Loksabha 2019: मोदींनी त्यांच्या गुरुंचाच अपमान केला : राहुल गांधी

लोकसभा निवडणूक २०१९
Updated Apr 06, 2019 | 10:54 IST | टाइम्स नाऊ हिंदी

Loksabha 2019 : ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना लोकसभा निवडणुकीत बेदखल केल्यावरून आता काँग्रेसने भाजपला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी नरेंद मोदींवर टीका केली आहे.

narendra modi insults guru lal krishna advani said rahul gandhi
नरेंद्र मोदींनी गुरू अडवाणींचा अपमान केला : राहुल गांधींची टीका   |  फोटो सौजन्य: BCCL

चंद्रपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना लोकसभा निवडणुकीत डावलल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. ‘अडवाणींसारख्या गुरुचा पंतप्रधान मोदी यांनी अपमान केला,’ अशी टिका चंद्रपूर येथे झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी केली.  

राहुल म्हणाले, ‘भाजप हिंदू धर्म हिंदू धर्म करत असतो. पण, ज्या हिंदू धर्मात गुरु-शिष्य संबंध पवित्र मानले जातात. त्याच हिंदू धर्माची चर्चा करणाऱ्या भाजपमध्ये लालकृष्ण अडवाणी यांचा अपमान करण्यात आला आहे.’ मोदींचे गुरु कोण आहेत? अडवाणी. मोदींनी त्यांना अपमानीत करून स्टेज वरून खाली उतरवले. (मोदी ने उन्हें जूता मारकर स्टेज से उतारा।) अशा शब्दांत राहुल यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले.

भाजपने अडवानी यांना गुजरातच्या गांधीनगरमधून उमेदवारी नाकारली आहे. या निवडणुकीत गांधीनगरमधून भाजप अध्यक्ष अमित शहा निवडणूक रिंगणात आहेत. एकेकाळी भाजपचे लोह पुरुष म्हणून ज्यांची ओळख होती. ज्या भाजपमध्ये अडवाणी यांचा प्रचंड दबदबा होता. त्यांना अक्षरशः बेददखल करून राजकारणातून बाजूला करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळेच काँग्रेसने देखील या मुद्द्यावरून भाजपला आणि पंतप्रधान मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

ही भारतीय संस्कृती नाही

महाराष्ट्रात चंद्रपूरमध्ये एका प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदींनी अडवाणींचा अपमान केल्याचे म्हटले आहे. मोदींनी गुरूचा अपमान केला आहे आणि गुरूचा अपमान करणे भारतीय संस्कृती नाही, असा टोलाही गांधी यांनी मोदींना लगावलाय.

अडवाणींनी मौन सोडले

दरम्यान, उमेदवारी नाकारल्यानंतर तसेच भाजपमधून बेदखल केल्यानंतरही अडवाणींनी त्यावर भाष्य केले नव्हते. मात्र, त्यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून व्यक्त होत, मौन सोडले आहे. सध्याच्या परिस्थितीत भाजपला विरोध करणारा सोशल मीडियावर देशद्रोही ठरवला जातो. पण, पक्षाने कधीही त्यांच्या विचारांशी असहमत व्यक्ती राष्ट्रविरोधी मानली नसल्याचे अडवाणी यांनी ब्लॉगमध्ये लिहिले आहे. अडवाणी यांनी भाजप विरोधात बोलणाऱ्यांवर केल्या जाणाऱ्या आरोपांना लक्ष्य केले आहे. 'नेशन फर्स्ट, पार्टी नेक्स्ट, सेल्फ लास्ट (राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतःचा विचार)' या शीर्षकाखाली त्यांनी ब्लॉग लिहिला आहे. भारतीय लोकशाहीची ओळखही विविधता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान यात असल्याचे अडवाणी यांनी म्हटले आहे. भाजपने पक्ष स्थापनेच्या काळातही आपल्याशी असहमत असणाऱ्यांना कधी शत्रू मानले नाही तर केवळ प्रतिस्पर्धी मानले होते, असेही त्यांनी ब्लॉगमध्ये नमूद केले आहे.

अडवणींनी तर भाजपचा सार सांगितला : मोदी

लालकृष्ण अडवाणींच्या ब्लॉगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्येष्ठ नेते अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये भाजपचा सार सांगितल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या व्यक्तींवर मला गर्व आहे. त्यांनी पक्ष मजबूत केला. आज भाजपचा कार्यकर्ता म्हणून, मी स्वतःला भाग्यवान समजतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी