सकाळच्या एक्झिट पोलमध्ये युतीला फटका, आघाडीचा फायदा

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 19, 2019 | 19:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

सकाळ माध्यम समूहाने केलेल्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातील ४८ मतदार संघात सर्वे करण्यात आला.  

SAKAL EXIT POLL
सकाळचा महाराष्ट्रातील एक्झीट पोल   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई :   सकाळ माध्यम समूहाने महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात सर्वे घेण्यात आला. यात सॅम्पल सर्वे घेण्यात आला. त्यात सकाळच्या वार्ताहरांच्या मदतीने हा सर्वे करण्यात आला. या सर्वेत आलेल्या निकालानुसार भाजप-युती फटका बसताना दिसत आहे. तर राष्ट्रवादी-काँग्रेस यांना मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसत आहे.  भाजपला गेल्या निवडणुकीत २२ जागा होत्या. शिवसेनेला १८ जागा, काँग्रेस २, राष्ट्रवादी काँग्रेस ५, शेतकरी संघटना १ यांना जागा होत्या. 

पण यंदा सकाळने केलेल्या सर्वेक्षणात यंदा भाजपला १९, शिवसेना १०, काँग्रेस ८, राष्ट्रवादी ८ आणि इतर ३ जागा मिळतील.  गेल्या निवडणुकीचा विचार करताना भाजपला ४ जागा तर शिवसेनेला ८ जागांचा फटका आहे. तर काँग्रेसला ६ जागांचा फायदा आहे, तर राष्ट्रवादीला ३ जागांचा आणि इतर २ जागांची फायदा दिसत आहे. 

महाराष्ट्रातील ४८ जागा 

 1. भाजप - १९ 
 2. शिवसेना - १०
 3. काँग्रेस - ०८ 
 4. राष्ट्रवादी काँग्रेस - ०८
 5. इतर - ०३ 

त्यात विदर्भात २०१४ मध्ये १० पैकी १० जागा जिंकणाऱ्या भाजप-सेना युती यांना फटका बसताना दिसतो आहे. यात सर्वाधिक फटका हा शिवसेनेला बसताना दिसत आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या पोट निवडणूक भंडारा गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला आहे. त्यामुळे आता ९-१ अशी स्थिती आहे. 

सकाळच्या विदर्भातील १० जागांचा एक्झीट पोलवर नजर टाकली असता. यात भाजपला ४, शिवसेना ०, राष्ट्रवादी काँग्रेस ३ आणि काँग्रेस ३ अशी परिस्थिती यंदाच्या निवडणुकीत होणार असल्याचे अंदाज या एक्झीट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. 


विदर्भातील १० जागा 

 1. भाजप - ०४ 
 2. शिवसेना - ००
 3. काँग्रेस - ०३ 
 4. राष्ट्रवादी काँग्रेस - ०३ 

मराठवाड्यातील एक्झीट पोलबाबत बोलायचे झाले तर  मराठवाड्यात भाजपला ३, शिवसेनेला २, काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला २ जागा मिळू शकतात. 

मराठवाड्यातील ८ जागा 

 1. भाजप - ०३ 
 2. शिवसेना - ०२
 3. काँग्रेस - ०१ 
 4. राष्ट्रवादी काँग्रेस - ०२  

उत्तर महाराष्ट्र ८ जागा 

 1. भाजप - ०५ 
 2. शिवसेना - ०१
 3. काँग्रेस - ०२ 
 4. राष्ट्रवादी काँग्रेस - ००

पश्चिम महाराष्ट्रातील १० जागा 

 1. भाजप - ०४ 
 2. शिवसेना - ०१
 3. काँग्रेस - ०० 
 4. राष्ट्रवादी काँग्रेस - ०४
 5. इतर - ०१    

कोकणतील ६ जागा 

 1. भाजप - ०१ 
 2. शिवसेना - ०४
 3. काँग्रेस - ०० 
 4. राष्ट्रवादी काँग्रेस - ०१ 

 

मुंबईतील ६ जागा 

 1. भाजप - ०२
 2. शिवसेना - ०२
 3. काँग्रेस - ०२ 
 4. राष्ट्रवादी काँग्रेस - ०० 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सकाळच्या एक्झिट पोलमध्ये युतीला फटका, आघाडीचा फायदा Description: सकाळ माध्यम समूहाने केलेल्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रातील ४८ मतदार संघात सर्वे करण्यात आला.  
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles