माझा सिनेमा रोखण्यासाठी हे सर्व षडयंत्र आहेः विवेक ओबेरॉय 

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 21, 2019 | 10:15 IST | टाइम्स नाऊ मराठी

एक्झिट पोलवर सलमान ऐश्वर्याचा फोटो असलेला मीम शेअर केल्यानं विवेकला ट्रोल करण्यात आलं. यासंबंधी विवेकला महिला आयोगानं नोटीस देखील बजावली आहे. आता विवेकनं या संपूर्ण वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.

Vivek Oberoi
ट्रोल झाल्यानंतर विवेक ओबेरॉय काय म्हणतो बघा 

मुंबईः बॉलिवूड एक्टर विवेक ओबेरॉयनं सोशल मीडियावर एक्झिट पोलसंदर्भात एक मीम शेअर केल्यानंतर चांगलाच ट्रोल झाला आहे.  या मीममध्ये सलमान खान, ऐश्वर्या रॉय आणि तिचं कुटुंब दिसत आहेत. त्यानंतर विवेक ओबेरॉयला राज्य आणि केंद्रिय महिला आयोगानं नोटीस पाठवली आहे. आता विवेकनं यावर स्पष्टीकरण दिलं आहे. विवेकनं सांगितलं की, ते माझा सिनेमा थांबवू शकत नाहीत म्हणून ते असा मार्ग पत्कारत आहेत. 

न्यूज एजन्सी ANI सोबत बोलताना विवेक ओबेरॉयनं म्हटलं की, मला कळत नाही आहे की लोक इतका इश्यू का करत आहेत. कोणीतरी मला हे मीम पाठवलं होतं. ज्यात माझी थट्टा केली होती. ते बघून मला हसायला आलं आणि मी त्या व्यक्तीच्या क्रिएटिव्हिटीचं कौतूक केलं. जर कोणी आपली थट्टा करत असेल तर त्या गोष्टीला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही आहे. 

 

विवेक ओबेरॉयनं सलमान आणि ऐश्वर्यावर म्हटलं की, जे लोकं त्या मीममध्ये आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त सर्वांना त्रास होतोय. स्वतः जे लोकं मीममध्ये आहेत त्यांना काही अडचण नाही आहे. काम करायला जात नाहीत. मात्र चुकीच्या मुद्द्यावर नेतागिरी सुरू करतात. दीदींनी (ममता बॅनर्जी) एका मिम्समुळे एका तरूणीला तुरूंगात टाकले.  


नोटीसवर बोलला विवेक ओबेरॉय 

महिला आयोगानं पाठवलेल्या नोटीसवर  विवेक ओबेरॉयनं स्पष्टीकरण दिलं आहे.  विवेकनं म्हटलं की, राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र महिला आयोगाच्या नोटीसची मी वाट पाहत आहे. मला त्यांना भेटून माझी बाजू मांडायची आहे. मला नाही वाटत की मी काही चुकीचं केलं आहे. 

 

 

राष्ट्रीय महिला आयोगाच्या चेअरपर्सन रेखा शर्मा यांनी ANI शी बोलताना म्हटलं की, आम्हांला वाटतं की विवेक ओबेरॉय यांनी सोशल मीडियावर त्या फिल्म स्टार्सची माफी मागावी. पुढे रेखा शर्मा यांनी म्हटलं की, जर का त्यांनी असं केलं नाही तर आम्ही बघून घेऊ की त्यांच्याविरोधात काय एक्शन घ्यायची ती. आम्ही ट्विटरशी बातचीत करत आहोत की हे ट्विट लवकरात लवकर कसं डिलीट करता येईल. 

 

 

असं होतं मीम 

विवेक ओबेरॉयनं सोशल मीडियावर एक मीम रिट्विट केलं होतं. यात तीन फोटोचं कोलाज बनवले होते. पहिल्या फोटोत सलमान खान आणि ऐश्वर्या रॉय दिसत आहे. यात लिहिलं की, ओपिनियन पोल. दुसऱ्या फोटोत विवेक ओबेरॉय आणि ऐश्वर्या रॉय आहे.

 

 

.यात लिहिलं की, एक्झिट पोल. तिसऱ्या फोटोत ऐश्वर्या रॉय, अभिषेक बच्चन आणि आराध्या आहे. यावर लिहिलं की, निकाल.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
माझा सिनेमा रोखण्यासाठी हे सर्व षडयंत्र आहेः विवेक ओबेरॉय  Description: एक्झिट पोलवर सलमान ऐश्वर्याचा फोटो असलेला मीम शेअर केल्यानं विवेकला ट्रोल करण्यात आलं. यासंबंधी विवेकला महिला आयोगानं नोटीस देखील बजावली आहे. आता विवेकनं या संपूर्ण वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles