Video: महागठबंधनच्या सभेत चवताळलेला बैल घुसला, पाहा भर सभेत काय घडलं!

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 26, 2019 | 09:30 IST | टाइम्स नाऊ मराठी

Election rally: उत्तर प्रदेशच्या कन्नौजमध्ये महागठबंधनच्या सभेत एक विचित्र घटना घडली. या सभेत एक चवताळलेला बैल घुसला. त्याच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.

 stray_bull_in_uttar pradesh_twitter
Video: महागठबंधनच्या सभेत चवताळलेला बैल घुसला!  |  फोटो सौजन्य: Twitter

कन्नौज (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशच्या कन्नोजमध्ये सप-बसप-रालोद (एसपी-बीएसपी-आरएलडी) या महागठबंधनच्या सभेत एक चवताळलेला बैल घुसल्याने एकच गोंधळ उडाला. त्यामुळे काही काळ सभेत व्यत्ययही आला होता. ही घटना काल (गुरुवार) कन्नौजमध्ये घडली. या घटनेनंतर सप नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी असं म्हटलं की, 'हा बैल देखील आपल्या रॅलीमध्ये त्याची तक्रार घेऊन आला होता.' खरं पाहता अखिलेश यादव यांनी या घटनेतून देखील उत्तर प्रदेश सरकारवर निशाणा साधला. सध्या येथील प्रत्येक व्यक्ती हा त्रस्त आहे. जो आपल्याकडे आता तक्रारी घेऊन येत आहे. 

सभेत अचानक बैल घुसल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियातून समोर आला आहे. ज्यामध्ये आपण पाहू शकतो की, सभेत अचानक बैल घुसल्याने एकच हल्लकल्लोळ माजला. एवढंच नव्हे तर त्या बैलाला नियंत्रित करायला गेलेल्या एका व्यक्तीवर देखील या बैलाने हल्ला चढवला. ज्यामध्ये ती व्यक्ती गंभीररित्या जखमी झाली असल्याची माहिती मिळते आहे. 

दरम्यान, एकीकडे बैलाचा हैदोस सुरु असताना दुसरीकडे हुल्लडबाज त्या बैलाला आणखी चिथावणी देत होते. त्यामुळे पोलिसांना तिथे सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान या सगळ्या घटनेनंतर अखिलेश यादव हे सभेला संबोधित करताना असं म्हणाले की, 'आम्हाला आशा नव्हती की, कोणी अशा पद्धतीने आमच्या तक्रार घेऊन येईल.' असं म्हणत अखिलेश यादवांनी सरकारवरच निशाणा साधला. 

पुढे ते असंही म्हणाले की, '२३ मे रोजी लोकसभा निवडणूक निकालापूर्वी या 'बैलाचा' सामना करण्यासाठी पुढे आलेल्या शूर मुलांचा मला अभिमान वाटतो.'  यावेळी अखिलेश यादव यांनी कार्यकर्ते आणि पोलिसांचे देखील आभार मानले. ज्यांच्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि सभेचं आयोजन होऊ शकलं. 

'जर सरकार एका बैलाला राजकीय सभेत प्रवेश करण्यापासून रोखू शकत नाही तर विचार करा शेतकऱ्यांची काय स्थिती असेल. त्यांचं किती नुकसान होत असेल. दुसरीकडे कन्नोजमध्ये २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठीच ही सभा घेण्यात आली होती. पण सभेमध्ये अचानक बैल घुसल्याने काही काळ खूपच गोंधळ निर्माण झाला होता. पण सुदैवाने सभेसाठी जमलेली लोकं वेळीच तेथून बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. पण यामुळे सभेच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कारण की, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकं जमलेली असताना अचानक अशा पद्धतीने बैल घुसल्याने चेंगराचेंगरी होण्याची शक्यताही होती. त्यामुळे सभेआधी कार्यकर्त्यांसाठी योग्य काळजी घेणं गरेजचं असल्याचं या घटनेतून समोर आलं आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Video: महागठबंधनच्या सभेत चवताळलेला बैल घुसला, पाहा भर सभेत काय घडलं! Description: Election rally: उत्तर प्रदेशच्या कन्नौजमध्ये महागठबंधनच्या सभेत एक विचित्र घटना घडली. या सभेत एक चवताळलेला बैल घुसला. त्याच्या हल्ल्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola