कोणतंही बटण दाबल्यास मत कमळाला जात, सुजात आंबेडकराचा आरोप 

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 18, 2019 | 15:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

Lok Sabha elections 2019: आज लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहेत.यात महाराष्ट्रातील १० जागांचा समावेश आहे. दरम्यान सोलापुरात आज होत असलेल्या मतदानावर सुजात आंबेडकरांनी गंभीर आरोप केले आहेत.

Sujat ambedkar
कोणतंही बटण दाबल्यास मत कमळाला जात, सुजात आंबेडकराचा आरोप   |  फोटो सौजन्य: Facebook

सोलापूर: देशभरात एकूण सात टप्प्यांत लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. या सात टप्प्यांपैकी दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होतं आहे.  देशभरातील १३ राज्यांतील एकूण ९७ जागांवर दुसऱ्या टप्प्यात मतदान होईल. या ९७ जागांपैकी महाराष्ट्रातील १० जागांचा समावेश आहे. यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपले दिग्गज उमेदवार या लोकसभा मतदारसंघात उतरवले आहेत. यासोबतच आपल्या विजयासाठी सर्वांनी आपली ताकद पणाला लावली आहे. आज होत असलेल्या दुसऱ्या टप्प्यात सोलापूरमध्ये ही मतदान १ वाजेपर्यंत ३१.५६ टक्के मतदान झालं आहे. यातच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी मतदानासंबंधी गंभीर आरोप केले आहेत.  ईव्हीएम मशिनमध्ये वंचित बहुजन आघाडीचं निवडणूक चिन्हासमोरचं बटण दाबल्यास भाजपचं असलेलं कमळ बटणावर मत जात असल्याचा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला आहे. 

लोकसभा निवडणूक २०१९ ला केंद्रातली आणि राज्यातली सत्ता हातातून जाण्याची भीती पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटते आणि म्हणूनच मोदी गैरव्यवहार करत असल्याचं सुजात यांनी म्हटलं आहे.  सोलापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांची थेट लढत ही भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबत आहे. 

लोकसभा निवडणूक २०१९ च्या दुसऱ्या टप्पात सोलापूरमध्ये ही मतदान सुरू आहे. सोलापूरमध्ये १४ जागांवर आणि ग्रामीण भागात २२ जागांवर ईव्हीएम मशिन चालत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीचं चिन्ह हे कप बशी आहे. आमचं चिन्ह चौथ्या क्रमाकांवर आहे. काही मतदान केद्रावर चौथ्या क्रमाकांवर असलेलं बटण दाबलं जात नाही आहे तर काही जागांवर कोणतंही बटण दाबल्यास ते मत कमळ चिन्हाला जात असल्याचा दावा सुजात आंबेडकरांनी केला आहे. २०१९ ला सत्ता हातातून निसटेल म्हणून पंतप्रधान मोदी घाबरले आहेत. या भीतीनंच ते अशा पद्धतीनं गैरव्यवहार करत आहेत असा आरोपही सुजात यांनी भाजप आणि मोदींवर केला आहे. 

काही मतदान केंद्रावर जवळपास पाऊण ते एक तास उशिरा मतदानासा सुरूवात झाली. आमच्या पक्षाचे पोलिंग बूथ कमिटी, मतदार स्वतः फोन करून यासंबंधी तक्रार करत असल्याचं देखील सुजात यांनी सांगितलं आहे. यानंतर आम्ही स्वतः जाऊन बूथवर जाऊन माहिती घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 

दुसरीकडे सुजात यांच्या आरोपानंतर प्रकाश आंबेडकर यांनीही असेच आरोप केले आहेत. वंचित बहुजन आघाडीचं बटण दाबल्यास भाजपच्या कमळाल्या मत जात असल्याचा आरोप प्रकाश आंबडेकरांनी केला आहे. तक्रार येताच जिल्हाधिकाऱ्यांनी मशिन सील केलं अशी माहिती प्रकाश आंबडेकरांनी दिली आहे. कोणतीही ईव्हीएम मशिन १०० टक्के बरोबर असूच शकत नाही, यामुळे सगळे जण बॅलेट पेपरची मागणी करत असल्याचं देखील आंबडेकरांनी म्हटलं आहे.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
कोणतंही बटण दाबल्यास मत कमळाला जात, सुजात आंबेडकराचा आरोप  Description: Lok Sabha elections 2019: आज लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहेत.यात महाराष्ट्रातील १० जागांचा समावेश आहे. दरम्यान सोलापुरात आज होत असलेल्या मतदानावर सुजात आंबेडकरांनी गंभीर आरोप केले आहेत.
Loading...
Loading...
Loading...