तुम्हाला विवस्त्र करून उलटं टांगत १५-२० पुरूष बेल्टने मारत असतील तर काय कराल?: साध्वी

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 21, 2019 | 08:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

 मुंबईत २६/११ हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याविरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

sadhavi pradyana singh
साध्वी प्रज्ञा सिंह  |  फोटो सौजन्य: Twitter

भोपाळ :  मुंबईत २६/११ हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याविरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तर भाजपनेही त्यांचे हे वक्तव्य वैयक्तिक असल्याचे म्हणून काढता पाय घेतला आहे. 
 
 प्रज्ञा सिंह यांनी या वक्तव्यानंतर माफी मागितली असली तरी आता त्यांनी स्वतःवर झालेल्या अन्यायाबाबत प्रतिप्रश्न करण्यास सुरूवात केली आहे. एका महिला पत्रकाराने साध्वीला या बाबत प्रश्न विचारला,  दहशतवाद्यांच्या गोळीने किंवी विदेशीच्या गोळीने जे मृत पावतात त्यांना आपोआप शहीदाचा दर्जा मिळतो, मी माफी मागितली आहे. पण माझा जो ९ वर्ष छळ जाला आहे, त्या लोकांकडून तुम्ही माफी मागवू शकता का?  जर तुम्हांला १५ ते २० पुरूष बेल्टने मारहाण करत असतील नंतर तुम्हांला विवस्त्र करून उलटं टांगून ठेवत असतील तर तुम्ही काय करणार? असा प्रति प्रश्न महिला पत्रकाराला केला.  

साध्वीने मागितली माफी... 

मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि भाजपच्या भोपाळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकरू यांनी दिवंगत एटीएस प्रमुख शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या संतापजनक वक्तव्याची माफी मागितली आहे.  त्या म्हणाल्या की, हेमंत करकरे यांना मी शाप दिला होता, म्हणून दहशतवादी हल्ल्यात त्यांचा सर्वनाश झाला. 

गुरूवारी भोपाळमध्ये झालेल्या एका प्रचार सभेत साध्वीने हे विधान केले होते. त्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर साध्वीने माफी मागितली, माझ्या या वक्तव्याचा देशाच्या शत्रूंना फायदा होतोय असे मला वाटत आहे, त्यामुळे माझे वक्तव्य मागे घेऊन माफी मागते. 

दिग्गीराजांविरूद्ध साध्वी असा सामना... 

भारतीय जनता पक्षाने भोपाळ मतदार संघातून मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग यांच्या विरूद्ध साध्वीला रिंगणात उतरविला आहे.  साध्वीने प्रज्ञा सिंह हिने बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच तिची उमेदवारी जाहीर करण्यात आली. आता शहीद करकरेंबाबत विधान करून साध्वीने अडचणीत वाढ करून घेतली आहे.

मोदींकडून साध्वीच्या उमेदवारीचे समर्थन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना दिलेल्या उमेदवारीचे जोरदार समर्थन केले आहे. टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी साध्वींची पाठराखण केली आहे. कोर्टाने त्यांना क्लिनचीट दिली आहे, त्यामुळे त्या आता जामीनावर आहेत. तसेच काँग्रेसचे रायबरेलीतील उमेदवार आणि अमेठीचे उमेदवारही जामीनावर बाहेर आहेत. ते निवडणूक लढू शकतात आणि साध्वी का लढू शकत नाही. 

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
तुम्हाला विवस्त्र करून उलटं टांगत १५-२० पुरूष बेल्टने मारत असतील तर काय कराल?: साध्वी Description:  मुंबईत २६/११ हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याविरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
Loading...
Loading...
Loading...