शिवसैनिक आक्रमक, युती तोडण्याचा दिला इशारा

विधानसभा निवडणूक २०१९
Updated Sep 11, 2019 | 23:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

Shivsainik angry over BJP leaders behavior: शिवसेना आणि भाजप यांच्यात आगामी विधानसभा निवडणुकीत युती होणार की नाही? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. युती होणार यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाहीये.

Shivsainik threat to break alliance with bjp
शिवसैनिक आक्रमक, युती तोडण्याचा दिला इशारा 

थोडं पण कामाचं

  • शिवसेना-भाजप यांच्यात युती होणार की स्वबळावर लढणार?
  • भाजप पदाधिकाऱ्यांवर शिवसैनिकांचा संताप
  • युती तोडण्याचा शिवसैनिकांनी भाजपला दिला इशारा

सांगली: शिवसेना आणि भाजप हे राज्यात, केंद्रात भलेही सत्तेत असतील. पण दोघांमध्ये नेहमीच कुठल्या ना कुठल्या विषयावरुन आरोप प्रत्यारोप होत असल्याचं पहायला मिळालं आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू झाल्याचं चित्र आहे. त्यातच आता सांगलीतील शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसत आहे. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी युती तोडण्याचा इशारा दिला आहे.

झालं असं की, सांगलीतील विश्रामबाग येथे बांधण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपूलाचा उद्घाटन कार्यक्रम रविवारी पार पडला. उड्डाण पुलाचं उद्घाटन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं. या उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्ह्यातील विविध राजकीय नेते उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमाचं शिवसेनेला आमंत्रण न दिल्याने शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. 

या कार्यक्रमानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी आक्रमक भूमिका घेत भाजपला युती तोडण्याचा इशारा दिला आहे. विश्रामबाग उड्डाणपूलाचं काम महायुती सरकारच्या काळात मंजूर आणि पूर्ण झालं. महायुतीमध्ये शिवसेना, भाजप, रासप, रिपाई या सर्व पक्षांचा समावेश होतो. मात्र, असे असतानाही भाजपने शिवसेनेला आमंत्रण न देता डावललं. भाजपाला या अपमानाची किंमत मोजावी लागेल असंही शिवसैनिकांनी म्हटलं आहे.

सांगलीतील विश्रामबाग येथे बांधण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपूलाचं उद्घाटन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, महापौर संगिता खोत, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

सांगली जिल्ह्यात स्थानिक पातळीवर भलेही हा शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमधील वाद असेल. पण एकंदरीतच हा प्रश्न गंभीर आहे कारण सत्तेत आल्यापासूनच शिवसेना आणि भाजप यांच्यात अनेक विषयांवरुन आजपर्यंत आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यातच आता भाजपने फिफ्टी-फिफ्टी चा जागावाटप फॉर्म्युला मान्य न करत अधिक जागा मागितल्या आहेत. त्यामुळे या विधानसभेत शिवसेना-भाजपची युती होणार की गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाही नाट्यमय घडामोडी घडून दोघेही स्वतंत्र निवडणूक लढणार हे पहावं लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...