VIDEO: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुण्याच्या सभेतील अनकट भाषण

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 19, 2019 | 13:32 IST | टाइम्स नाऊ मराठी

Raj Thackeray Live: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात जाहीर सभा पार पडली. राज ठाकरेंच्या या जाहीर सभेतील संपूर्ण भाषण पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.

Raj Thackeray rally in Pune
पाह राज ठाकरेंची सभा LIVE   |  फोटो सौजन्य: Elle

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील पुण्याची सभा पार पडली. पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील शिंदे मैदानात ही जाहीर सभा झाली आहे. आतापर्यंत झालेल्या राज ठाकरेंच्या सभेत त्यांनी भाजप, अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आता पुण्यातील आपल्या जाहीर सभेतही राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. इतर सभांप्रेमाणेच यावेळी सुद्धा राज ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत मोदींच्या जुन्या भाषणांच्या क्लिप्स दाखवल्या.

नेमकं कुठल्या विषयांवर राज ठाकरेंनी भाष्य केलं ते पाहूयात. राज ठाकरेंच्या सभेचा LIVE व्हिडिओ बातमीच्या खाली पाहा.

पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपने गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने मोहन जोशी यांना उमेदवारी दिली आहे. गिरीश बापट आणि मोहन जोशी या दोन उमेदवारांत थेट लढत होणार असल्याचं दिसत आहे.

राज ठाकरेंच्या सभेतील महत्वाचे मुद्दे:

 1. मोदी आणि शहा यांना या देशाच्या क्षीतिजावर दिसू नका. 
 2. पंतप्रधान आहात तुमच्याकडे बंगला आहेत, तर त्या माऊलीला घेऊ जा आपल्या सोबत, त्यांना पण बरं वाटेल. 
 3. माझी आई पण माझ्या सोबत राहते, मग मी पण शेजारच्या खोलीत जाताना मीडियाला घेऊन जाऊ का. 
 4. स्वतःच्या आईला भेटायलाही जातात ते पण मीडियाला घेऊन जातात. 
 5. देशातील व्यापारी हा जवानापेक्षा साहसी आहेत, हे मोदी सांगतात, का हिम्मत होते पाहा या माणसाची 
 6. जी स्वप्न दाखवली, त्याबद्दल बोलायचे नाही आणि जवानांच्या नावाने मते मागायला किती निर्ढावलेले आहेत. 
 7. ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांच्या नावाने मते मागताहेत. 
 8. जवान मतदानाला उभे आहेत का, त्यांच्या नावावर मते मागतात 
 9. मोदीच्या सरकारमध्येच कसे कर्जबुडवे सोडून फरार होतात. 
 10. मल्ल्या पैसे द्यायला तयार होता, पण त्याला देश सोडून पळून जायला सांगितले. 
 11. भाजपचं केंद्रीय कार्यालय हे सेवन स्टार ऑफिस आहे, अमित शहा म्हणतात असं ऑफिस कुठेही पहायला मिळणार नाही.इतका पैसा भाजपकडे आला कुठून...
 12. इतर राज्यांत निवडणुका झाल्या यावेळी खर्च करण्यात आलेला पैसा भाजपकडे कुठून आला?
 13. रामदेव बाबांवरचा व्यवसाय हजारो कोटींचा कसा झाला. 
 14. योगा योगा सर्व जणांना योगाचं फॅड आलं होतं. देशाचं तंगडं गळ्यात अडकून बसलं ते कसं काढायचं ते कळत नाही. आणि तो रामदेव बाबा अपर डिप्पर मारतोय. 
 15. मोदींनी जे निर्णय घेवून ठेवलेत त्यामुळे देश रसातळाला जाणार
 16. परदेशात जावून मोदींनी मिठ्या मारल्या, पण या मिठ्यांमधून काय मिळालं
 17. परदेशातील राष्ट्राध्यक्षांचं स्वागत केवळ गुजरातमध्ये नेवून केलं
 18. नरेंद्र मोदींना असं कधी वाटलं नाही की बाहेरून आलेल्या राष्ट्राध्यक्षांचं इतर राज्यांत स्वागत करायचं
 19. गुजराती व्यापारी महाराष्ट्रात उद्योग करण्यासाठी का येत आहेत? कारण त्यांना सुद्धा कळलयं की गुजरातने नाही तर महाराष्ट्राने प्रगती केलीय
 20. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हवीय कशासाठी, अहमदाबादला जावून करायचं काय?
 21. मोदीजी देशाला मुर्ख का बनवलं? राज ठाकरेंचा सवाल, बुलेट ट्रेनवरुनही मोदींवर टीका
 22. मोदींनी नवा गव्हर्नर बसवून आरबीआयकडून २८ हजार कोटी पैसे बाहेर काढले, हे पैसे कशासाठी बाहेर काढले?
 23. रिझर्व बँकेतील रिझर्व मधील ३० हजार कोटी रुपये मागितले होते, म्हणून उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला. 
 24. दोन गव्हर्नरांनी राजीनामा दिल्याचं भारताच्या इतिहासात यापूर्वी घडलं नव्हतं - राज ठाकरे
 25. सरकारचं आपल्यावर दडपण येत अस्लयाने राजीनामे देत असल्याचं सांगितलं
 26. आरबीआयचे दोन गव्हर्नरांनी राजीनामे दिले
 27. सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश रस्त्यावर येऊन पत्रकार परिषद घेत सरकारकडून दडपण येत असल्याचं जाहीर करतात
 28. भारताच्या इतिहासात अशा कुठल्या घटना घडल्या नाहीत त्या मोदी सरकारच्या काळात घडत आहेत
 29. नोटबंदीचा निर्णय फसला, नागरिक रस्त्यावर आले.
 30. जेट एअरवेज आज बंद झाली, हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, तुमच्या पर्यंत बातम्या येऊच दिल्या नाहीत. 
 31. तुमच्या मतांसाठी निवडणुकीच्या तोंडावर नव्या गोष्टी उभ्या करायच्या आणि निवडणुकांनंतर तो विषय संपतो
 32. मग, वल्लभभाई यांचा पुतळा आणला कुठून चीन मधूनच ना
 33. सर्व चीनी वस्तूंवर बहिष्कार टाका तो आपला शत्रू आहे असं सांगतात
 34. रात्री दोन लावून यांना चायनीज लागतं - राज ठाकरे
 35. मात्र, डोकलाम हे भूतानमध्ये येतं
 36. युद्धजन्य परिस्थितीचं वातावरणं निर्माण केलं
 37. जे शत्रू राष्ट्र म्हणून आमच्या समोर उभं केलं तेव्हा वर्तमानपत्र आणि वृत्त वाहिन्यांमध्ये एकच होतं ते म्हणजे डोकलाम
 38. आणि मोदी कशावर खर्च करतायत तर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यावर
 39. देश पाण्यासाठी तडफडतोय, नोकऱ्यांंसाठी, उद्योगांसाठी तडफोडतोय
 40. २०१७ आणि २०१८ चे आकडे या सरकारने दाबून ठेवले आहेत. 
 41. २०१६ मध्ये ३८,८९१
 42. २०१५  मध्ये  ३४,६५१ बलात्कार
 43. २०१४ मध्ये ३६७३५ बलात्कार
 44. २०१३ मध्ये ३३७०७ बलात्कार
 45. निर्भया बलात्कार २०१२ रोजी झाला त्यानंतर देशात २४९२२ बलात्कार झाले
 46. दुसऱ्या सरकारच्या काळात बलात्कार झाले तर मोदींनी राजकारण केलं आणि आता म्हणतात राजकारण करु नका
 47. यांच्या काळात बलात्कार झाले तर त्यावर राजकारण करू नका म्हणाले आणि विरोधी पक्षात असताना 
 48. अमित शहांचा मुलगा सोडला तर या देशात कुणाची प्रगती झाली (हशा) 
 49. देशाला जे प्रश्न पडताहेत ते प्रश्न राज ठाकरे आज मोदींना विचारतोय
 50. मोदींकडे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही.
 51. मोदींचे जैन मित्र गोमांस एक्सपोर्ट करतात. 
 52. गोहत्येच्या नावावर देशात ५० ते ६० लोक मारली गेली. 
 53. मोदींंच्या गुजरातमध्ये गोरक्षकांनी कशा प्रकारे नागरिकांना बडवलं आहे हे तुम्हीच पहा म्हणत दाखवली व्हिडिओ क्लिप
 54. त्यावेळी पिछडी जात का नाही आणली तुम्ही
 55. माझा नरेंद्र मोदींना प्रश्न आहे - गेल्या पाच वर्षांत दलितांवर देशात अन्याय झाला त्यावेळी का नाही बोलले तुम्ही
 56. आता जातीचं कार्ड वापरतायत मोदी
 57. पुण्यातील सभेतही मोदींंच्या जातीचे कार्ड वापरणाऱ्या भाषणाची पुन्हा क्लिप सादर
 58. मी खालच्या जातीचा आहे म्हणून आरोप करत असल्याचं मोदींनी भाषेत म्हटलं
 59. काल तर मोदींनी कमालच केली, निवडणुकीत मोदींनी तर जातच काढली
 60. एअर स्ट्राईकचं नाव घेऊन मतं मागत आहेत
 61. निवडणुकीचा प्रचार भलतीकडेच नेला आहे, पुलवामातील शहीदांच्या नावावर मतं मागत आहेत
 62. मात्र, आज निवडून आल्यावर पाच वर्ष होत आहेत मात्र, त्या विषयांवर बोलायला तयार नाही
 63. मी सत्तेत आल्यावर हे करीन ते करीन, मोदींनी देशवासियांचा अपेक्षा भंग केला. 
 64. निवडणुकांपूर्वी या देशातील महिला, तरुणांना, शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासनं दिली
 65. निवडणुकांपूर्वी लोकप्रतिनिधी आपल्यासमोर येतात आणि फक्त भाषण करतात, हेच नरेंद्र मोदी यांनी केलं आहे
 66. रस्ते चांगले व्हावेत हे काम लोकप्रतिनिधींचं आहे मात्र काहीही होत नाहीये
 67. खड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचे बळी जात आहेत
 68. आमच्याकडे रस्त्यावर वाहनं वाढत आहेत, लोकसंख्या वाढत आहे, शाळा नाही, कॉलेजेस नाही, याला टाऊन प्लानिंग म्हणत नाही
 69. देश-विदेशात फिरताना लक्षात येतं की, त्या शहरांचाही विकास होत आहे आमच्या शहरांसारखी भकास होत नाहीयेत
 70. माझ्या लहानपणी पुणे टुमदार होतं. आता बकाल झालं आहे पुणे... 
 71. येथे आल्यावर रमेश वांजळेची आठवण येते, माझा वाघ गेला. आज या ठिकाणी हवा होता. 
 72. मला अनेकांनी विनंती केली की ४ सभा या उत्तर भारतात द्या. 
 73. भाषणातील क्लीप या हिंदीत आहे, त्यामुळे उत्तर भारतीयांनाही कळतं
 74. मला बरं वाटलं लोकांना मराठी कळतंय 
 75. माझ्या भाषणाच्या क्लिप देशभर फिरतोय 
 76. माझ्या भाषणाचा प्रचार देशभर होतोय 
 77. मनसे लोकसभा निवडणूक लढवत नाही
 78. राज्यात अजून ४ सभा घेणार 
 79. देशातील १७ व्या लोकसभेच्या निवडणूक सुरू आहे. 
 80. शहरातून मार्ग काढत काढत सभेच्या ठिकाणी आलो
 81. राज ठाकरेंच्या भाषणाला सुरूवात
 82. राज ठाकरे यांचं व्यासपिठावर आगमन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार विरोधात प्रचार करण्यासाठी आपला महाराष्ट्र दौरा आखला आहे. या दौऱ्यात राज ठाकरे विविध ठिकाणी आपल्या जाहीर सभा घेत आहेत. राज ठाकरे यांच्या आतापर्यंत नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत सभा झाल्या आहेत. आज राज ठाकरेंची पुण्यात सभा पार पडली. यानंतर १९ एप्रिल रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथे होणार आहे.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIDEO: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुण्याच्या सभेतील अनकट भाषण Description: Raj Thackeray Live: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात जाहीर सभा पार पडली. राज ठाकरेंच्या या जाहीर सभेतील संपूर्ण भाषण पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.
Loading...
Loading...
Loading...