पंतप्रधान मोदींचा अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे वाराणसीत दाखल

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 26, 2019 | 08:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

पंतप्रधान नरेंद्र आज वाराणसी मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत. गुरूवारी भव्य रोड शोनंतर मोदी आज सकाळी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करतील. त्यानंतर मोदी पाच वर्षानंतर पहिल्यांदा पत्रकार परिषद घेणार आहेत.

Uddhav thackeray in varanasi
पंतप्रधान मोदींचा अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे वाराणसीत दाखल  |  फोटो सौजन्य: ANI

Today PM Modi will file nomation form: पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी ११.३० च्या सुमारास मोदी आपला निवडणुकीचा अर्ज दाखल करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान मोदींचा अर्ज भरण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विशेष आमंत्रण दिल्याचं समजतंय. त्यामुळे उद्धव ठाकरे मोदींचा अर्ज भरण्यासाठी वाराणसीत दाखल झाले आहेत.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फोनवरून उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिल्याचं समजतंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव यांना विनंती केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आमंत्रण स्विकारलं आणि वाराणसीत दाखल झाले आहेत. 

आमंत्रण येताच गुरूवारी रात्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे पुण्याहून वाराणसीसाठी रवाना झाले होते. वाराणसी विमानतळावर केंद्रीय मंत्री पियूष गोयल, भूपेंद्र यादव, खासदार अनिल अगरवाल यांनी उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं. दरम्यान मोदींनी अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे पुन्हा मुंबईकडे रवाना होतील. कारण आज पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात असणार आहेत. मोदींची आज वांद्रामध्ये सभा असेल. दरम्यान अर्ज दाखल करताना एनडीएचे बरेच दिग्गज नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पत्रकार परिषद देखील घेणार आहेत.  वाराणसी येथील हॉटेल तास गंगा येथे ही पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी साडेबारा वाजता ही पत्रकार परिषद सुरू होईल. त्याआधी ते वाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरतील. सत्तेत आल्यानंतर गेल्या पाच वर्षात ते पहिल्यांदा पत्रकार परिषद घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या या पत्रकार परिषदेबद्दल सारेच उत्सुक आहेत.

गुरूवारी पंतप्रधान मोदींनी वाराणसीत भव्य रोड शो करत शक्तिप्रदर्शन केलं.   पंडित मदन मोहन मालवीय यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करुन मोदींचा मेगा रोड शो सुरू झाला आहे. त्यानंतर हा रोड शो लंका, अस्सी, सोनारपुरा, मदनपूरा, गोदौलिया, दशाश्वमेध घाट असा पूर्ण झाला. मोदींच्या रोड शोसाठी वाराणसीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी खूप मोठी गर्दी केली होती. जवळपास सात किलोमीटरपर्यंतच्या या रोड शोमध्ये पंतप्रधान मोदी आणि भाजपनं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.  रोड शोनंतर मोदींनी गंगा घाटावर आरती केली. 

तर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देखील ३० मार्चला आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन केलं होतं. अमित शहा गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
पंतप्रधान मोदींचा अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे वाराणसीत दाखल Description: पंतप्रधान नरेंद्र आज वाराणसी मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत. गुरूवारी भव्य रोड शोनंतर मोदी आज सकाळी निवडणुकीसाठी अर्ज दाखल करतील. त्यानंतर मोदी पाच वर्षानंतर पहिल्यांदा पत्रकार परिषद घेणार आहेत.
Loading...
Loading...
Loading...