LIVE वर्धा लोकसभा निवडणूक २०१९  : भाजपचे रामदास तडस विजयी

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 23, 2019 | 22:28 IST | टाइम्स नाऊ मराठी

वर्धा लोकसभा मतदार संघात यंदा भाजपने विद्यमान आमदार रामदास तडस  यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरूद्ध काँग्रेसने चारुलता टोकस यांना उमेदवारी दिली आहे. 

wardha loksabha election results 2019
वर्धा लोकसभा निवडणूक २०१९   |  फोटो सौजन्य: Times Now

वर्धा :  वर्धा लोकसभा मतदार संघात गेल्या निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होऊन रामदास तडस यांनी काँग्रेसच्या सागर मेघे यांचा पराभव केला होता. रामदास तडस यांनी सुमारे २ लाख १५ हजार मतांनी मेघे यांचा पराभव केला होता. रामदास तडस यांना सुमारे ५ लाख ३७ हजार मते मिळाली होती तर सागर मेघे यांना ३ लाख २१ हजार मते पडली होती. या ठिकाणी बसपच्या चेतन पेंदम यांना ९० हजार मते पडली होती. यंदा बसपने काँग्रेसमधून आलेल्या शैलेश अग्रवाल यांना  उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने माजी आयपीएस अधिकारी धनराज वंजारी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तडस यांना ही निवडणूक गेल्या टर्म प्रमाणे सोपी नाही आहे. 

LIVE UPDATES

 1. भाजपचे रामदास तडस विजयी
 2. रामदास तडस, भाजप 123123 मतांनी आघाडीवर
 3. रामदास तडस, भाजप 109110 मतांनी आघाडीवर
 4. रामदास तडस, भाजप 71975 मतांनी आघाडीवर 
 5. रामदास तडस, भाजप 58135 मतांनी आघाडीवर
 6. रामदास तडस, भाजप 34407 मतांनी आघाडीवर
 7. रामदास तडस, भाजप 24250 मतांनी आघाडीवर
 8. रामदास तडस, भाजप 18060 मतांनी आघाडीवर
 9. रामदास तडस, भाजप ९१८८ मतांनी आघाडीवर
 10. ईव्हीएम मतमोजणीला सुरूवात
 11. टपाल मतमोजणीला सुरूवात
 12. थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात

टाइम्स नाऊ मराठीचा ग्राऊंड 'सेंटी'मीटर रिपोर्ट

वर्धा लोकसभा मतदार संघातही विदर्भातील इतर मतदार संघाप्रमाणे चित्र दिसते आहे. यात मोदी सरकार विरोधातील नाराजी, तडस यांच्या विकास कामांचा प्रश्न आणि शेतकऱ्यांचा असंतोष हा भाजपच्या रामदास तडस यांना भोवण्याची शक्यता आहे.  काँग्रेसने यावेळी सागर मेघे ऐवजी चारुतला टोकस यांना उमेदवारी देऊन रंगत आणली आहे. 

या मतदार संघात कुणबी आणि तेली समाजाचा फॅक्टर चालताना दिसला आहे.  या वेळी रिंगणात एकूण १४ उमेदवार आहेत. त्यात कुणबी समाजाच्या चारुलता टोकस तर तेली समाजाचे रामदास तडस आहे.  मतदार संघात १४ उमेदवार असले तरी खऱी लढत टोकस आणि तडस यांच्यात आहे. या मतदार संघात बसपला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांनी गेल्या वेळी ९० हजार मते पडली होती. पण ही दलित मते यंदा धनराज वंजारी यांच्यामुळे विभागण्याची शक्यता आहे. वंजारी यांना तेली समाजाची काही मते पडण्याची शक्यता आहे.  बसपचे शैलेश अग्रवाल हे श्रीमंत उमेदवार आहेत. ते किती मते खाणार यावरून तडस आणि टोकस यांचे भवितव्य ठरणार आहे. 

या मतदार संघातील निवडणूक खूपच रंगतदार ठरणार आहे. गेल्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही, पण यानंतर झालेल्या राहुल गांधी यांच्या रॅलीला मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. त्यामुळे मोदी लाटेचा प्रभाव ओसल्याचे या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या चारुलता टोकस यांना अॅडव्हान्टेज दिसतो आहे. यंदा जातीचं कार्ड चालल्याने त्याचाही फायदा टोकस यांना होताना दिसत आहे. 

आर्वी, देवळी आणि धामणगाव या ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यातील देवळी या ठिकाणी चारुलता टोकस यांचे मावस भाऊ आमदार आहेत. उरलेल्या तीन ठिकाणी भाजपचे आमदार आहेत.  गेल्या महिन्यात वर्धा जिल्ह्यातील ३०० ग्रामपंचायतीत मतदान झाले. यात काँग्रेस राष्ट्रवादीने बहुतांशी जागांवर आपले सरपंच निवडून आले. त्यामुळे याचा आधार घेता काँग्रेसचे पारडे जड वाटते आहे. 

(टाइम्स नाऊ मराठीने वरील लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. त्यानुसार हा अंदाज वर्तविण्याचा प्रयत्न आहे. ) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी