राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसमधून गळती, या माजी मंत्र्याने दिला काँग्रेसचा राजीनामा 

विधानसभा निवडणूक २०१९
Updated Sep 10, 2019 | 20:26 IST | टाइम्स नाऊ मराठी

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसला धक्क्यांचे सत्र सुरू होते, आता काँग्रेसला भाजपने धक्के देण्यास सुरूवात केली आहे. उर्मिला मातोंडकर आणि हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर राज्याचे माजी मंत्री आणि मुंबई का

vidhansabha election 2019 congress ex minister krupashankar singh join bjp mega bharti 3 maharashtra news in marathi
काँग्रेस आणि भाजप  

थोडं पण कामाचं

  • उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर काँग्रेसला आज आणखी एक धक्का
  • काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंग भाजपमध्ये दाखल होणार 
  • भाजपच्या तिसऱ्या मेगा भरतीत कृपाशंकर सिंगही सामील

मुंबई :  भाजप आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांची पक्षात भरती करून घेत होते. आता त्यांनी काँग्रेसकडे मोर्चा वळवला आहे. काँग्रेसचे माजी मंत्री आणि माजी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनाही आपल्या गोटात ओढण्यात भाजपला यश आले आहे. आज लोकसभेतील काँग्रेसच्या उत्तर मुंबईतील उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता कृपाशंकर सिंग यांनी राजीनामा देऊन काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. 

उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याचा आरोप कृपाशंकर सिंह यांच्यावर लावण्यात आला होता. कांदे-बटाटे विकून ३०० कोटींची संपत्ती जमा केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता. या प्रकरणातून ते दोषमुक्त झाले आहेत. 

 

 

दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृपाशंकर सिंग यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले होते. त्याचवेळी कृपाशंकर सिंग हे भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तसेच कृपाशंकर सिंग यांचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चांगले संबंध आहेत. अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील होते. पण त्यांना पक्षात घेण्याचा मुहूर्त सापडत नव्हता. पण यंदाच्या गणेशोत्सवात पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृपाशंकर सिंग यांच्या घरी गणेश दर्शनाला हजेरी लावली आणि गणपती कृपाशंकर सिंग यांना पावला असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. 

येत्या ७ दिवसात राज्यात निवडणूक जाहीर होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर उद्या भाजपची तिसरी मेगा भरती होणार आहे. या मेगाभरतीमध्ये नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक, इंदापूरचे आमदार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी मंत्री  कृपाशंकर सिंग आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्ती आनंदराव पाटील हे काँग्रेस सोडून उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

वानखेडे स्टेडियम जवळच्या गरवारे क्लब सभागृहातील एका कार्यक्रमात या सर्वांचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...