LIVE रामटेक लोकसभा निवडणूक २०१९  : शिवसेनेचे कृपाल तुमाणे विजयी

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 23, 2019 | 22:27 IST | टाइम्स नाऊ मराठी

रामटेक लोकसभा मतदार संघातून शिवसेनेने यंदा पुन्हा विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे, तर त्यांच्या विरूद्ध काँग्रेसने माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना रिंगणात उतरविले आहे. 

ramtek loksabha election results 2019
रामटेक लोकसभा निवडणूक निकाल २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

रामटेक :  नागपूर जिल्ह्याचा भाग असलेल्या रामटेक मतदार संघात आतापर्यंत १९५७ पासून १२ वेळा काँग्रेसने विजय मिळविला आहे. तर चार वेळा शिवसेनाने बाजी मारली आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात शिवसेनेने विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना संधी दिली आहे. तर आतापर्यंत विविध निवडणुकांमध्ये अपक्ष लढणाऱ्या किशोर गजभिये यांना काँग्रेसने आपल्या पक्षात सामील करून उमेदवारी दिली आहे.  या दोघांविरूद्ध गेल्या निवडणुकीत बसपच्या तिकीटावर निवडणूक लढविणाऱ्या किरण पाटणकर यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आहे. 

LIVE UPDATES

  1. शिवसेनेचे कृपाल तुमाणे विजयी
  2. कृपाल तुमाणे, शिवसेना 30486 मतांनी आघाडीवर
  3. कृपाल तुमाणे, शिवसेना 14771 मतांनी आघाडीवर
  4. कृपाल तुमाणे, शिवसेना 12991 मतांनी आघाडीवर
  5. कृपाल तुमाणे, शिवसेना 9651 मतांनी आघाडीवर
  6. कृपाल तुमाणे, शिवसेना 10167 मतांनी आघाडीवर
  7. कृपाल तुमाणे, शिवसेना ५४३५ मतांनी आघाडीवर
  8. टपाल मतमोजणीला सुरूवात
  9. थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

टाइम्स नाऊ मराठीचा ग्राऊंड 'सेंटी'मीटर रिपोर्ट

काँग्रेसचा बाल्लेकिल्ला असलेल्या रामटेक मतदार संघात शिवसेनेने १९९९ मध्ये शिरकाव केला. त्यानंतर सलग तीन निवडणुका जिंकल्या. मधला २००९ मध्ये काँग्रेसच्या मुकुल वासनिक यांनी विजय मिळविल्यानंतर मागील निवडणुकीत पुन्हा शिवसेनेचे मोठ्या फरकाने या मतदार संघात विजय मिळविला.  मोदी लाटेवर स्वार होऊन कृपाल तुमाने यांनी मुकूल वासनिक यांना सुमारे १ लाख ७५ हजार मतांनी पराभव केला. पण आता परिस्थिती तशी नाही.  काँग्रेसने आपला संपूर्ण जोर या मतदार संघात लावला आहे. 

कृपाल तुमाने यांच्या बाजूने एक गोष्ट म्हणजे उमेदवारी जाहीर होताना काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजीचे वारे वाहू लागले होते. अनेक निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीचा सूर होता. काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांनी काँग्रेसकडून अर्ज भऱण्याचा प्रयत्न केला पण त्यांना एबी फॉर्म न मिळाल्याने ते तो अर्ज भरू शकले नाहीत. त्यामुळे ही नाराजी गजभिये यांना महागात पडू शकते. राऊत यांना आमदार सुनील केदार यांचा पाठिंबा असल्याने त्या ठिकणीही अडचण होऊ शकते.  हे बंड वरून क्षमल्यासारखं वाटतं आहे पण मतदानावेळी दोन्ही काँग्रेस नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

तसेच कृपाल तुमानेच्या विरोधातील गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांची नाराजी, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नोटबंदीच्या काळात आपल्या माला कवडीमोल भावाने विकावे लागले होते. ती नाराजी अजून शेतकऱ्यांमध्ये आहे. ती त्यांनी बोलूनही दाखवली आहे.  रामटेक मतदार संघाचा म्हणावा तसा विकास झाला नाही.  त्यामुळे मतदारांची नाराजी कृपाल तुमाने यांना भोवू शकते. 

(टाइम्स नाऊ मराठीने वरील लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. त्यानुसार हा अंदाज वर्तविण्याचा प्रयत्न आहे. ) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
LIVE रामटेक लोकसभा निवडणूक २०१९  : शिवसेनेचे कृपाल तुमाणे विजयी Description: रामटेक लोकसभा मतदार संघातून शिवसेनेने यंदा पुन्हा विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांना उमेदवारी दिली आहे, तर त्यांच्या विरूद्ध काँग्रेसने माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांना रिंगणात उतरविले आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola