Lok Sabha 2019 : जयाप्रदांविषयी आझम खान यांची अभद्र टिप्पणी; सर्वच स्तरांतून टीका

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 15, 2019 | 13:44 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Lok Sabha 2019 : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान पक्षासाठी डोकेदुखी ठरत आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार जयाप्रदा यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करून त्यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे.

azam khan controversial statement over jaya prada_timesnow
आझम खान यांची जयाप्रदांवर खालच्या थराला जाऊन टीका   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • आझम खान यांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य
  • जयाप्रदा यांच्यावर नाव न घेता खालच्या थरावर टीका
  • राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल

रामपुर (उत्तर प्रदेश) : समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांची प्रतिमा शांत आणि संयमी असली तरी, या पक्षाचे नेते मात्र वादग्रस्त वक्तव्यांनी कायमच चर्चेत असतात. त्यात ज्येष्ठ नेते आझम खान यांची जीभ समाजवादी पक्षाचे सर्वांत मोठी डोकेदुखी आहे. उत्तर प्रदेशात रामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असलेल्या आझम खान यांनी जयाप्रदा यांच्याविषयी एक अतिशय खालच्या पातळीचे वक्तव्य करून वाद ओढवून घेतला आहे. विशेष म्हणजे, व्यासपीठावर अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याने अखिलेश यांनाही टीकेला सामोरं जावं लागतंय.

आझम खान म्हणाले, ‘राजकारण इतक्या खालच्या थराला गेले आहे तुम्हीच बघा. (जयाप्रदा यांना उद्देशून) तुम्हाला आम्ही रामपूरमध्ये घेऊन आलो. रामपूरच्या रस्त्यांची गल्ल्यांची माहिती करून दिली. कुणाचा धक्का लागू दिला नाही. कोणी वाईट बोलणार नाही, याची काळजी घेतली. तुम्ही दहा वर्षे प्रतिनिधित्व केले. पण, तुमच्यात आणि माझ्यात खूप फरक आहे. रामपूर वासियांनो, उत्तर प्रदेश वासियांनो, हिंदुस्तानच्या नागरिकांनो...ऐका, त्यांना ओळखायला तुम्हाला १७ वर्षे लागली. पण, मी १७ दिवसांतच ओळखलं होतं. त्यांची खालची अंडरवियर ही खाकी रंगाची आहे.’

महिला आयोगाकडून गंभीर दखल

आझम खान यांच्या वक्तव्यावर जयाप्रदा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, आझम खान यांनी काय वक्तव्य केले हे माहिती नसल्याचे सांगितले. तर दुसरीकडे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी खान यांचे वक्तव्य अपमानजनक असल्याचे म्हटले आहे. आझम खान सातत्याने महिलांविषयी अपमानकारक वक्तव्ये करत असतात. त्यांच्या या वक्तव्याची आयोगाने गंभीर दखल घेतली असून, त्याची चौकशी केली जाईल. तसेच त्यांना नोटीसही पाठवली जाईल. तसेच त्यांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात येईल, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले.

 

 

मायातवींनी भूमिका स्पष्ट करावी : भाजप

भारतीय जनता पक्षाने खान यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून, तीव्र प्रतिक्रिय व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपचे प्रवक्ते डॉ. चंद्रमोहन यांनी ट्विट केले आहे. त्यात म्हटले आहे की, अतिशय निंदनीय वक्तव्य आहे. राजकारणाची पातळी याच्यापेक्षा खाली येऊ शकत नाही. आझम खान आणि त्यांच्या पक्षाचा खरा चेहरा यानिमित्ताने समोर आला आहे. त्यांचा पक्ष असाच आहे जो मर्यादा विसरून महिलांच्याबाबतीत आपले विचार असे मांडत असतो. जयाप्रदा यांच्यावर केलेल्या या अभद्र टिप्पणीवर मायवती यांनीदेखील आपली भूमिका स्पष्ट करावी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha 2019 : जयाप्रदांविषयी आझम खान यांची अभद्र टिप्पणी; सर्वच स्तरांतून टीका Description: Lok Sabha 2019 : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान पक्षासाठी डोकेदुखी ठरत आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार जयाप्रदा यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका करून त्यांनी नवा वाद ओढवून घेतला आहे.
Loading...
Loading...
Loading...