Lok Sabha 2019 : आझम खान यांच्या टीकेला जयाप्रदांचे थंड डोक्याने उत्तर

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 15, 2019 | 19:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Lok Sabha 2019 : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपच्या उमदेवार जयाप्रदा यांनी अतिशय थंड डोक्याने उत्तर दिले आहे. खान यांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्याची मागणी त्यांनी केली आहे.

azam khan should ban for election says jaya prada after controversial statement against her
Lok Sabha Elections 2019 : आझम खान यांच्या टीकेला जयाप्रदांचे थंड डोक्याने उत्तर   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • आझम खान यांना जयाप्रदांचे थंड डोक्याने उत्तर
  • आझम खान यांना निवडणूक बंदी करा : जयाप्रदा
  • मी रामपूर सोडून जाणार नाही : जयाप्रदा

नई दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. दुसरीकडे ज्यांच्याविषयी खान यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले त्या जयाप्रदा यांनी मात्र, त्यांना अतिशय थंड डोक्याने उत्तर दिले आहे. आयोगाने त्यांना निवडणूक लढवण्यापासून रोखले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 

जयाप्रदा म्हणाल्या, ‘त्यांना आयोगाने निवडणूक लढवण्यापासून रोखले पाहिजे. त्यांच्यासारखे नेते निवडून आले तर, लोकशाहीचे काय होईल? समाजात महिलांसाठी जागा राहणार नाही. त्यावेळी आम्ही कोठे जाणार? आणि त्यांनी अशी टीका केली म्हणून काय मला मरण स्वीकारायला पाहिजे. तुम्हाला काय वाटते अशामुळे मी रामपूर सोडून देईन? तसे कदापी होणार नाही.’  पुढे त्या म्हणाल्या, ‘माझ्यासाठी ही काही मोठी गोष्ट नाही. तुम्हाला आठवत असेल की, २००९मध्ये मी त्यांच्या पक्षाची उमेदवार होते. त्यावेळी माझ्यावर अशाप्रकारची वाईट टीका झाली होती. पण, माझ्या समर्थनार्थ कोणीही पुढे आले नाही. मी एक महिला आहे आणि मी त्यांना तसेच प्रत्युत्तर देऊ शकते. माहिती नाही, मी काय केलंय की ते अशा प्रकारे माझ्यावर टीका करत आहेत.’

 

 

महिला आयोगाची नोटीस

दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने आझम खान यांना नोटिस पाठवली आहे. यासंदर्भात आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा म्हणाल्या, ‘महिलांविषयी ते कायमच अशी वक्तव्ये करत आले आहेत. या निवडणुकीत त्यांनी दुसऱ्यांदा राजकीय क्षेत्रातील महिलांविषयी अशी टीका केली आहे. आम्ही त्यांना नोटिस पाठवली आहे. तसेच त्यांच्याविरोधात कठोर कारवाई व्हावी यासाठी निवडणूक आयोगालाही विनंती केली आहे. हीच वेळ आहे त्यांना रोखण्याची. महिला सेक्स ऑब्जेक्ट नाहीत. मला वाटते महिलांनी अशा उमेदवारांच्या विरोधात मतदान करायला पाहिजे.’

मी त्यांचे नाव घेतलेच नाही : खान

या प्रकरणी आझम खान यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यावर खान यांनी स्पष्टीकरणही दिले आहे. ते म्हणाले, ‘मी कोणाचेही नाव घेतलेले नाही. मला माहिती आहे की मला काय करायचे आहे. जर, मी कोणाचे नाव घेतले आहे, हे कोणी सिद्ध करून दाखवले तर मी निवडणूक लढवणार नाही. मी भाषणात दिल्लीतील एका व्यक्ती विषयी बोलत होतो. मी १५० रायफल्स घेऊन आलो होतो. जर आझम खान दिसले असते तर, मी त्यांना गोळी मारली असती. त्यांच्या विषयी बोलताना मी चड्डीचा उल्लेख केला होता. लोकांना ओळखण्यास उशीर लागला पण, त्यांना आरएसएसची खाकी चड्डी घातली होती.’

हायप्रोफाइल लढत 

उत्तर प्रदेशात रामपूरची लढत हायप्रोफाइल लढत मानली जात आहे. तेथे समाजवादी पक्षाकडून आझम खान तर, भाजपकडून जयाप्रदा निवडणूक रिंगणात आहेत. अनेक वर्षे समाजवादी पक्षाच्या खासदार म्हणून काम केल्यानंतर जयाप्रदा यांनी यंदा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे रामपूरची लढत रंगतदार झाली आहे. दुसरीकडे आझम खान सातत्याने वादग्रस्त वक्तव्यांवरून चर्चेत असतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha 2019 : आझम खान यांच्या टीकेला जयाप्रदांचे थंड डोक्याने उत्तर Description: Lok Sabha 2019 : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपच्या उमदेवार जयाप्रदा यांनी अतिशय थंड डोक्याने उत्तर दिले आहे. खान यांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Loading...
Loading...
Loading...