'स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हा हिंदू होता, ज्याचं नाव होतं...', पाहा कमल हासनने कोणावर निशाणा साधला

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 13, 2019 | 10:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

Kamal Hassan: हिंदू दहशतवाद हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण कमल हासन याने याच मुद्द्यावर तामिळनाडूत प्रचाराला सुरुवात केली आहे.

kamal_haasan_Times Now
स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हा हिंदू होता: कमल हासन  |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली: अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेला कमल हासन याने आपला पक्ष मक्कल निधि मय्यमच्या उमेदवारासाठी निवडणूक प्रचार सुरु केला आहे. याच प्रचारादरम्यान कमल हासन एक असं वक्तव्य केलं आहे की, ज्यामुळे वाद उद्भवण्याची शक्यता आहे. 'स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी हा हिंदू होता आणि त्याचं नाव होतं नथुराम गोडसे.' तामिळनाडूच्या अरवाकुरिची विधानसभा मतदारसंघात १९ मे या शेवटच्या टप्प्यात लोकसभेसोबतच येथे विधानसभेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळेच कमल हासनने आपल्या पक्षाच्या उमेदवारासाठी प्रचार केला. यावेळी त्याने हे वक्तव्य केलं. 

मक्क्ल निधि मय्यम पक्षाचा प्रमुख कमल हासन याने आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना थेट हिंदू दहशतवादावर निशाणा साधला. पहला हिंदू दहशतवादी हा नथुराम गोडे होता. असा आरोप कमल हासनने केला आहे. यापुढे तो असंही म्हणाला की, 'मी हे फक्त यासाठी म्हणत नाही की, हा परिसर मुस्लिम बहुल आहे. मी हे यासाठी म्हणत आहे कारण की, माझ्या समोर गांधींची प्रतिमा आहे.' 

यावेळी कमल हासनने हिंदुत्वावरून राजकारण करणाऱ्या बऱ्याच जणांना टार्गेट केलं. 'भारताचा पहिला दहशतवादी हा एक हिंदू होता. त्याचं नाव हे नथुराम गोडसे होतं. मी इथे त्यांच्या हत्येसाठी न्याय मागायला आलो आहे. माझ्या मनाला यामुळे आजही खूप वेदना होतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, मी सच्चा भारतीय आहे. त्यामुळे कोणत्याही सच्चा भारतीयाला असंच वाटेल की, देशात शांती नांदावी आणि देशात समानता असावी.'  

हासन पुढे असंही म्हणाला की, 'कोणताही सच्चा भारतीय नागरिक हा नेहमीच राष्ट्रीय झेंडा तिरंगा सर्वाधिक पसंत करेल. त्याला नेहमीच वाटेल की, हाच आपला राष्ट्रध्वज असावा.' असं म्हणत हासनने अनेकांवर निशाणा साधला. 

आता कमल हासन यांच्या या टीकेला हिंदुत्ववादी संघटना नेमकं कशा प्रकारे उत्तर देणार हे पाहणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता कमल हासनच्या या वक्त्वव्यामुळे राजकारण बरंच तापण्याची शक्यताही आहे. दरम्यान, १९ मे रोजी सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होणार असून २३ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता संपूर्ण देशाचं लक्ष हे २३ मे या दिवसाकडे लागून राहिलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी