Adah Sharma: द केरळ स्टोरी' पाहिल्यानंतर अदाच्या आई आणि आजीने दिल्या या प्रतिक्रिया!

The Kerala Story: '1920' चित्रपटामधून बॉलीवूड मध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री अदा शर्मा तिच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटातील फातिमा या भूमिकेमुळे चांगलीच चर्चेत आहे. तिने साकारलेल्या फातिमाच्या भूमिकेसाठी ती प्रेक्षकांची आणि समीक्षकांची बरीच वाहवा मिळवते आहे. बॉक्स ऑफीस वर रग्गड कमाई करणारा हा चित्रपट पाहिल्यानंतर तिच्या आई आणि आजीची पहिली प्रतिक्रिया काय होती हे अदा शर्माने एका मुलाखतीत सांगितले आहे.

Updated May 21, 2023 | 01:07 PM IST

Adah Sharma Mother And Grand Mother Reaction After Watching film

The Kerala Story; चित्रपट पाहिल्यानंतर अदा शर्माच्या घरच्यांनी दिली ही प्रतिक्रिया

Adah Sharma: द केरळ स्टोरी या चित्रपटातील फातिमा व्यक्तिरेखेसाठी अदा शर्मा वाहवा मिळवते आहे. तिच्या या व्यक्तिरेखेबद्दल आणि एकंदरीत सिनेमाबद्दल तिच्या आई आणि आजीला काय वाटते, तसेच त्यांची प्रतिक्रिया काय होती या बद्दल अदा शर्माने एका मुलाखतीत मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत.
अदा शर्माने एका मुलाखतीत सांगितले होते की, "या चित्रपटात तिच्यावर अनेक रेप सीन्स आहेत. हे सर्व सीन्स खूप दाहक आणि भीषण आहेत, हे दृश्य जेव्हा माझे घरचे सदस्य पाहतील तेव्हा ते कसे प्रतिसाद देतील, विशेषतः आजी आणि आई, याबद्दल ती साशंक होते." अदाने एका मुलाखतीत सांगितले की, द केरळ स्टोरीमधील बलात्काराच्या भीषण दृश्यांमुळे ती स्वतःच खूप घाबरली होती.

अदा शर्मा म्हणाली, 'माझ्या आईला आणि आजीला चित्रपटाची कथा माहीत होती. पण आजीच्या प्रतिक्रियेची मला काळजी वाटत होती. विशेषतः तिच्यावर चित्रित झालेल्या बलात्काराच्या दृश्यांमुळे मी खूप घाबरले होते. मला फक्त काळजी वाटत होती की तिने हे सर्व भीषण दृश्य पाहिल्यानंतर ती कशी प्रतिक्रिया देईल?"

आजीची प्रतिक्रिया'द केरळ स्टोरी'ची कहाणी ऐकल्यानंतर आजीची काय प्रतिकिया होती या प्रश्नावर अदा म्हणाली, 'माझा विश्वास आहे की माझी 90 वर्षांची आजी घरातील सर्वात मजबूत सदस्य आहे. चित्रपट पाहिल्यानंतर, तिने याला एक शैक्षणिक आणि माहितीपूर्ण अनुभव म्हटले आणि ती म्हणाली की तिच्या सर्व विद्यार्थ्यांनी तो पाहावा. मी तिला सांगितले की हा एक प्रौढ चित्रपट आहे. म्हणून ती म्हणाला की हा U/A चित्रपट असायला. जेणेकरून लहान मुलीही हा चित्रपट पाहू शकतील. असे झाल्यास, त्यांना जाणीव होईल आणि त्यांना सावध राहण्यास अधिक मदत मिळेल.'

अदा शर्माच्या आईची प्रतिक्रिया

अदा शर्माने सांगितले की, तिच्या आजीच्या या अनपेक्षित प्रतिक्रियेचे तिला नवलच वाटले. तसेच, आईच्या प्रतिक्रियेबद्दल बोलताना सांगितले की, तिने चित्रपट संपल्यानंतर ती पूर्णपणे सुन्न झाली होती तसेच तिच्या आईने तिच्या या कामाबद्दल अभिमान व्यक्त केला.
केरळ स्टोरीने 15 दिवसात 178.25 कोटीचा व्यवसाय केला आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर 200 कोटीच्या जवळपास पोहोचला असून या वर्षातील सुपर हिट चित्रपटांच्या यादीत हा सिनेमा गणला जात आहे. या सिनेमात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्दी इदानी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यांच्या अभिनयाची सर्वांकडून प्रशंसा होत आहे. तयार काही जण त्याच्यावर टीकाही करत आहेत.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited