Aditya Singh Rajput: 'गंदी बात' फेम अभिनेता आदित्य सिंह राजपूतचा मृत्यू, घरातील बाथरूममध्ये आढळला मृतदेह

स्प्लिट्सविला शो आणि वेब सीरिज गंदी बात मधून प्रसिद्धी मिळवणारा अभिनेता आदित्य सिंह राजपूत याचा मृत्यू झाला आहे. आदित्य आपल्या मुंबईतील राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आला. आदित्यच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे.

Updated May 22, 2023 | 07:08 PM IST

Aditya Singh Rajput: 'गंदी बात' फेम अभिनेता आदित्य सिंह राजपूतचा मृत्यू, घरातील बाथरूममध्ये आढळला मृतदेह
Aditya Singh Rajput found dead in mumbai: मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. टीव्ही अभिनेता आदित्य सिंह राजपूत (Actor Aditya Singh Rajput) हा आपल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आला आहे. आदित्य सिंह राजपूत हा 25 वर्षीय होता. सोमवार, 22 मे 2023 दुपारच्या सुमारास आदित्यचा राहत्या घरातील बाथरूममध्ये मृतदेह आढळून आला.
अभिनेता आदित्य हा मुंबईतील (Mumbai) पश्चिम उपनगरातील अंधेरी (Andheri) परिसरात राहत होता. इमारतीच्या 11व्या मजल्यावरील खोलीत आदित्यचा मृतदेह आढळून आला. आदित्याच्या मित्राने सर्वप्रथम त्याचा मृतदेह पाहिल्याची माहिती समोर येत आहे. आदित्य बाथरूममध्ये पडलेल्याचं पाहून त्याच्या मित्राने तात्काळ बिल्डिंगच्या वॉचमनला त्याची माहिती दिली. त्यानंतर आदित्यला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अभिनेता आदित्य सिंह राजपूत याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आदित्य सिंह राजपूत याचा मृत्यू ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसून अधिक तपास सुरू आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर आदित्य सिंह राजपूत याच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल.
टीव्ही रिअ‍ॅलिटी शो स्प्लिट्सविला मधून आदित्य सिंह राजपूत हा प्रसिद्धीच्या झोतात आला. मॉडलिंगपासून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. आदित्यने 300 हून अधिक टीव्ही जाहिरातींमध्ये काम केलं होतं. अभिनय क्षेत्रात स्ट्रगल करत त्याने आपला ब्रँण्ड पॉप कल्चर सुरू केला आणि त्याच्या अंतर्गत तो कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करत होता.

वयाच्या 17व्या वर्षापासून करिअरची सुरुवात

आदित्य सिंह राजपूत याचा जन्म दिल्लीत झाला होता. त्याचे कुटुंब उत्तराखंडचे आहे. वयाच्या 17व्या वर्षापासून आदित्यने मॉडलिंगमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. आदित्यच्या कुटुंबात आई-वडील आणि एक मोठी बहीण आहे. आदित्यच्या बहिणीचं लग्न झालं असून ती अमेरिकेत राहते.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited