उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का: सातारा पोटनिवडणुकीच्या तारखेची घोषणा नाही

विधानसभा निवडणूक २०१९
Updated Sep 21, 2019 | 16:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Satara Lok Sabha by-election: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. सोबतच देशभरातील काही जागांवरली पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला आहे.

satara loksabha by election date not declared by election commission maharashtra assembly election 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे भोसले (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • उदयनरराजे भोसले यांना मोठा धक्का
 • उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपत केला प्रवेश
 • निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीरच केली नाही

नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत जाहीर केला. त्यासोबतच देशभरातील ६४ मतदारसंघांतील पोटनिवडणुकांचाही कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला. पण महाराष्ट्रातील सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा यामध्ये समावेश नाहीये. सातारा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर न झाल्याने उदयनराजे भोसले यांना धक्का असल्याचं बोललं जात आहे.

काही महिन्यांपूर्वीच देशभरात झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी पुन्हा विजयही मिळवला. मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि भाजपत प्रवेश केला. 

उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्याने विधानसभा निवडणुकींसोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणूक जाहीर होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमात सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाचा समावेश नाहीये. 

कुठल्या राज्यातील ६४ जागांवर पोटनिवडणूक होणार?

 1. अरुणाचल प्रदेश
 2. बिहार
 3. छत्तीसगड
 4. आसाम
 5. गुजरात 
 6. हिमाचल प्रदेश 
 7. कर्नाटक 
 8. केरळ
 9. मध्यप्रदेश 
 10. मेघालय 
 11. ओडिशा
 12. पुदुच्चेरी 
 13. पंजाब 
 14. राजस्थान 
 15. सिक्कीम 
 16. तामिळनाडू
 17. तेलंगाणा 
 18. उत्तरप्रदेश 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ चा कार्यक्रम

 1. २३ सप्टेंबर - निवडणुकीची अधिसूचना 
 2. ३० सप्टेंबर - अर्ज दाखल करण्यास सुरुवात 
 3. ४ सप्टेंबर - अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
 4. ५ ऑक्टोबर - उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी 
 5. ७ ऑक्टोबर - उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत
 6. २१ ऑक्टोबर - मतदानाची तारीख
 7. २४ ऑक्टोबर - मतमोजणी होणार 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी