बी टाऊनच्या कलाकारांनी केले उत्साहात मतदान, इतरांना केले आवाहन

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 29, 2019 | 17:56 IST | Times Now

लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. या टप्प्यात मुंबईसह अनेक १७ मतदारसंघात मतदान होत आहे.

anushka sharma
अनुष्का शर्मा 

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात १७ मतदारसंघात आज मतदान होत आहे. आज राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे. मुंबईतही विविध ठिकाणी मतदान होत आहे. बॉलिवूडचे सेलिब्रेटीही यात मागे नव्हते. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी आज मतदान करत आपला हक्क बजावला. यावेळी माधुरी दीक्षित, प्रियंका चोपडा, उर्मिला मातोंडकर, कियारा अडवाणी, दीपिका पदुकोण, सलमान खान, शाहरूख खान, आर. माधवन यांनी मतदानाचे आपले कर्तव्य पूर्ण केले. 

यावेळी संपूर्ण बॉलिवूड कलाकारांनी इतरांनी मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान हा आपला हक्क असतो तो बजावलाच गेला पाहिजे. त्यामुळे मतदान हे आद्य कर्तव्य आहे. जे प्रत्येकाने बजावलेच पाहिजे. सकाळपासूनच बॉलिवूडचे कलाकार एकामागोमाग एक येत होते आणि आपला मतदानाचा हक्क बजावत होते. वरूण धवन तसेच डेविड धवन, कंगना राणावत, प्रीती झिंटा, रणबीर कपूर यांनी मतदान केल्यानंतर फोटोसाठी पोझ दिली. 

लोकसभा निवडणुकीसाठी आज राज्यात १७ मतदारसंघात मतदान होत आहे. या ठिकाणी राज्यात नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, दक्षिण मुंबई, मावळ, शिरूर आणि शिर्डी या मतदारसंघात मतदान होत आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी