वडिलांवर टीका करणाऱ्या पियूष गोयल यांना अभिनेता रितेश देशमुखने दिलं सडेतोड उत्तर

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 14, 2019 | 17:37 IST | टाइम्स नाऊ हिंदी

मुंबईत झालेल्या २६/११ हल्यासंदर्भात भाष्य करुन तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या पियूष गोयल यांना रितेश देशमुखने सोशल मीडियाच्या माध्यमातुन उत्तर दिलं आहे.

Bollywood Actor Ritesh Deshmukh
अभिनेता रितेश देशमुख   |  फोटो सौजन्य: IANS

मुंबई: मुंबईवर २६/११ हल्ला झाला त्यावेळी स्वर्गीय विलासराव देशमुख हे तत्कालीन मुख्यमंत्री होते. त्यावेळी ते आपला मुलगा रितेश याला चित्रपटात संधी मिळवुन देण्यातच जास्त मग्न होते, असा गंभीर आरोप करत भाजपा नेते पियूष गोयल यांनी काँग्रेसवर निशाना साधला आहे. पियूष गोयल यांच्या या आरोपांना आता रितेश देशमुख याने उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार हा प्रत्येकाला असतो पण अशा व्यक्तिवर आरोप करणं चुकीचे आहे जी स्वतःचा बचाव करण्यासाठी आता या जगात नाहीये.

सोमवारी पंजाबमधील लुधियानामध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते पियूष गोयल यांनी २६/११ मुंबई हल्ल्याचा संदर्भ देत दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर निशाना साधत काँग्रेसवर टीका केली आहे. २६/११ मुंबई हल्ल्याची आठवण करून देत गोयल म्हणाले, तत्कालीन काँग्रेस सरकार ही दुबळी सरकार होती, एकीकडे गोळ्या झाडल्या जात होत्या तर दुसरीकडे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ओबेरॉय होटलच्या बाहेर एका चित्रपट निर्मात्याला घेवुन आले होते. त्यांना देशाच्या सुरक्षेपेक्षा आपल्या मुलाला चित्रपट मिळवुन देण्यात जास्त रस होता. आपलं सैन्य सडेतोड उत्तर देण्यास तेव्हाही सक्षम होतं पण निर्णय नेतृत्वाला घ्यायचा होता. लष्कराला अशी आशा होती की त्यांना प्रतिउत्तर देण्याचे आदेश दिले जातील पण त्यांना कोणतीही परवानगी मिळाली नाही. काँग्रेस सरकार हे भ्याड सरकार होतं. 

रितेश देशमुख म्हणतो...

दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेते रितेश देशमुख याने ट्विटरवरुन या टीकेला उत्तर दिलं आहे. रितेश देशमुख यांनी ट्विट करत म्हटलं, "मंत्री महोदय हे सत्य आहे, मी ताज हॉटेलमध्ये गेलो होतो. पण खोटं आहे की त्यावेळी गोळीबार, हातगोऴे फेकले जात होते. तेव्हा मी तेथे होतो असा दावा आपण करत आहात. हे सत्य आहे की, माझे वडील विलासराव देशमुख यांच्यासोबत मी घटनास्थळी गेलो होतो. पण हे खोटे आहे की, ते मला चित्रपटामध्ये रोल मिळवुन देण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांनी कधीही कोणत्याही निर्माता किंवा दिग्दर्शकाला मला सिनेमात घेण्यास सांगितले नाही, याचा मला अभिमान आहे.

मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार हा प्रत्येकाला असतो पण अशा व्यक्तिवर आरोप करणं चुकीचे आहे जी स्वतःचा बचाव करण्यासाठी आता हयात नाहीये असंही रितेश देशमुख याने म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी