Lok Sabha 2019 : दहशतवादाचे शस्त्र IED तर, लोकशाहीचे शस्त्र VID: पंतप्रधान मोदी

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 23, 2019 | 11:25 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Lok Sabha 2019 : देशात आज तिसऱ्या टप्य्यात ११७ जागांसाठी मतदान होत आहे. त्यात महत्त्वाच्या जागांचा समावेश असून, अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

Narendra Modi cast his vote
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क  |  फोटो सौजन्य: ANI

अहमदाबाद (गुजरात) : लोकसभा निवडणुकीत आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. यात गुजरात महाराष्ट्र, उत्तर प्रदेशातसह १५ राज्यांमध्ये मतदान पक्रिया राबवण्यात येत आहे. तिसऱ्या टप्प्यात आज, गुजरातमध्ये देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. अहमदाबादमध्ये रानिप येथे त्यांनी मतदान केले. लोकशाहीच्या या पर्वात सहभागी होण्याची संधी मिळाली, याचा मला आनंद होत आहे. कुंभ मेळ्यात स्नान करतान जो आनंद होतो. तसाच आनंद लोकशाहीमध्ये मतदान करताना होतो, असे मत पंतप्रधान मोदी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नव मतदारांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ‘नव मतदारांनी मतदान केलेच पाहिजे. सरकार स्थापन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावावी. भारतातील मतदार खूप सुजाण आहे. त्यांना दूध आणि पाणी यातील फरक स्पष्ट कळतो. दहशतवादाचे शस्त्र आयईडी आहे. तर, लोकशाहीचे शस्त्र व्हीआयडी (व्होटर आयडी – मतदान ओळखपत्र) आहे. मला खात्री आहे की व्होटर आयडी हा आयईडीपेक्षा जास्त ताकदवान आहे. त्यामुळे देशातील मतदारांनी मतदानाची ताकद ओळखावी आणि जास्तीत जास्त मतदान करावे.’ मतदान केंद्रावर पंतप्रधान मोदींसमवेत भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि त्यांचे कुटुंबियदेखील होते.

 

 

आईचे घेतले आशीर्वाद

तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी सोमवारी गुजरातमध्ये पोहोचले. त्यांनी सोमवारी रात्री गांधीनगरमध्ये राजभवनात विश्रांती घेतली. त्यानंतर त्यांनी सकाळी आपल्या आईचे आशीर्वाद घेतले. मोदी यांच्या मातोश्री हिराबाई आपला लहान मुलगा पंकज मोदी याच्यासोबत गांधीनगर जवळ रायसन गावात राहतात. आई हिराबाई यांच्या निवासस्थानी ते जवळपास २० मिनिटे होते. त्यांनी आईला शाल, मिठाई आणि नारळ भेट दिला. आईला भेटल्यानंतर त्यांनी परिसरातील नागरिकांची भेट घेतली आणि तेथील मुलांसोबत सेल्फीदेखील घेतले. त्यानंतर ते रानिप येथील शाळेत मतदानासाठी गेले.

 

 

तिसऱ्या टप्प्यात आज मतदान

लोकसभा निवडणुकीत आज तिसऱ्या टप्प्यात १५ राज्यांमध्ये ११७ जागांसाठी मतदान होत आहे. त्यात गुजरातमधील २६, केरळमधील २०, कर्नाटकमधील १४, महाराष्ट्रातील १४, ओडिशातील सहा, उत्तर प्रदेशातील १०, पश्चिम बंगालमधील ५, गोव्यातील २, आसाममधील ४, बिहारमधील पाच, छत्तीसगडमधील ७, जम्मू-काश्मीर, त्रिपुरा, दादरा नगर हवेली, दमण दीवच्या एका जागेसाठी मतदान होत आहे. या ११७ जागांवर २०१४मध्ये एनडीएला ६७, यूपीएला २४ आणि इत पक्षांना २६ जागा मिळाल्या होत्या.

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Lok Sabha 2019 : दहशतवादाचे शस्त्र IED तर, लोकशाहीचे शस्त्र VID: पंतप्रधान मोदी Description: Lok Sabha 2019 : देशात आज तिसऱ्या टप्य्यात ११७ जागांसाठी मतदान होत आहे. त्यात महत्त्वाच्या जागांचा समावेश असून, अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
Loading...
Loading...
Loading...