Lok Sabha Elections 2019 : योगी आदित्यनाथ, मायावतींना निवडणूक आयोगाचा दणका

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 15, 2019 | 17:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Lok Sabha Elections 2019 : दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल, अशी भाषणबाजी केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावतींना दणका दिला आहे.

Yogi Adityanath Mayawati
योगी आदित्यनाथ, मायवतींना निवडणूक आयोगाचा दणका   |  फोटो सौजन्य: Twitter

लखनौ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल, असे भाषण करणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती या दोघांनाही निवडणूक आयोगाने झटका दिला आहे. समाजाच्या भावना भडकवणारे भाषण दिल्याप्रकरणी दोघांना प्रचारासाठी बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांना तीन तर, मायावती यांना दोन दिवस कोठेही जाहीर प्रचार करता येणार नाही. 

यंदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशातील लढाई खूपच रंगतदार आहे. २०१४च्या सार्वजनिक निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशात एकतर्फी विजय मिळवला होता. त्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत तेथे भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले. भाजपची वाढती ताकद लक्षात घेऊन, भाजपला शह देण्यासाठी यंदा समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने महाआघाडी करून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

आदित्यनाथ यांना फटका 

निवडणुकीत मुस्लिम आणि दलित मतांची विभागणी होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांनी महाआघाडीचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीची सगळी गणितं जातीवर आधारीत असल्यामुळं त्या त्या जातीच्या लोकांना आपलसं करण्याचा प्रयत्न नेत्यांच्या भाषणांतून होताना दिसत आहे. अशीच भाषणे करण्याच्या नादात स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आक्षेपार्ह विधाने केली आहेत. निवडणूक आयोगाने त्यांच्या भाषणांवर बारीक नजर ठेवल्यामुळे त्यांना आयोगाचा दणका बसला आहे. आयोगाने त्यांच्या भाषणांना गांभीर्याने घेतले आहे. त्यामुळे आयोगाने मुख्यमंत्र्यांना नोटीस बजावत पुढचे तीन दिवस कोठेही जाहीर प्रचार करण्यास बंदी केली आहे.

मायावतीही दोषी 

बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनाही अशाच कारवाईला समोरे जावे लागत आहे. त्यांच्या भाषणांवरही निवडणूक आयोगाने नजर ठेवली होती. त्यामुळे त्यांनाही आयोगाचा दणका बसला आहे. त्यांना आयोगाने पुढचे दोन दिवस जाहीर प्रचार करण्यास बंदी केली आहे. दोघांच्याही कारवाईची सुरुवात मंगळवार (१६ एप्रिल) सकाळी सहा वाजल्यापासून होणार आहे. दोन्ही नेत्यांना आचारसंहितेचे उल्लेघंन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. या दोघांनी निवडणुका काळात भाषणबाजी केल्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते. सामाजिक सलोखा बिघडण्याचा धोका असल्याने त्यांना जाहीर सभेत बोलण्यापासून रोखण्यात आले आहे.

आझम खान यांनी माफी मागावी 

दरम्यान, भाजप नेत्या जयाप्रदा यांच्या विरोधात खालच्या पातळीवर टीका करणारे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी माफी मागावी, अशी मागणी होत आहे. केवळ खान यांनी नव्हे, तर संपूर्ण समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने महिलांची माफी मागितली पाहिजे, असे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या दिल्ली प्रदेश अध्यक्ष शीला दीक्षित यांनी देखील आझम खान यांचे वक्तव्य दुर्दैवी असल्याचं म्हटल आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha Elections 2019 : योगी आदित्यनाथ, मायावतींना निवडणूक आयोगाचा दणका Description: Lok Sabha Elections 2019 : दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल, अशी भाषणबाजी केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावतींना दणका दिला आहे.
Loading...
Loading...
Loading...