शरद पवारांची सभा संपताच राष्ट्रवादीच्या दोन गटांत हाणामारी

विधानसभा निवडणूक २०१९
Updated Sep 21, 2019 | 21:49 IST | ऊमेर सय्यद

Clash between two group of NCP: अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा संपताच दोन गटांत हाणामारी झाली.

sharad pawar rally ahmednagar clashes two groups ncp sangram jagtap abhishek kalamkar assembly election 2019
शरद पवारांची सभा संपताच राष्ट्रवादीच्या दोन गटांत हाणामारी 

थोडं पण कामाचं

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत हाणामारी
  • शरद पवारांची सभा संपताच दोन गटांत हाणामारी
  • दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक आणि हाणामारी
  • पक्षांतर्गत वाद पोहोचला पोलीस ठाण्यात

अहमदनगर: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या गटात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे, अशातच राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून शनिवारी दुपारी पवारांची अहमदनगर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अहमदनगरमधील सभा संपल्यानंतर दोन्ही गटांत जोरदार वाद झाला. शरद पवार यांची सभा संपताच आमदार संग्राम जगताप आणि माजी महापौर अभिषेक कळमकर यांचे दोन गट आमनेसामने आले.  भिडल्याणे काही काळ सभा परिसरात चांगलाच गोंधळ उडाला होता.

शरद पवार यांनी सभेला संबोधित केल्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्त्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. त्यानंतर या शाब्दिक चकमकीचे रूपांतर चक्क हाणामारीत झाले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. दोन्ही गटातील वाद हा पोलीस ठाण्यात गेला आणि नंतर हा वाद सामोपचाराने मिटविण्यात आला. त्यासोबतच राष्ट्रवादीचे काही स्थानिक नेत्यांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची समजूत काढत या वादावर पडदा टाकण्यात आला.

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर शरद पवार यांनी भाष्य करत म्हटलं की, आता संघर्ष आणि लढाईला सुरुवात झाली आहे. अहमदनगर जिल्ह्याची ओळख ही देशासाठी महत्वाची कामगिरी केलेला जिल्हा अशी होते. देशाच्या स्वातंत्र्याचे बिगुल याच भागातून वाजले. 

पवारांनी पुढे म्हटलं की, अहमदनगर सारखा जिल्हा शेती प्रमाणेच शिक्षणातही पुढे आहे. मात्र, त्यांना नोकऱ्या कुठेही मिळत नाहीयेत. सत्ता आमच्याकडे आल्यास रोजगाराच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी