राज ठाकरे यांनी कट- पेस्ट करुन लोकांची दिशाभूल करु नये : विनोद तावडे

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 23, 2019 | 13:34 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कट- पेस्ट करुन लोकांची दिशाभूल करु नये, जे वास्तव आहे तेच मांडा आणि नसेल जमत तर असे बोलू नका अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज केली.

vinod tawade
विनोद तावडे 

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कट- पेस्ट करुन लोकांची दिशाभूल करु नये, जे वास्तव आहे तेच मांडा आणि नसेल जमत तर असे बोलू नका अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज केली. हरिसालचे वास्तव तेथील उपसरपंचांनी मांडल्यानंतर पत्रकारांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर तावडे यांनी ही टीका केली.

कॉंग्रेस नेत्यांच्या आश्रमशाळेत मुलींवर लैंगिक अत्याचार आणि लैंगिक शोषण होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाई विरुध्द काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोक पैसे मिळविण्यासाठीच असे आरोप करतात असे निर्लज्जपणे सांगितले.  तावडे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ते म्हणाले की, आता आपल्याला राज ठाकरे यांना प्रश्न विचारायचा आहे की मोदी,शहा नको असे तुम्ही आवाहन जर करत असाल तर अशा प्रकारच्या लोकांना निवडुन देण्याचे आवाहन ते आपल्या जाहीर सभेत करणार आहेत का की अशा लोकांवर ते टीका करणार आहात याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

भाजपला भारतीय संविधानावर घाला घालायचा आहे हे शरद पवार यांनी केलेले विधान खोडून काढताना तावडे म्हणाले की,१९७५ साली जेव्हा देशात आणीबाणी लागू झाली, तेव्हाच देशाच्या संविधानावर घाला घातला होता, त्यावेळी शरद पवार आपण त्याच पक्षात होतात हे बहुधा आपल्याला आठवत नसावे, असा टोलाही त्यांनी मारला.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जो आदर्श घोटाळा केला, त्यामुळे महाराष्ट्राची नाचक्की झाली ती नाचक्की कधीही पुसून काढता येणार नाही, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. भाजपने महाराष्ट्र चुलीत घातला अशी टीका करणा-या चव्हाण यांना तावडे यांनी प्रत्युत्तर दिले.  

कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी त्यांच्या प्रचार सभेत एका तरुणाला व्यासपीठावर बोलवून त्याला बोलू न देता त्या तरुणालाच कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धक्का मारून खाली उतरविले, याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तावडे यांनी सांगितले की, अभिव्यक्ति स्वातंत्र्याची भाषा करणा-या कॉंग्रेसकडून असा दुर्दैवी प्रकार घडत असेल तर कॉंग्रेसवाल्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य़ावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही. व्यासपीठावर आलेल्या तरुणाने आपल्या मनातील भावना व्यक्त केली तर कॉंग्रेसवाल्यांना राग का आला. दिग्विजय सिंह यांच्यासारख्या नेत्यांच्या सभेत त्या तरुणाने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या, तर त्या तरुणाला जे मनापासून पटले ते त्यांनी बोलून दाखविण्याची हिंमत दाखविली. त्या तरुणाचे बोलणे खोटे असेल तर ते दिग्विजय सिंह यांनी आपल्या भाषणातून खोडून काढायला हवे होते, असेही तावडे यांनी सांगितले.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
राज ठाकरे यांनी कट- पेस्ट करुन लोकांची दिशाभूल करु नये : विनोद तावडे Description: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कट- पेस्ट करुन लोकांची दिशाभूल करु नये, जे वास्तव आहे तेच मांडा आणि नसेल जमत तर असे बोलू नका अशी टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज केली.
Loading...
Loading...
Loading...