यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणूक २०१९ :शिवसेनेच्या भावना गवळी विजयी

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 23, 2019 | 22:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

यवतमाळ लोकसभा मतदार संघात शिवसेनेने पुन्हा एकदा भावना गवळी यांना उमेदवारी दिली , तर त्यांच्या विरूद्ध काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना रिंगणात उतरविले होते. 

yavatmal washim election results 2019
यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणूक निकाल २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

यवतमाळ : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघात विजयाचा हॅट्ट्रिक करण्यासाठी रिंगणात उतरलेल्या भावना गवळी यांनी गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांचा पराभव केला आहे.  यवतमाळ लोकसभा मतदार संघात गेल्या निवडणुकीत २५ उमेदवार होते. यात भावना गवळी यांना ४ लाख ७७ हजार मते पडली होती.  तर काँग्रेसच्या शिवाजीराव मोघे यांना ३ लाख  ८४ हजार मते पडली होती. एकूण ९३ हजारांच्या मत फरकांनी भावना गवळी विजयी ठरल्या होत्या.  या निवडणुकीत बसपा तिसऱ्या क्रमांकावर आणि मनसेचा उमेदवार चौथ्या स्थानावर होता. त्यामुळे अधिक उमेदवार असल्याने त्याचा फायदा भावना गवळींना झाला होता. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी आज होत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. मतमोजणीसाठी राज्यात सर्व यंत्रणा सज्ज आहेत. मतमोजणी केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये साठी कडकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीच निकाल काहीसा उशिरा लागण्याची शक्यता आहे कारण प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील ५ व्हीव्हीपॅट मशीनमधील पावत्यांची पडताळणी केली जाणार आहे. राज्यात चार टप्प्यात लोकसभेसाठी निवडणूक मतदान पार पडले. राज्यात एकूण ४८ मतदारसंघ आहेत. 

लोकसभा निवडणुकीचे LIVE UPDATES

 1. शिवसेनेच्या भावना गवळी विजयी
 2. शिवसेनेच्या भावना गवळी 1,14,738 मतांनी आघाडीवर 
 3. शिवसेनेच्या भावना गवळी 1,03,544 मतांनी आघाडीवर 
 4. शिवसेनेच्या भावना गवळी 73,273 मतांनी आघाडीवर 
 5. शिवसेनेच्या भावना गवळी 59,378 मतांनी आघाडीवर 
 6. शिवसेनेच्या भावना गवळी 30,185 मतांनी आघाडीवर 
 7. शिवसेनेच्या भावना गवळी  १६,८११ मतांनी आघाडीवर 
 8. शिवसेनेच्या भावना गवळी १२,७६२ मतांनी आघाडीवर
 9. शिवसेनेच्या भावना गवळी २२०० मतांनी आघाडीवर
 10. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात
 11. टपाल मतपत्रिकांची मोजणीला सुरूवात

टाइम्स नाऊ मराठीचा ग्राऊंड 'सेंटी'मीटर रिपोर्ट

यवतमाळ वाशिम मतदार संघात यावेळी कुणबी आणि बंजारा समाज कसे आणि कोणाला मते करतो यावर उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.  भावना गवळी आणि माणिकराव ठाकरे कुणबी समाजाचे आहेत. तर वंचित बहुजन आघाडीने यंदा प्रविण पवार या बंजारा उमेदवाराला रिंगणात उतरविले आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात एकूण साडे बारा लाख मते आहेत, त्यात बंजारा समाजाची संख्या लक्षणीय आहे. तर वाशिम जिल्ह्यात एकूण साडेसहा लाख मतदार असून तो कुणबी बहुल आहे. तसेच या मतदार संघात मुस्लिमांची संख्या अधिक आहे.  

गेल्या निवडणुकीत मोदी लाटेत लाखभर मतांनी निवडून आलेल्या भावना गवळी यांना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नाराजीमुळे तोटा सहन करावा लागू शकतो. तसेच यवतमाळमध्ये बंजारा समाजाचे वर्चस्व असल्याने त्या ठिकाणाहून शिवसेनेचे राज्यमंत्री आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड  इच्छूक होते. त्यांनी बंडाचा झेंडा उपसला होता. पण उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी निशाण खाली ठेवले. पण धुसफूस असल्याचे दिसते आहे. या मतदार संघात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे ही निवडणूक भावना गवळी यांना आव्हानात्मक ठरू शकते. 

माणिकराव स्थानिक नेते असल्याने त्यांचा जिल्ह्यात संपर्क आहे. त्यामुळे त्याचा फायदा त्यांनी पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी करून घेतला. मोदी विरोधी लाटेचा फायदा घेण्यात ते काही प्रमाणात यशस्वी दिसताहेत. यंदा मनसे आणि आपचे उमेदवार नसल्याने त्याचा फायदा माणिकरावांना होताना दिसत आहे. 

भावना गवळी यांचा विजय झाला, तर फारच कमी मतांनी होऊ शकतो. नाही तर ही सीट खूप आव्हान देणारी आहे. 

 

(टाइम्स नाऊ मराठीने वरील लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला. त्यानुसार हा अंदाज वर्तविण्याचा प्रयत्न आहे. ) 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणूक २०१९ :शिवसेनेच्या भावना गवळी विजयी Description: यवतमाळ लोकसभा मतदार संघात शिवसेनेने पुन्हा एकदा भावना गवळी यांना उमेदवारी दिली , तर त्यांच्या विरूद्ध काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना रिंगणात उतरविले होते. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola