Maharashtra Politics 7 न्यायमूर्तींचे पीठ सोडवणार का महाराष्ट्राच्या महानाट्याचा तिढा?

ठाकरे विरूद्ध शिंदे
Updated Jan 10, 2023 | 13:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

हाराष्ट्राच्या महानाट्याचा तिढा एकदाचा निकालात काढण्यासाठी  5 च्या ऐवजी 7 न्यायमूर्तींचे पीठ स्थापन करावे अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. या महत्वाच्या मागणीच्या संदर्भात 10 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics biggest update will 7 judge bench resolve pending issue
7 न्यायमूर्तींचे पीठ सोडवणार का महाराष्ट्राच्या महानाट्याचा तिढा?   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  •  ठाकरे गटाची मागणी
  • देशाची महाराष्ट्राकडे नजर
  • सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर धुरा

Maharashtra government shocking update: मुंबईः महाराष्ट्राच्या महानाट्याचा तिढा एकदाचा निकालात काढण्यासाठी  5 च्या ऐवजी 7 न्यायमूर्तींचे पीठ स्थापन करावे अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. या महत्वाच्या मागणीच्या संदर्भात 10 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाने पाच सदस्यीय घटनापीठाबद्दल अविश्वासाचा प्रस्ताव सादर केला होता. खरंतर कोणत्याही पक्षाला खंडपीठा बद्दल अशा तऱ्हेचा प्रस्ताव मांडता येतो की नाही या बद्दल साशंकता आहे. 

अधिक वाचाः Beed Farmer Issues धुक्याच्या छायेने बुडवली स्वप्नं, शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान

देशातल्या जवळपास सगळ्या राज्यांचे महाराष्ट्राच्या राजकारणाकडे, राज्यकर्त्यांकडे आणि अर्थव्यवस्थेकडे कायम नजर असते. 2022 मध्ये घडून आलेल्या राजकीय उलथापालथीमुळे ठाकरे विरुद्ध शिंदे सरकारचा वाद सध्या सुप्रीम कोर्टात न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. 13 डिसेंबर 2022 पूर्वी झालेल्या शेवटच्या सुनावणीत खंडपीठाने दोन्ही पक्षांना काही बाबींवर एकमत करून येण्याचा आदेश दिला होता. मात्र पक्षांनी घटनापीठाने दिलेल्या निर्देशांनुसार 'कोणत्या मुद्यांवर युक्तिवाद होणार' या बद्दल एकमत घडवून आणलं नाही. पक्षांतर बंदी कायदा आणि इतर सूक्ष्म कायदेशीर बाबींचा निकाल लावण्याची जबाबदारी आतापर्यंत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील असलेल्या पाच सदस्यीय घटनापीठाकडे होती. ठाकरे सरकारच्या मागणी नुसार 5 च्या ऐवजी 7 न्यायमूर्तींचे पीठ स्थापन झाले तर अपात्रतेच्या कारवाईबाबतचा मुद्दा अखेरीस निकालात लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

अधिक वाचाः मकरसंक्रांतीनिमित्त शुभेच्छा, Wishes, Facebook आणि Whatsapp

ठाकरे सरकार जाऊन एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार खुर्चीवर बसून आता सात महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. तरीही या नव्या शासनकर्त्यांनी अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी ठोस पाऊले उचलली नाहीत. या ढिलेपणाचा धक्कादायक परिणाम होतो आहे. ज्या आमदारांच्या गटाने सत्ता मिळवण्यासाठी जुन्या शिवसेनेतून बाहेर पडून नव्या शिवसेनेचा हात धरला होता, तेच आता राज्यकर्त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उमटवत आहेत. या बंडखोर आमदारांचे वेळीच समाधान झाले नाही, तर आताचे सरकार गोत्यात येणार हे निश्चितच. इकडे आड तिकडे विहिर अशी नव्या सरकारची दयनीय स्थिती झाली आहे. एका बाजूला मंत्रिमंडळाचा विस्तार लटकला आहे तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या महानाट्याचा तिढा सुटता सुटत नाहीये. हा गुंता 7 न्यायमूर्तींचे पीठ सोडवू शकलं तर महाराष्ट्राच्या महानाट्याचा नवा अंक सुरू होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी