पुन्हा केंद्रातील सत्तेची चावी ठरला 'हा' मतदार संघ 

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 28, 2019 | 15:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

 हा केवळ योगा योग आहे किंवा आकड्यांचा खेळ पण दक्षिण गुजरातमधील वलसाड लोकसभा मतदार संघाचा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर आपल्याला असे लक्षात येते की ज्या राजकीय पक्षाने या मतदार संघात विजय मिळवला त्यानेच केंद्रात स

VALSAD LOKSABHA CONSTITUENCY
वलसाड मतदार संघ   |  फोटो सौजन्य: Times Now

वलसाड:  हा केवळ योगा योग आहे किंवा आकड्यांचा खेळ पण दक्षिण गुजरातमधील वलसाड लोकसभा मतदार संघाचा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर आपल्याला असे लक्षात येते की ज्या राजकीय पक्षाने या मतदार संघात विजय मिळवला त्यानेच केंद्रात सरकार स्थापन केली. यंदाही वलसाडची जागा भाजपने जिंकली आणि पुन्हा केंद्रात भाजपने सत्ता स्थापन केली.  
 
 गुजरातच्या २६ लोकसभा मतदार संघातील वलसाड या मतदार संघाबाबत विचित्र योगा-योगामुळे राजकीय पक्ष या जागेला शुभ आणि खूप महत्त्वाची मानतात. स्थानिक नेत्यांना वाटते की या जागेवर विजयी झाल्यास दिल्लीत सत्तेचा मार्ग तयार होतो.  या मतदार संघाचा मागील रेकॉर्ड पाहिला तर ही गोष्ट सिद्ध होते. 
 
यावेळी भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार के.सी. पटेल यांना उमेदवारी दिली.  त्यांच्या विरूद्ध काँग्रेसने यंदा नवा उमेदवार दिला होता.  काँग्रेसने जितूभाई पटेल यांना रिंगणात उतरविले होते. पण के. सी. पटेल यांनी जितूभाई पटेल यांचा ३ लाख ५३ हजार ७९७ मतांनी पराभव केला आणि केंद्रातील सत्तेची चावी हस्तगत केली.  के.सी. पटेल यांना ७ लाख ७० हजार ४४२ मते पडली, तर जितू पटेल यांना ४ लाख १६ हजार ३१० मते पडली. 


वलसाडचा निवडणुकीचा इतिहास आणि जादू... 

१९५७ ते १९७१ या कालावधीत काँग्रेसचे नानू भाई पटेल या मतदार संघातून विजयी झाले होते. त्या काळात केंद्रात काँग्रेसची सत्ता होती. त्यानंतर नानू भाई पटेल काँग्रेस सोडून जनता पार्टीत सामील झाले. यावर्षी  केंद्रात मुरारजी देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली जनता पार्टीने सरकार स्थापन केले.  हे सरकार पुढील दोन वर्ष सत्तेत राहिले. 

१९८०-८९ या कालावधीमध्ये पुन्हा केंद्रात इंदिरा काँग्रेसने सत्ता स्थापन केली. त्यावेळी वलसाड मतदार संघात पुन्हा बदल झाला आणि उत्तमभाई पटेल यांनी विजय मिळवत सत्तेची चावी वलसाडच्या रुपाने काँग्रेसला मिळवून दिली. 

१९८९ मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या. त्यावेळी जनता दलाने विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या नेत्तृत्वाखाली सत्ता स्थापन केली. नऊ वर्ष काँग्रेसचा खासदार असलेल्या वलसाड मतदारसंघात यावेळी अर्जुनभाई पटेल यांना जनतेने दिल्लीत पाठविले. 

१९९१ मध्ये पुन्हा काँग्रेसने पी.व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्ता स्थापन केली. त्यावेळी तिसऱ्यांना वलसाड लोकसभा मतदार संघातून उत्तमभाई पटेल विजयी झाले.  १९६ मध्ये भाजपने पहिल्यांदा या मतदार संघावर विजयाचा झेंडा फडकवला. तेव्हा केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सत्ता स्थापन केली. यावेळी हे सरकार केवळ १३ दिवस चालले. मग वाजपेयी पुन्हा १९९८ आणि १९९९ मध्ये पंतप्रधान बनले. दोन्ही वेळा लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने वलसाडमध्ये विजय संपादन केला. त्यानंतर २००४ मध्ये १४ व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपकडून ही सीट हिसकावली. तेव्हा केंद्राला संपुआ (UPA) सरकार स्थापन झाले. त्या वेळी वलसाडमधून किशनभाई पटेल पहिल्यांना लोकसभा निवडणुकीत विजयी झाले. त्यानंतर २००९ च्या निवडणुकीत किशनभाई पटेल आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता हे समीकरण कायम राहिले.

वलसाडचा विजय आणि सत्तेचे समिकरण पाहता भाजपने वलसाड लोकसभा मतदार संघातून गुजरातचे माजी आरोग्य मंत्री डॉ. के. सी. पटेल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. काँग्रेसने तिसऱ्यांदा या मतदार संघातून किशनभाई पटेल यांना रिंगणात उतरविले. पण मोदी लाट आणि वलसाडमधील योगायोग म्हणा, डॉ. के. सी. पटेल निवडणूक जिंकले आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सत्ता स्थापन केली. 

वलसाड लोकसभा मतदार संघात एकूण  1,512,061 मतदार आहेत. त्यात धोदिया समाजाचे सर्वाधिक मतदार आहेत. त्यानंतर कोनकाना, वरली, कोळी, मागसवर्गीय, हलपती, मच्छीमार, मुस्लिम आणि भिल्ल समाजाचे मतदारांचा क्रमांक लागतो. 

देशाचा पंतप्रधान ठरविण्यासाठी या भाग्यशाली सीट जिंकण्यासाठी भाजपसह काँग्रेसही आपली सर्व ताकद पणाला लावणार आहे. सध्याचे खासदार डॉ. के. सी. पटेल यांनी २०१४ निवडणुकीत काँग्रेसच्या किशनभाई पटेल यांना २०८००४ मतांनी पराभूत केले होते. 

या ठिकाणी विशेष म्हणजे १९९७ नंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने वलसाडची सीट पाच वेळा जिंकली आहे, तर भाजपने ५ वेळा जिंकली आहे. तर दोन वेळा इतर पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळविला आहे. वलसाड लोकसभा मतदार संघातर्गंत एकूण विधानसभेच्या ७ जागा येतात.  वलसाड मतदार संघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पुन्हा केंद्रातील सत्तेची चावी ठरला 'हा' मतदार संघ  Description:  हा केवळ योगा योग आहे किंवा आकड्यांचा खेळ पण दक्षिण गुजरातमधील वलसाड लोकसभा मतदार संघाचा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर आपल्याला असे लक्षात येते की ज्या राजकीय पक्षाने या मतदार संघात विजय मिळवला त्यानेच केंद्रात स
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles