सुप्रिया सुळेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला, वाद दीराशी, मग नवरा कशाला सोडायचा? 

विधानसभा निवडणूक २०१९
Updated Sep 11, 2019 | 20:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

काँग्रेसला रामराम ठोकलेल्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज दुपारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला.

supriya sule harshawardhan patil join bjp indapur baramati devendra fadanvis chandrakant patil
हर्षवर्धन पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुप्रिया सुळे 

औरंगाबाद :  काँग्रेसला रामराम ठोकलेल्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज दुपारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी मुंबईत भाजपचा झेंडा हाती घेतला. हर्षवर्धन पाटील यांच्या या प्रवेशावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टोला हाणला आहे. वाद दीराशी होता, मग नवरा का सोडायचा? असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. औरंगाबाद येथील एमजीएम कॉलेजमध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केले. 

हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात झालेल्या भाषणानंतर आपण त्यांना अनेक वेळा फोन केला. त्यांच्या कुटुंबियांना फोन केला. पीआरओला फोन केला. पीएला फोन केला. पण दोन दिवस ते काही समोर आले नाही. त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, असा आरोप केला. तसेच माझी, राहुल गांधी आणि हर्षवर्धन पाटील यांची कधीच भेट झाली नसल्याचे यावेळी स्षष्ट केले. आज हर्षवर्धन पाटील यांनी भाजप प्रवेश केला त्यावर भाष्य करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, राष्ट्रवादीशी वाद असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणत होते. मग भांडण दीराशी आणि नवरा कशाला सोडायचा असा टोला त्यांनी यावेळी लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये अलिबाबा आणि ४० चोर असे म्हटले होते. आता त्यातील अनेक जण तुमच्या पक्षात आले आहेत, असे म्हणून सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांनाही टोला लगावला. 

हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या आठवड्यात इंदापुरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेत, राष्ट्रवादी काँग्रेसवर तसे पवार कुटुंबियांवर टीकेची झोड उठवली होती. तसेच माझ्यावर सतत अन्याय होत गेला आहे. त्याबाबत काँग्रेसने कधी भूमिका घेतली नाही अशी टीकाही स्वःपक्षावर केली होती. आणि भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले होते. 

हर्षवर्धन पाटील यांची मी गेल्या पाच वर्षापासून भाजप प्रवेशासाठी वाट पाहत होतो. संसदीय कार्यमंत्री म्हणून त्यांनी मोठा काळ काम केले आहे. त्यांना सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याचा अनुभव आहे. याचा आम्हांला नक्की उपयोग होईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. हर्षवर्धन पाटील भाजपात असते तर आतापर्यंत खासदार झाले असते असे म्हणून बारामतीच्या जागेबाबत सूचक विधान चंद्रकात पाटील यांनी यावेळी केले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...