VIDEO: साध्वी प्रज्ञाने हेमंत करकरे यांच्याबाबत केलं वादग्रस्त वक्तव्य

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 19, 2019 | 15:09 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Sadhvi Pragya on Hemant Karkare: मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञाला भाजपने भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या जागेवर १९८९ पासून भाजपचं वर्चस्व राहीलं आहे.

Sadhvi pragya singh thakur comment on Hemant Karkare
भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञा  |  फोटो सौजन्य: ANI

भोपाळ: लोकसभा निवडणुकीत भाजपने हाय प्रोफाइल अशा भोपाळ लोकसभा मतदारसंघातून मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वीला उमेदवारी दिली आहे. साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी दिल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले तर भाजपतर्फे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न होत आहे. काही दिवसांपूर्वीच साध्वी प्रज्ञाने भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर पक्षाने त्यांना भोपाळ लोकसभेतून उमेदवारी दिली. उमेदवारी मिळाल्यापासून साध्वी प्रज्ञा खूपच चर्चेत आल्या आहेत. साध्वी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत आहे आणि मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी म्हणून असलेला आरोप पुसण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, याच दरम्यान साध्वी प्रज्ञा यांनी एटीएसचे माजी प्रमुख हेमंत करकरे यांच्या संदर्भात एक वादग्रस्त आणि धक्कादायक असं वक्तव्य केले आहे.

गुरूवारी साध्वी प्रज्ञा आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होत्या. त्याच दरम्यान त्यांनी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. हेमंत करकरे हे एटीएस प्रमुख होते आणि मालेगाव बॉम्ब स्फोटाचा तपास करत होते. याच प्रकरणात साध्वी प्रज्ञा आरोपी आहे आणि या प्रकरणी साध्वीने कारागृहात शिक्षा भोगली आहे. २५ नोव्हेंबर २००८ साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे शहीद झाले. सर्वच भारतवासी हेमंत करकरे यांना हिरो म्हणून संबोधतात. मात्र, याच भारताच्या हिरों बाबत साध्वी यांनी अपमानास्पद आणि वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी आपल्यासोबत मला प्रचंड त्रास दिला असं सांगत साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं की, "मी म्हटलं होतं तुमचा सर्वनाश होईल. मी जेलमध्ये गेले तेव्हा त्यांच्या घरी सुतक लागलं होतं आणि ठिक सव्वा महिन्याने ज्या दिवशी दहशतवाद्यांनी त्यांना मारलं त्यावेळी त्यांचं सुतक संपलं".

कार्यकर्त्यांना संबोधित करताना साध्वी प्रज्ञा यांनी काँग्रेस पक्षावर सुद्धा हल्लाबोल केला आहे. काँग्रेस पक्षा हिंदूंना दहशतवाद्यांसोबत जोडत त्यांचा अपमान करत असल्याचा आरोप साध्वी प्रज्ञा यांनी केला आहे. इतकचं नाही तर काँग्रेसच्या इशाऱ्यावर एका महिलेला त्रास देण्यात आला असंही साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIDEO: साध्वी प्रज्ञाने हेमंत करकरे यांच्याबाबत केलं वादग्रस्त वक्तव्य Description: Sadhvi Pragya on Hemant Karkare: मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञाला भाजपने भोपाळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या जागेवर १९८९ पासून भाजपचं वर्चस्व राहीलं आहे.
Loading...
Loading...
Loading...