EVM प्रकरण- काँग्रेस नेते उदित राज यांचे वादग्रस्त विधान, सुप्रीम कोर्टावर केला आरोप

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 22, 2019 | 14:04 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे खासदार उदित राज आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहत आहेत. उदित राज यांनी पुन्हा एकदा ट्वीट करून सुप्रीम कोर्टावर गंभीर आरोप केले आहेत.

udit raj
उदित राज 

मुंबई: काँग्रेस नेता उदित राज यांची वादग्रस्त विधाने करण्याचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. देशभरात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत सुरु असलेल्या वादादरम्यान उदित राज यांनी यावेळी सुप्रीम कोर्टावर गंभीर आरोप केले आहेत. उदित राज यांनी ट्विटरवरून सुप्रीम कोर्टावर आरोप केले आहेत. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, सुप्रीम कोर्टाला का वाटत नाही की व्हीव्हीपॅटच्या सर्व चिठ्ठ्या आधी मोजल्या जावात. सुप्रीम कोर्टही या घोटाळ्यात सामील आहे की काय? निवडणूक प्रक्रियेमुळे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सरकारी कामे रेंगाळली आहेत. यातच निवडणूक मतमोजणीसाठी दोन ते तीन दिवस लागले तर काय फरक पडतो?

गुरूवारी उदित राज यांनी ट्वीट करत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. भाजपला जेथे जेथे ईव्हीएम बदलायचे होते त्यांनी बदलून घेतले असतील. त्यासाठीच तर निवडणूक सात टप्प्यात कऱण्यात आली. तुमचे कोणीही ऐकणार नाही. ओरडत रहा, लिहून काही फायदा होणार नाही. रस्त्यावर उतरावे लागेल. देशाला जर इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता हवी असेल तर आंदोलन करावे लागेल.  निवडणूक आयोग विकले गेले आहे. 

याआधीही उदित राज यांनी आणखी एक वादग्रस्त ट्वीट केले होते. ते या ट्वीटमध्ये म्हणाले होते, केरळमध्ये भाजपला आतापर्यंत एकही जागा जिंकण्यात यश मिळालेले नाही. याचे कारण माहीत आहे का? कारण तेथील लोक शिक्षित आहेत अंधभक्त नाहीत. 

उदित राज यांच्या या विधानावर पलटवार करताना भाजपचे टॉम वडक्कम म्हणाले होते, त्यांना केरळची संस्कृती तसेच शिक्षणपद्धतीबद्दल कोणतीच आयडिया नाही आहे. तसेच बुद्धिमान कोण असतात याची आयडियाही त्यांना नाही. ते ज्या प्रकारे बोलत आहेत त्याचा काहीही केरळशी संबंध नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी