भाजपनं उडवली राज ठाकरेंची खिल्ली, मुंबईत ‘लाव रे फटाके, वाजव रे ढोल’चे पोस्टर

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 23, 2019 | 16:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

राज ठाकरेंच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ची भाजपनं खिल्ली उडवली आहे. मुंबईत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ‘लाव रे फटाके, वाजव रे ढोल’चे पोस्टर लावले आहेत. तसंच सोशल मीडियावरही राज ठाकरेंची खिल्ली उडवली जात आहेत.

BJP Poster
भाजपनं उडवली राज ठाकरेंची खिल्ली 

मुंबई: लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर व्हायला सुरूवात झालीय. देशासोबतच भाजप-शिवसेना युतीला राज्यातही मोठा विजय मिळताना दिसतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीसाठी राज्यात तब्बल १० ठिकाणी सभा घेतल्या. आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली. ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत राज ठाकरेंनी सरकारच्या योजनांचा फडशा पाडला. राज ठाकरेंच्या या सभांना जनतेची प्रचंड गर्दी बघायला मिळाली. तसंच सोशल मीडियावर त्यांचा ‘लाव रे तो व्हिडिओ’ खूप गाजला. मात्र राज ठाकरेंच्या या सभांचा काही उपयोग झाल्याचं दिसून येत नाहीय. मात्र आता राज ठाकरेंची भाजपनं खिल्ली उडवली आहे.

मुंबईत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शहरातील काही ठिकाणी ‘लाव रे फटाके... वाजव रे ढोल...’ असे पोस्टर लावले आहेत. या पोस्टरमधून लाड यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवलीय. राज ठाकरेंच्या “लाव रे तो व्हिडिओ”ला हे प्रत्युत्तर मानलं जातंय.

 

 

 

 

 

 

एव्हढंच नव्हे तर राज ठाकरे यांची खिल्ली उडवणारे अनेक मीम सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कुणी राज ठाकरे झोपून उठले की नाही, असं विचारत आहेत. तर राज ठाकरेंना दुसऱ्यांच्या लग्नात जाऊन नाचण्याचा काय परिणाम होतो हे कळलं असेल, असं काही जण म्हणतायेत.

राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत केलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रचारावर आता अनेक जण मजा घेतांना दिसतायेत. 

काय घडलं लोकसभा निवडणुकीत

एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसताना राज ठाकरेंनी लोकसभेच्या प्रचारासाठी सभा घेतल्या आणि या सभांना नागरिकांनी मोठी गर्दी केली. राज ठाकरेंनी या जाहीर सभांमधून 'लाव रे व्हिडिओ' म्हणत विविध व्हिडिओ दाखवले. मोदींच्या जुन्या भाषणाच्या क्लिप्स, मुलाखतीमधील काही क्लिप्स, वृत्तपत्रातील बातम्या, फोटोज दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप सरकारच्या योजनांवर हल्ला चढवला. याच 'लाव रे व्हिडिओ' ची संपूर्ण महाराष्ट्रात आणि सोशल मीडियात जोरदार चर्चा पहायला मिळाली. 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
भाजपनं उडवली राज ठाकरेंची खिल्ली, मुंबईत ‘लाव रे फटाके, वाजव रे ढोल’चे पोस्टर Description: राज ठाकरेंच्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ची भाजपनं खिल्ली उडवली आहे. मुंबईत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ‘लाव रे फटाके, वाजव रे ढोल’चे पोस्टर लावले आहेत. तसंच सोशल मीडियावरही राज ठाकरेंची खिल्ली उडवली जात आहेत.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles