[VIDEO]: भाजप अध्यक्ष अमित शहा यांचं मुंबईत मोठं वक्तव्य

Amit Shah in Mumbai: भाजप अध्यक्ष अमित शहा मुंबईत दौऱ्यावर आहेत. मुंबईतील गोरेगाव येथे आयोजित कार्यक्रमात भाषण करताना अमित शहा यांनी पुन्हा राज्यात भाजप-शिवसेना युतीचेच सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

bjp president amit shah devendra fadnavis chief minister maharashtra assembly election 2019
भाजप अध्यक्ष अमित शहा मुंबई दौऱ्यावर  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

 • अमित शहा मुंबई दौऱ्यावर
 • अमित शहा यांची गोरेगाव येथील सभेत काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका
 • राज्यात पुन्हा युतीचीच सत्ता येणार: अमित शहा
 • देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्रृत्वात युती सत्ता स्थापन करणार: अमित शहा

मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांनी मुंबईतील गोरेगाव येथे आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर मुंबईत असलेल्या अमित शहा यांनी राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना युतीचीच सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला.

फडणवीसच होणार पुढील मुख्यमंत्री

गेल्या दोन दिवसांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते म्हणत आहेत की हे नाही झाले तर आमचं सरकार येईल ते नाही झालं तर आमचं सरकार येईल. पण काहीही होवो किंवा काहीही न होवो भारतीय जनता पक्षाचा विजय नक्कीच होणार. महाराष्ट्र आणि हरियाणात भाजपचीच सत्ता येणार. महाराष्ट्रात एनडीएची सत्ता तीन चतुर्थांश बहुमताने येईल. राज्यात ज्याप्रकारे पाच वर्षांपासून देवेंद्र फडणवीस यांचं सरकारने काम केलं त्यानुसार आता आगामी निवडणुकीनंतर महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीच बनणार. 

अमित शहा यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

 1. महाराष्ट्रात पुन्हा एनडीएचीच सत्ता येणार हे निश्चित आहे
 2. राज्यात विधानसभा निवडणुकांनंतर पुन्हा देवेंद्र फडणीसच मुख्यमंत्री बनणार 
 3. काश्मीरमधील कलम ३७० चा भारतीय जनता पार्टीने आधीपासूनच विरोध केला होता, कलम ३७० मुळे काश्मीरच्या विकासात अडचण येत होती
 4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या साहसाने यंदा संसदेच्या पहिल्याच सत्रात कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला
 5. काश्मीरमधील कलम ३७० रद्द करणं हा राजकीय मुद्दा नाहीये. भारताला अखंड बनवण्याचा संकल्प आहे आणि मोदींनी हा संकल्प पूर्ण केला आहे. 
 6. काश्मीरमधून कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयात काँग्रेस पक्षाला राजकारण दिसत आहे तर आम्हाला यामध्ये देशभक्ती दिसत आहे.
 7. शिवछत्रपतींच्या भूमीत देशविरोधी विचारधारेला थारा देऊ नका. कलम ३७० ला विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी