LIVE: सोलापूर लोकसभा निवडणूक २०१९  : भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी विजयी

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 23, 2019 | 22:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

सोलापूर लोकसभा मतदार संघात काँग्रेस, भाजप आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली. सोलापुरात भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी विजयी झाले आहेत.

solapur loksabha election results 2019
सोलापूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

सोलापूर :  सोलापूर लोकसभा मतदार संघ हा अनुसूचित जाती राखीव मतदार संघ असल्याने या ठिकाणी अकोल्यासोबत सोलापुरातही वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी आपले नशिब आजमविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुरूवातील दुरंगी वाटणारी ही लढत तिरंगी करण्यात प्रकाश आंबेडकरांना यश आले.  गेल्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे शरद बनसोडे यांनी  सुशील कुमार शिंदे यांना सुमार दोन लाखांच्या आसपास मतांनी पराभूत केले होते. शरद बनसोड यांनी ५ लाख १७ हजार मते पडली होती तर सुशील कुमार शिंदे यांना ३ लाख ६८ हजार मते पडली होती. 

आज लोकसभा निवडणूक २०१९ च्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. देशभरात सात टप्प्यात निवडणुका पार पडल्या. त्याच निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. महाराष्ट्रात यावर्षी ६०.८० टक्के मतदान झालं. म्हणजेच एकूण ८ कोटी ८५ लाख ६४ हजार ५९२ मतदारांपैकी ५ कोटी ३८ लाख ४५ हजार १९७ मतदारांनी मतदान केलं. आज महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात कोण बाजी मारेल तर कोण आपला गड कायम राखेल हे स्पष्ट होईल. आजच्या निकालांकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. 

लोकसभा निवडणूक निकालांचे LIVE UPDATES:

 1.  सोलापुरात भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी विजयी
 2. सोलापुरात जयसिद्धेश्वर स्वामी 154887 मतांनी आघाडीवर
 3.  सोलापुरात भाजपाचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी 150352 मतांनी आघाडीवर
 4. सोलापुरात जयसिद्धेश्वर स्वामी 1,38,450 मतांनी आघाडीवर
 5. सोलापुरात जयसिद्धेश्वर स्वामी 78,940 मतांनी आघाडीवर
 6. सोलापुरात भाजपचे जयसिद्धेश्वर स्वामी ५३,७२५ मतांनी आघाडीवर 
 7. वंचित : प्रकाश आंबेडकर : १८ हजार २५२  मतं
 8. कॉंग्रेस : सुशीलकुमार शिंदे : ४४ हजार १३४ मतं
 9. भाजप : जय सिध्देश्वर महास्वामी : ६१ हजार ८४६ मतं
 10. सोलापुरात सुशील कुमार शिंदे पिछाडीवर
 11. सोलापुरात प्रकाश आंबेडकर पिछाडीवर
 12. सोलापुरात सुशील कुमार शिंदे पिछाडीवर
 13. सोलापुरात सुशील कुमार शिंदे यांची आघाडी
 14. LIVE: सोलापूर लोकसभा निवडणूक २०१९ : मतमोजणीला सुरूवात

 

टाइम्स नाऊ मराठीचा ग्राऊंड 'सेंटी'मीटर रिपोर्ट

लोकसभेच्या रिंगणात पाचव्यांदा उतरलेल्या सुशील कुमार शिंदे यांना यापूर्वी चार पैकी ३ वेळा विजय मिळाला होता, पण गेल्यावेळी मोदी लाटेत  सुशील कुमार शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला. यंदा शिंदे यांनी सोलापूरकरांना भावनिक हाक देत, आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले. त्याचा परिणाम थोडाफार झाल्याचे मतदानाच्या टक्केवारीवरून दिसून आले.  शिंदे यांच्या विरूद्ध  भाजपकडून लिंगायत धर्मगुरू डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी आणि रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर रिंगणात आहे. तिघांनी आपली ताकद पूर्णपणे पणाला लावली आहे. 

सोलापूरात यंदा ६० टक्क्यांचा आसपास मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीत हे मतदान ५५.६८ टक्के होते. त्यामुळे जवळपास पाच टक्के मतदान अधिक झाल्याने त्याचा फायदा हा काँग्रेसच्या सुशील कुमार शिंदेंना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  या मतदार संघातील दलित आणि नवबौद्धांचे मतदान हे प्रकाश आंबेडकरांच्या पाठिशी असण्याची शक्यता आहे. तर लिंगायत मते ही भाजपच्या पारड्यात पडलेली दिसली. तसेच सोलापूर शहरातील पद्मशाली समाज आणि पांढरपेशी समाजाचा पाठिंबा भाजपला दिसला. सोलापुरात ओवैसींचा प्रभाव पडून मुसलमान मते आंबेडकरांना मिळतील असले वाटले होते. पण ती मते तसेच धनगर समाजाची मते आंबेडकरांकडे वळाली नसल्याचे दिसले. त्यामुळे त्याचा फायदा शिंदे यांना होण्याची शक्यता आहे. 

(टाइम्स नाऊ मराठीने वरील लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. त्यानुसार हा अंदाज वर्तविण्याचा प्रयत्न आहे. ) 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी