शरीफ यांचा वाढदिवस आहे तर ते पाकिस्तानात गेले आणि केक कापला
 33.      जे मनमोहन सिंग यांनी केलं नाही ते मोदींनी केलं
 34.      १९४७ पासून आतापर्यंतच्या इतिहासात आजपर्यंत असं घडलं नव्हतं की, पाकिस्तानच्या पंतप्रधान सांगतो की मला हा व्यक्ती पंतप्रधान पाहिजे
 35.      मुकेश अंबानी सांगतात की मी मिलिंद देवराला मतदान करणार आणि पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत
 36.      एक मोठा उद्योगपती जाहीरपणे सांगतो की मिलिंद देवरा किंवा काँग्रेसला पाठींबा देतो म्हणजे हा संपूर्ण देशाला दिलेला एक मेसेज आहे
 37.      मुकेश अंबानी हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जीवलग मित्र आहेत
 38.      लोकांसमोर जाहीरपणे मुकेश अंबानी यांनी का सांगितलं
 39.      दोन दिवसांपूर्वी बातमी आली की, मुकेश अंबानी यांनी मिलिंद देवरा यांना पाठींबा दिला
 40.      गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभे केले नसते तर तिकडे आज काँग्रेसची सत्ता असती
 41.      २०१४ची लाट आता राहीलेली नाहीये आणि हे आता त्यांना सुद्धा कळलेलं आहे
 42.      पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचं केलेलं कौतुक आणि त्यानंतर आता करत असलेल्या टीका अशा दोन्ही व्हिडिओ क्लिप दाखवल्या 
 43.      शरद पवारांच्या बंगल्यावर जाऊन कुठले खासदार दरवाजे ठोठावतात हे पण सांगा
 44.      हा देश जे प्रश्न विचारतोय त्याची उत्तरं द्या
 45.      कपडे यांचे आम्ही काढले आणि यांना आमचा पोपट दिसला काय?
 46.      मी म्हणे शरद पवारांचा पोपट आहे
 47.      माझ्या सभेनंतर काय उत्तरं द्यायची हे भाजप वाल्यांना कळत नाहीये, त्यामुळे आता ते माझे जुने व्हिडिओ काढत आहेत ज्यामध्ये मी काँग्रेसवर टीका केली होती
 48.      सतत होणाऱ्या सभांमुळे मुख्यमंत्री भांबावले आहेत
 49.      सभेत दोन दिवस विश्रांती घेतली, म्हटलं जर मुख्यमंत्र्यांना पण जरा शांतपणे झोपूदे
 50.      भाषणाच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका
 51.      राज ठाकरेंच्या भाषणाला सुरूवात
 52.      राज ठाकरे यांचं व्यासपीठावर आगमन 

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या सभांचं वेळापत्रक

 1. २४ एप्रिल - भांडुप, मुंबई
 2. २५ एप्रिल - पनवेल
 3. २६ एप्रिल - नाशिक

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIDEO: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुंबईतील सभेतील महत्वाचे मुद्दे Description: Raj Thackeray Mumbai rally live: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत जाहीर सभा पार पडली. राज ठाकरे यांची सभा पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola