५० कोटी द्या मोदींची हत्या करतो: निलंबित जवानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर, पाहा VIDEO

लोकसभा निवडणूक २०१९
Updated May 06, 2019 | 21:07 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

बीएसएफमधून निलंबित करण्यात आलेल्या तेज बहादूर याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत त्याने ५० कोटी रुपयांत पंतप्रधान मोदी यांची हत्या करण्याचं म्हटलंय. टाइम्स नाऊ ने व्हिडिओची सत्यता पडताळलेली नाहीये

Tej Bahadur Yadav sensational video
Screengrab from video  |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: बीएसएफमधून निलंबित करण्यात आलेल्या तेज बहादूर यांचा धक्का देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे.  व्हिडिओत तेज बहादूर ५० कोटी रुपयांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचं बोलत आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक लढवत आहेत. याच मतदारसंघातून तेज बहादूर याला समाजवादी पक्षाने उमेदवारी दिली होती. मात्र, निवडणूक आयोगाने तेज बहादूर याचा उमेदवारी अर्ज बाद केला होता. 'टाइम्स नाऊ'ने या व्हिडिओची सत्यता पडताळलेली नाहीये. तेज बहादूर याने कथित स्वरुपात स्वीकारलं आहे की, व्हिडिओ क्लिपमध्ये तो आहे मात्र, त्याने आरोप केला आहे की या सर्वांमागे षडयंत्र आहे. आपले मित्र असलेल्या दिल्ली पोलिसांच्या जवानांसोबत तेज बहादूर कथित स्वरुपात गप्पा मारताना व्हिडिओत दिसत आहे.

या बातचितमध्ये तेज बहादूर याने नेमकं काय म्हटलं आहे पाहूयात...

 


तेज बहादूर यादव: मला पैसे द्या आणि मी मोदींची हत्या करतो.

मित्र: तुम्ही मोदींना मारणार?

तेज बहादूर यादव: मला ५० कोटी रुपये द्या.

मित्र: ५० कोटी? तुम्हाला भारतात इतके पैसे मिळणार नाहीत. पाकिस्तान तुम्हाला ५० कोटी रुपये देऊ शकतं. 

तेज बहादूर यादव: नाही, मी असं नाही करणार, मी आपल्या देशाच्या प्रती खूपच प्रामाणिक आहे.

मित्र: मात्र मोदी तर भारताचे पंतप्रधान आहेत.

तेज बहादूर यादव: नाही, मी आपल्या देशाच्या विरोधात जाणार नाही. पैसे माझ्यासाठी महत्वाचे नाहीत. 

मित्र: मी तुला असा प्रश्न विचारला कारण तू ५० कोटी रुपयांत मोदींची हत्या करण्याचं म्हटलं होतं.

तेज बहादूर यादव: नाही, माझ्या देशासाठी माझ्या प्रामाणिकपणासाठी नाही. केवळ मला भारतीयाकडून पैसे मिळाले तरच.

१ मे रोजी निवडणूक आयोगाने तेज बहादूर याचा उमेदवारी अर्ज बाद केला. तेज बहादूर हा समाजवादी पक्षाकडून वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. याच मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.

आपला उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर तेज बहादूर याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी होण्यापूर्वी आता तेज बहादूर याचा हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तेज बहादूर याचा व्हिडिओ समोर आल्यावर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
५० कोटी द्या मोदींची हत्या करतो: निलंबित जवानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर, पाहा VIDEO Description: बीएसएफमधून निलंबित करण्यात आलेल्या तेज बहादूर याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत त्याने ५० कोटी रुपयांत पंतप्रधान मोदी यांची हत्या करण्याचं म्हटलंय. टाइम्स नाऊ ने व्हिडिओची सत्यता पडताळलेली नाहीये
Loading...
Loading...
Loading...