VIDEO: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची रायगडातील जाहीर सभा अनकट

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 19, 2019 | 20:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा रायगडातील महाड येथे पार पडली आहे. राज ठाकरेंच्या जाहीर सभेतील अनकट भाषण पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.

MNS Chief Raj Thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे  |  फोटो सौजन्य: Facebook

रायगड: लोकसभा निवडणूक प्रचारात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज रायगडमध्ये जाहीर सभा पार पडली. रायगड जिल्ह्यातील महाड येथील चांदे मैदानात ही सभा झाली आहे. राज ठाकरे हे मोदी आणि भाजप सरकार विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार सभा घेत आहेत. आतापर्यंत नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात राज ठाकरे यांच्या सभा झाल्या आहेत. त्यानंतर आता रायगडात राज गर्जना झाली.

रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने अनंत गीते यांना उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील तटकरे यांना उमेदवारी दिली आहे. पाहूयात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात कुठल्या मुद्द्यांवर भाष्य केलं.

राज ठाकरेंच्या सभेचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

 1.      भाजपवाले निवडणुकांत पैसे वाटत आहेत, भाजपकडून पैसा आला कुठून
 2.      या मोदी आणि अमित शहा यांना नेमकं घडवायचं काय होतं?
 3.      स्टार्ट अप इंडियाचंही काही घडलं नाही
 4.      मेक इन इंडिया चं काहीही घडलं नाही
 5.      सरकारने अमोल यादवला आश्वासन दिलं आणि ३५ हजार कोटी गुंतवण्याचं आश्वासन दिलं
 6.      मेक इन इंडियाचं काय झालं?
 7.      गेली पाच वर्षे हा देश केवळ दोनच माणसं चालवत आहेत
 8.      मोदींसारखी माणसं सत्तेत बसली तर बघायलाच नको
 9.      स्वत:च्या आयुष्यात गुंतलेले असतात ते तुमच्याकडे कुठे पाहतील
 10.      धादांत खोटं बोलणारा माणूस देशातील सर्वोच्च स्थानावर बसला आहे, 
 11.      सह्याद्रीच्या रांगेकडे पहायला कुणाकडे वेळ नाहीये
 12.      बाजुच्या गोव्यात इतकी क्षमता आहे त्यापेक्षा जास्त कोकणात आहे
 13.      इतकी ताकद आहे कोकणात
 14.      परदेशी पद्धतीने कोकणाचा विकास केला तर फक्त कोकण हे महाराष्ट्र जगवू शकतं
 15.      नुकते रस्ते होणं म्हणजे प्रगती होणं नाही
 16.      केरळ आणि कोकणाची तुलना केली तर कोकण निर्सगाच्या बाबतीत खूप पुढे आहे
 17.      टूरिझम हा त्यांच्या उत्पन्नाचा महत्वाचा भाग आहे
 18.      केरळ कशावर सुरू आहे तर टूरिझम वर
 19.      केरळ सुद्धा आपल्या कोकणासारखचं आहे
 20.      या लोकांना सामान्यांशी काही देणघेणं नाहीये
 21.      पण योग्य वेळ आली की युती करतील हे मी आधीच म्हटलं होतं
 22.      कारण खोट्या डरकाळ्या त्या वेळी फोडल्या होत्या
 23.      युती होणार नाही असं सर्वांना वाटत होतं
 24.      युतीमधील शिवसेना आणि भाजप दोघांनी दोन महिन्यांपूर्वी एकमेकांना शिव्या घातल होते
 25.      तुम्ही झालेल्या गोष्टी विसरता म्हणून ही लोक तुम्हाला फसवतात
 26.      मोदींना वाटलं की आपण बोलतो ते कोणाच्या लक्षात राहणार नाही, पण ते इंटरनेटवर असतं हे त्यांच्या लक्षात राहिलं नाही ते रेकॉर्ड होतंय
 27.      आता तुमच्यासमोर जे लोक प्रचाराला येतात, त्यांनी जर खोटं बोललो तर पुन्हा पाच वर्षांनी लाव रे तो व्हिडिओ आहेच. 
 28.      नाशिकमधील प्रेझेंटेशनमुळे अशा प्रकारचा प्रचार करण्याची कल्पना सुचली होती. 
 29.      आता त्या गोष्टी त्यांनी काढयला सुरूवात करत आहे. पण आम्ही सहा महिन्यापूर्वीच त्या काढू ठेवल्या होत्या. 
 30.      मोदींचे भक्त 'नमोरुग्ण' गेली पाच वर्ष ते व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर ढकलताहेत. 
 31.      काही व्हिडिओ सातत्याने दाखवत आहे. 
 32.      काही पाहिल्या की नाही सभा असे उपस्थितांना विचारला
 33.      मुंबईहून अजून चार सभा घेणार 
 34.      महाडच्या पहिल्या टप्प्यातील शेवटची सभा 
 35.      राज ठाकरेंच्या भाषणाला सुरूवात 
 36.      राज ठाकरेंचं व्यासपीठावर आगमन
लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIDEO: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची रायगडातील जाहीर सभा अनकट Description: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा रायगडातील महाड येथे पार पडली आहे. राज ठाकरेंच्या जाहीर सभेतील अनकट भाषण पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा.
Loading...
Loading...
Loading...