Shashi Tharoor Injured: मंदिरातील पूजेदरम्यान शशी थरूर जखमी, डोक्याला पडले ६ टाके

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 15, 2019 | 16:21 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Shashi Tharoor Injured: केरळच्या मंदिरात प्रार्थना करायला गेले असता काँग्रेसचे नेते शशी थरूर जखमी झाले आहेत. माजी मंत्री शशी थरूर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्या डोक्याला ६ टाके पडले आहेत.

Shashi Tharoor
शशी थरूर जखमी  |  फोटो सौजन्य: ANI

तिरुवनंतपुरम: काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर आज मंदिरात प्रार्थना करताना अचानक जखमी झाले. एनआयएच्या रिपोर्टनुसार काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या डोक्याला मार बसला आहे आणि त्यांना सहा टाके पडले आहेत. डॉक्टरांनी सांगितलं की, थरूर यांची स्थिती धोक्याबाहेर आहेत. ट्विटरवरून शशी थरूर यांचा एक फोटो समोर आला आहे. यात त्यांच्या डोक्यावर पट्टी बांधलेली दिसतेय. शिवाय त्यांच्या कपड्यांवर रक्ताचे डाग दिसत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार शशी थरूर थंपनूर इथं गांधारी अम्मन कोविल मंदिरात पूजा करायला गेले होते. परंपरेनुसार मंदिरात पूजा करताना व्यक्तीला एका तराजूच्या पारड्यात बसवलं जातं आणि दुसऱ्या पारड्यात त्याच्याकडून त्याच्याच वजना इतका प्रसाद चढवला जातो.

 

 

रिपोर्टनुसार जेव्हा शशी थरूर यांना तराजूवर बसवलं गेलं तेव्हा तराजू तुटला आणि ते खाली पडले. यानंतर काँग्रेस नेता शशी थरूर यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्या उपचारादरम्यान डोक्यावर मार बसल्याचं दिसलं. त्यांना डोक्यावर सहा टाके लागले. शशी थरूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केरळला पोहोचले होते. यापूर्वी थरूर यांनी काजाखुट्टम मतदार संघात अशीच एक परंपरागत पूजा केली होती.

याबाबतीत शशी थरूर यांनी ट्विट केलं होतं, ‘काल काजाखुट्टम इथं परयादानक सुरू केलं. केळाच्या ‘थुलभारम’ सोबत... कमीतकमी मंदिरांमध्ये तरी मी एक मोठा राजनितिज्ञ असल्याचा दावा करू शकतो. यापूर्वी ट्विट करत शशी थरूर यांनी केरळ आणि तिरुवनंतपुरममध्ये मोदींची लाट नाहीय, असं म्हटलं होतं.

भाजप कार्यकर्त्यांचा थरूर यांच्या कार्यालयाबाहेर गोंधळ

भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या कार्यालयासमोर खूप गोंधळ घातला. घटनेच्या वेळी थरूर कार्यालयात उपस्थित नव्हते. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी थरूर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि त्यांचा कार्यालयात शिरकाव केला. तिथं त्यांनी ‘हिंदू पाकिस्तान’ नावाचं एक बॅनर लटकवलं आणि कार्यालयावर काळं तेल ओतलं.

या घटनेबाबात तिरुवनंतपुरमचे भाजपचे जिल्हा अध्यक्ष एस. सुरेश यांनी म्हटलं की, हा विरोध थरूर यांच्या चुकीच्या वक्तव्यांसाठी होता. थरूर इथून लोकसभेचे खासदार आहेत. त्यांच्या खोट्या वक्तव्यांचा विरोध म्हणून कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचललं. तर काँग्रेसचे आमदार वी. डी. सतीशन यांनी ही घटना म्हणजे भाजपचा निरर्थक अभिमान दर्शवणारी असल्याचं म्हटल आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Shashi Tharoor Injured: मंदिरातील पूजेदरम्यान शशी थरूर जखमी, डोक्याला पडले ६ टाके Description: Shashi Tharoor Injured: केरळच्या मंदिरात प्रार्थना करायला गेले असता काँग्रेसचे नेते शशी थरूर जखमी झाले आहेत. माजी मंत्री शशी थरूर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्या डोक्याला ६ टाके पडले आहेत.
Loading...
Loading...
Loading...