उदयनराजेंचा पुन्हा भाजप प्रवेश लांबला, आज घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट

विधानसभा निवडणूक २०१९
Updated Sep 10, 2019 | 21:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जावे की नाही या संभ्रमात आहेत. आज पुन्हा ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुंबईत भेट घेतली. 

uddhav thackeray Devendra fadanvis
देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे भोसले  

थोडं पण कामाचं

  • साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला 
  • राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा 
  • पुण्यात झालेल्या कार्यकर्त्यांचा बैठकीत झाला होता भाजपमध्ये न जाण्याचा निर्णय 
  • आज पुन्हा राजे भेटले मुख्यमंत्र्यांना, त्यामुळे पुन्हा पक्ष बदलाच्या चर्चांना उधाण 

मुंबई :  साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. त्याचे कारणही तसेच आहे. आज उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. पण या बैठकीत अटी आणि शर्थी पूर्ण न झाल्यामुळे राजेंचा भाजप प्रवेश पुन्हा लांबणीवर पडला आहे.  काल त्यांनी भाजपमध्ये प्रवेश न करण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा त्यावरून यू-टर्न घेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एका ते भाजपमध्ये दाखल होणार याच चर्चांना उधाण आले होते. पण आताच आलेल्या बातमीनुसार ही चर्चा फसकटली आणि राजेंना भाजप प्रवेश लांबणींवर टाकला आहे. 

गेल्या महिन्यात उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी भेट घेतल्याचे सांगण्यात आले होते.  उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज यात्रेत स्टार प्रचारक म्हणून निवडण्यात आले होते. पण या यात्रे राजेंनी कोणत्याच टप्प्यात भाग घेतला नाही. ही यात्रा साताऱ्यात असतानाही राजेंनी त्याकडे पाठ फिरवली होती. 

त्यानंतर राजेंना भेटायला शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे गेले होते. त्यानंतर राजकारणातून अलिप्त व्हावेसे वाटते अशी गुगली राजेंनी पत्रकारांना टाकली होती. त्यानंतर पत्रकारही संभ्रमात पडले होते, की राजेंना काय म्हणायचे आहे. त्यानंतर पुण्यात आपल्या  कोरेगाव पार्क येथील घरात कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि त्या बैठकीतील सूर अटी मान्य नसेल तर भाजपमध्ये प्रवेश करू नये असाच होता. त्यामुळे कालपर्यंत राजे भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचे म्हटले जात होते. पण आज अचानक राजेंनी मुंबई गाठली आणि आपल्या अटीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. पण अटी आणि शर्थींवर योग्य तोडगा न निघाल्याने राजे यांनी भाजप प्रवेश लांबविला आहे. 

उदयनराजे यांनी भाजपला प्रवेशासाठी अनेक अटी टाकल्या होत्या. त्यात एक म्हणजे त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे. त्याबद्दल बोलायचे झाले तर पंतप्रधानांचा प्रोटोकॉल असतो, त्यानुसार त्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होऊ शकत नाही असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून उदयनराजे यांना सांगण्यात आले. दुसरे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यावर राजे यांनी खासदारकीची निवडणूक ही विधानसभेच्या निवडणुकीसोबतच घेण्याची मागणी केली होती. त्यामुळे हा देखील मुद्दा केंद्र आणि राज्य सरकारच्या अख्यारितील नाही. केंद्रीय निवडणूक आयोग हा निर्णय घेते की पोट निवडणूक कधी घायची. या संदर्भातही माहिती उदयनराजे भोसले यांना देण्यात आली आहे. 

त्यामुळे उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा दिला, तर पोट निवडणुकीला वेळ लागला तर त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते असे मत कार्यकर्त्यांचे होते. त्यामुळे त्यांनी पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबतच घेण्याचा आग्रह उदयनराजे यांनी धरला होता. उद्या भाजपची मेगा भरती ३ होणार आहे, यात  भरतीत गणेश नाईक, हर्षवर्धन पाटील, आनंदराव पाटील आणि कृपाशंकर सिंग भाजपमध्ये दाखल होणार असल्याचे निश्चित झाले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...