टाइम्स नाऊ एक्झिट पोल, महाराष्ट्र लोकसभा निवडणूक २०१४: महायुतीला मिळालं होतं यश तर आघाडीला बसला होता झटका

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 19, 2019 | 15:31 IST | टाइम्स नाऊ हिंदी

टाइम्स नाऊ-ओआरजी एक्झिट पोल (Exit Poll) २०१४, महाराष्ट्र लोकसभा निवडणूक: उत्तरप्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रात एनडीएला मोठं यश मिळालं होतं. २०१४च्या निवडणुकीत मोदी लहर असल्याने इतकं मोठं यश युतीला मिळालं होतं.

Times now org exit poll maharashtra lok sabah elections 2014
२०१४च्या निवडणुकीतील TIMES NOW-ORGचा एक्झिट पोल  |  फोटो सौजन्य: IANS

मुंबई: केंद्रात कुठल्या राजकीय पक्षाचं सरकार येणार?, कोण पंतप्रधानपदावर विराजमान होणार? भारतीय जनता पक्ष पुन्हा बहूमत मिळवत सत्तेत येणार की काँग्रेस पक्ष पाच वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येणार या सारख्या विविध प्रश्नांवर सध्या देशभरात चर्चा होत असल्याचं पहायला मिळत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या लोकसभा निवडणुकीत कुठल्या पक्षाला बहूमत मिळणार यासंदर्भात चर्चा सुरु आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार आणि सत्ता कुठल्या पक्षाची येणार या सर्वांची उत्तरे मतमोजणीच्या दिवशी मिळणार आहेत. येत्या २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी पार पडणार आहे. मतदार राजाने कुठल्या पक्षाच्या पारड्यात मतं टाकली आहेत हे २३ मे रोजी स्पष्ट होईल. त्यापूर्वी १९ मे रोजी निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडेल आणि एक्झिट पोल समोर येतील आणि कुठल्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवला जाईल. अशाच प्रकारे २०१४च्या लोकसभा निवडणुकीतही एक्झिट पोल समोर आले होते. पाहूयात २०१४ लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलची आकडेवारी.

महाराष्ट्र (लोकसभेच्या एकूण जागा - ४८)

उत्तरप्रदेशानंतर महाराष्ट्र असं राज्य आहे जेथे लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात विविध चॅनल्सने आपले एक्झिट पोल प्रसिद्ध केले होते. पाहूयात कुठल्या एक्झिट पोलने काय अंदाज वर्तवला होता.

  1. टाइम्स नाऊ - ओआरजी: टाइम्स नाऊ-ओआरजीने केलेल्या सर्व्हेनुसार राज्यात एनडीएला २९ जागांवर विजय मिळेल. तर, यूपीएला १९ जागांवर विजय मिळेल.
  2. सीएनएन -आयबीएन - सीएसडीएस: सीएनएन-आयबीएन-सीएसडीएसच्या सर्व्हेने एनडीए ३५ आणि यूपीएला १३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. 
  3. हेडलाइन्स टुडे सिसरो: हेडलाइन्स टुडे सिसरोच्या सर्व्हेनुसार, एनडीएला ३१ जागा यूपीएला १३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. तर ४ जागा इतरांना मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. 
  4. एबीपी न्यूज नेल्सन: एबीपी न्यूज नेल्सनच्या सर्व्हेनुसार, महाराष्ट्रात एनडीएला ३२ जागा, काँग्रेसला १५ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. तर, एका जागेवर इतर उमेदवार विजयी होईल असा अंदाज वर्तवला होता. 
  5. न्यूज २४ टुडे चाणक्य: न्यूज २४ टुडे चाणक्यने आपल्या सर्व्हेक्षणात एनडीएला ३९ जागा आणि युपीएला ९ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. 
  6. सी-वोटर्स इंडिया टीव्ही: सी-वोटर्स इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार, एनडीएला ३२ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. तर, यूपीएला १४ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. 

एनडीएला मिळालं होतं मोठं यश

२०१४च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्यावेळी महाराष्ट्रात एनडीएने ५१.८ टक्के मतांसह ४२ जागांवर विजय मिळवला होता. तर, यूपीएने ३५ टक्के मतांसह ६ जागांवर विजय मिळवला होता. एक्झिट पोलनुसार न्यूज २४ टुडे चाणक्यचा सर्व्हे जवळपास बरोबर होता. न्यूज २४ टुडे चाणक्यने आपल्या सर्व्हेत एनडीएला ३९ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
टाइम्स नाऊ एक्झिट पोल, महाराष्ट्र लोकसभा निवडणूक २०१४: महायुतीला मिळालं होतं यश तर आघाडीला बसला होता झटका Description: टाइम्स नाऊ-ओआरजी एक्झिट पोल (Exit Poll) २०१४, महाराष्ट्र लोकसभा निवडणूक: उत्तरप्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रात एनडीएला मोठं यश मिळालं होतं. २०१४च्या निवडणुकीत मोदी लहर असल्याने इतकं मोठं यश युतीला मिळालं होतं.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles