VIDEO: पंतप्रधान नरेंद्र मोदींची EXCLUSIVE मुलाखत

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 20, 2019 | 07:17 IST | Times Now

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाइम्स नाऊ ला एक विशेष मुलाखत दिली. आपल्या या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी विविध प्रश्नांवर दिलखुलासपणे उत्तरे दिली. पाहा मोदींची खास मुलाखत...

PM Narendra Modi Exclusive interview with Times Now
पंतप्रधान नरेंद्र मोदींची EXCLUSIVE मुलाखत  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाइम्स नाऊ ला एक एक्सक्लुझीव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये लोकसभा निवडणुकीपासून विविध राजकीय मुद्द्यांवर नरेंद्र मोदी यांनी सडेतोड उत्तरे दिली. या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी आपल्याला कुणापासून धोका आहे आणि कुणाला आपलं चॅलेंजर मानतात याचा सुद्धा खुलासा केला. टाइम्स नाऊचे एडिटर इन चिफ राहुल शिवशंकर आणि मॅनेजिंग एडिटर नविता कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही खास मुलाखत घेतली आहे.

या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ज्यामध्ये मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञाला भाजपचे उमेदवारी, राफेल डिल, दहशतवाद, मोदी लाट, जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती यासारख्या विविध विषयांचा समावेश आहे. साध्वी प्रज्ञा यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समर्थन केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा

मोदी कुणाला चॅलेंजर मानतात?

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कुणाला आपलं चॅलेंजर मानतात या प्रश्नावर त्यांनी उत्तर देताना म्हटलं की, मी स्वत:लाच आपलं चॅलेंजर मानतो आणि यापुढे सुद्धा स्वत:लाच चॅलेंज देत राहणार. मोदींनी म्हटलं की, 'मोदी ने स्वत:ला प्रत्येकवेळी पुढे नेण्याचाा प्रयत्न केला आणि यावेळी सुद्धा मोदी-मोदीलाच चॅलेंज केलं. मी स्वत:ला चॅलेंज करत आहे की, येत्या दिवसांत ५ वर्षांत पूर्वीपेक्षा अधिक वेगाने कसा विकास करता येईल, पूर्वीपेक्षा अधिक काम कसं करता येईल. गेल्या पाच वर्षांत जगाला देशाच्या जवळ आणलं आहे आणि पुढील पाच वर्षांत जगाच्या सोबत कसं घेऊन जाणार, हे मोदींसमोर आव्हान आहे. हेच स्वीकारुन मोदी आता मोदींला चॅलेंज देत आहे'.

राहुल शिवशंकर (मुख्य संपादक, टाइम्स नाऊ): टाइम्स नाऊच्या दर्शकांसाठी वेळ दिल्याबाबत धन्यवाद. माझा प्रश्न आहे की, लोकसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यांत मतदान झालं आहे. १८५ मतदारसंघांत मतदान प्रक्रिया पार पडली. तुम्हाला असं वाटतं का की पाच वर्षे सत्तेत राहील्यावर आताही मोदी लहर आहे?

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी: दोन टप्प्यांत मतदान पार पडलं आहे. सर्वातआधी मी मतदारांचे आभार मानतो कारण, त्यांनी मोठ्या उत्साहात लोकशाहीच्या या प्रक्रियेत सहभाग घेतला. मे महिना मतदानासाठी योग्य नाहीये हे अगदी बरोबर आहे. कारण, एकिकडे विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असतात तर दुसरीकडे कडाक्याचं ऊन असतं. असे असले तरी मतदारांनी उत्साहात मतदान केलं. मी सर्वातआधी जम्मू-काश्मीरच्या नागरिकांचे आभार मानतो कारण, तेथे शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र, पश्चिम बंगालमध्ये मतदान प्रक्रियेत हाणामारीच्या घटना घडल्याने गालबोट लागलं हा एक गंभीर विषय आहे. आम्ही पाच वर्षांत जी विकास कामं केली आहेत त्याच्या आधारे जनता पुन्हा एखदा भाजपला निवडून देईल असा मला विश्वास आहे. नागरिकांना आमच्या योजनांवर पूर्ण विश्वास आहे. नागरिक खुलेपणाने आमचं समर्थन करत आहेत. निवडणूक प्रचारासाठी मी ज्या-ज्या ठिकाणी दौरा केला तेथे मतदारांनी भाजपला समर्थन दिल्याचं दिसत आहे. सध्याच्या निवडणुकांत मीडिया हे दाखवत नाहीये. मला आशा आहे की टाइम्स नाऊ हे सर्व दाखवून याचा फायदा घेईल. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर दिलखुलासपणे उत्तरे दिली पाहा मोदींची संपूर्ण मुलाखत

लोकसभा निकाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
VIDEO: पंतप्रधान नरेंद्र मोदींची EXCLUSIVE मुलाखत Description: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाइम्स नाऊ ला एक विशेष मुलाखत दिली. आपल्या या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी विविध प्रश्नांवर दिलखुलासपणे उत्तरे दिली. पाहा मोदींची खास मुलाखत...
Loading...
Loading...
Loading...