सनी देओल 'या' मतदारसंघातून लढवणार निवडणूक

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 23, 2019 | 20:45 IST | टाइम्स नाऊ मराठी

बॉलिवूड अभिनेता सनी देओलने भाजपमध्ये प्रवेश केला असून तो गुरदासपूर येथून लोकसभा निवडणूक लढवत आहे.

sunny deol
सनी देओल  

मुंबई: भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या सनी देओल आता गुरदासपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. तर चंदीगडमधून किरण खेर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ऐन निवडणुकीचे वातावरण तापलेले असताना सनी देओलने भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून सेलिब्रेटी तसेच खेळाडू राजकीय रिंगणात उतरत आहेत. प्रसिद्ध बॉक्स विजेंदर सिंगनेही काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून तो दक्षिण दिल्लीतून निवडणूक लढवणार आहे. दुसरीकडे भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तो पूर्व दिल्लीतून निवडणूक लढवत आहे. 

भाजपने आज तीन उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत चंदीगढ येथून प्रसिद्ध अभिनेत्री आणि अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर निवडणूक लढवत आहेत. तर पंजाबच्या गुरदासपूर येथून निवडणूक लढवत आहे. तर पंजाबच्या होशियारपूर येथू न प्रकाश यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

दोन दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि सनी देओल यांची पुण्यात विमानतळावर भेट झाली. ही भेट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. सनीचे वडिल धर्मेंद्र बिकानेरमधून भाजपचे खासदार होते तर सनीची आई हेमा मालिनी मथुरेतून दुसऱ्यांदा भाजपकडून निवडणूक लढवली होती. 

पूर्व दिल्लीतून गौतम गंभीरला उमेदवारी

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून रिंगणात उतरला आहे. त्याला भाजपने पूर्व दिल्लीतून उमेदवारी जाहीर केली आहे. गौतम गंभीरने काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता.

दक्षिण दिल्लीतून काँग्रेसच्या विजेंदरचा पंच

भारताचा प्रसिद्ध बॉक्सर विजेंदर सिंग आतापर्यंत बॉक्सिंगच्या रिंगणात खेळत होता तो आता निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. विजेंदर काँग्रेसकडून निवडणूक लढवत असून त्याला दक्षिण दिल्लीतून  उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 

उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईतून निवडणूक लढवणार

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उत्तर मुंबईतून निवडणूक लढवत आहे. येत्या २३ एप्रिलला मुंबईत मतदान होत आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
सनी देओल 'या' मतदारसंघातून लढवणार निवडणूक Description: बॉलिवूड अभिनेता सनी देओलने भाजपमध्ये प्रवेश केला असून तो गुरदासपूर येथून लोकसभा निवडणूक लढवत आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola