रहस्याचा शोध घेणारा ‘अदृश्य’ चित्रपटाचा 'अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’

'हत्या की आत्महत्या' याच रहस्य उलगडणारा कबीर लाल दिग्दर्शित ’अदृश्य' हा नवा चित्रपट 'अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. मंजरी फडणीस, पुष्कर जोग, सौरभ गोखले, उषा नाडकर्णी, अनंत जोग आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाची पत्रकार परिषद मुंबई येथे संपन्न झाली.

Updated May 24, 2023 | 03:06 PM IST

Adrushya_Poster_2 (1)

Adrushya_Poster

मुंबई : 'हत्या की आत्महत्या' याच रहस्य उलगडणारा कबीर लाल दिग्दर्शित ’अदृश्य' हा नवा चित्रपट 'अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.मंजरी फडणीस, पुष्कर जोग, सौरभ गोखले, उषा नाडकर्णी, अनंत जोग आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाची पत्रकार परिषद मुंबई येथे संपन्न झाली.
“अदृश्य” हा चित्रपट प्रोग्रेसिव्ह ब्लाइंडनेसने आजारी असणाऱ्या दोन जुळ्या बहिणी सायली आणि सानिका भोवती फिरतो. सायलीची जुळी बहिण असणारी सानिका बहिणीच्या रहस्यमय मृत्यूमागील सत्य उघड करण्याचा प्रयत्न करत असते, पण सानिकाला ब-याच विकृत वास्तवाचा सामना करावा लागतो. सायलीचा मृत्यू ही, ‘हत्या की आत्महत्या’ हा प्रश्न तिला शांत बसू देतं नाही. या शोधमोहिमेत अदृश्य ‘व्यक्ती’ की अदृश्य ‘उत्तर’ हा प्रश्न एका रोमांचक वळणावर घेऊन जातो.
मला नेहमीच सर्व भाषांमध्ये चित्रपट करायचे होते आणि अदृश्यच्या निमित्ताने मला ती संधी मिळाली, याचा मला अभिमान वाटतो, असे चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर लाल यांनी सांगितले.
PRESS MEET - Adrushya_Vankata Garapati_Kabir Lal_Pushkar Jog_Manjiri Phadanis_Shyam Malekar
अदृश्य PRESS MEET - व्यंकटा गरपती, कबीरलाल, पुष्कर जोग, मंजिरी फडणीस, श्याम मळेकर
सहकलाकार, उत्तम ठिकाण आणि उत्तम दिग्दर्शकाने बनलेला हा चित्रपट सुंदर झाला आहे, असे अभिनेत्री मंजरी फडणीसने सांगितले.
मला खूप आनंद होत आहे की, मराठीत ओटीटी प्लॅाटफॅार्मवर माझा चित्रपट प्रदर्शित होत आहे आणि हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या चांगला झाला आहे, असे अभिनेता पुष्कर जोग यांनी सांगितले.
हिंदी, मराठीसह प्रादेशिक तसेच विदेशी मनोरंजन क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण करणाऱ्या ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट’ने नुकतेच ‘अल्ट्रा झकास’ हे मराठी ओटीटी सुरु करून अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली आहे. प्रत्येक आठवड्याला नवीन आणि झकास कन्टेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार असल्याचा शब्द पाळत, ‘अल्ट्रा झकास’ , ‘अदृश्य’ या चित्रपटाच्या रुपात मराठी चित्रपट रसिकांच्या भेटीला घेऊन आले आहेत.
"उत्तम कलाकारांनी बांधलेली “ अदृश्य” ह्या चित्रपटाची रहस्यमय कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. चित्रपटातील रहस्याचं गूढ उलगडताना प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास वाटतो. शिवाय, समीक्षकांच्या कौतुकाचा वर्षाव झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. ‘अल्ट्रा झकास ’च्या रुपात जगभरातील मराठी रसिक प्रेक्षकांपर्यत ‘मराठी मनोरंजन’ पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत." अशी प्रतिक्रिया अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंटचे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited