Aditya Singh Rajput: अभिनेता आदित्य सिंह राजपूतचा मृत्यू नेमका कशामुळे? मैत्रिणीने म्हटलं...

अभिनेता आदित्य सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. अभिनेता आदित्य सिंह राजपूत याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत त्याच्या मैत्रिणीने एक दावा केला आहे. जाणून घ्या सविस्तर...

Updated May 23, 2023 | 09:40 PM IST

Aditya Singh Rajput: अभिनेता आदित्य सिंह राजपूतचा मृत्यू नेमका कशामुळे? मैत्रिणीने म्हटलं...
Actor Aditya Singh Rajput death case: अभिनेता आदित्य सिंह राजपूत याचा संशयास्पद मृत्यू झाला. यानंतर त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण काय यावरुन अनेक चर्चा सुरू झाल्या. काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला की, ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे आदित्यचा मृत्यू झाला. मात्र, अभिनेता आदित्यच्या मित्रांनी या रिपोर्ट्सचं खंडन केलं आहे. तर आदित्यची जवळची मैत्रिण सुबुही जोशीने आदित्यच्या मृत्यू संदर्भात एक मोठा दावा केला आहे.
32 वर्षीय आदित्य सिंह राजपूत हा 22 मे रोजी मुंबईतील आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळून आला. आदित्यच्या संशयास्पद मृत्यूने सर्वांनाच एक धक्का बसला आहे. तसेच ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे आदित्यचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू झाली. आदित्यची मैत्रिण सुबुही जोशीला या संदर्भात माहिती मिळताच तिने संताप व्यक्त केला.
सुबुही जोशीने आजतकला दिलेल्या प्रतिक्रियेत, 22 मे रोजी ज्या दिवशी आदित्यचा मृत्यू झाला त्या दिवशी नेमकं काय घडलं याची माहिती दिली. सुबुहीने सांगितले की, 22 मे रोजी आदित्यसोबत सकाळी 11 वाजता माझं बोलणं झालं. आम्ही दोघेही दिवसभरातून 10 वेळा एकमेकांसोबत बोलत होतो. आदित्यच्या बोलण्यावरुन असं अजिबात वाटत नव्हतं की, त्याला कोणताही त्रास होता किंवा तो दु:खी होता असंही सुबुहीने म्हटलं.

नेमकं काय घडलं?

सुबुहीने म्हटलं, आदित्यच्या हाऊस हेल्पने सांगितले की आदित्यला अ‍ॅसिडिटीचा त्रास होत होता. त्यानंतर तो बाथरूममध्ये गेला. तेव्हा बाथरूममध्ये काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आला. त्यानंतर हाऊस हेल्पने तात्काळ बाथरूममध्ये धाव घेतली तर आदित्य हा बाथरूममध्ये पडलेला दिसून आला. त्यानंतर हाऊस हेल्पने तात्काळ सुबुहीला फोन केला.
सुबुहीच्या मते, आदित्य सिंह राजपूतच्या घरापासून तिचं घर दोन ते तीन मिनिटांच्या अंतरावर आहे. त्यामुळे ती तात्काळ धावत आदित्यच्या घरी दाखल झाली. सुबुहीने पाहिलं की, आदित्य बाथरूममध्ये पडलेला होता. त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. आदित्य ज्या ठिकाणी पडला होता त्या ठिकाणच्या टाइल्स सुद्धा क्रॅक झाल्या होत्या.
सुबुहीने सांगितले की, आदित्य सिंह राजपूत याला कोणत्याही रुग्णालयात नेण्यात आले नाही. आदित्यला रुग्णालयात नेण्यात आल्याचं वृत्त खोटं आहे. आदित्य पडल्याची माहिती बिल्डिंगच्या खाली राहणाऱ्या एका डॉक्टरला तात्काळ बोलावण्यात आलं होतं. त्या डॉक्टरांनी ईसीजी केलं आणि आदित्यचा मृत्यू हा खाली कोसळल्याने झाल्याचं सांगितलं. त्यानंतर सुबुहीने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घटनास्थळी आल्यावर आदित्यचा मृतदेह रुग्णालयात नेला.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited