10 Most Searched Movies Google India: गुगल इंडियाची नवीन यादी, या आहेत ‘१० मोस्ट सर्चड् मूव्हिज २०१९’

झगमगाट
Updated Dec 12, 2019 | 17:36 IST | चित्राली चोगले

10 Most Searched Movies: गुगल इंडियाने दर वर्षी प्रमाणे यंदा सुद्धा सर्वाधिक शोधल्या गेलेल्या गोष्टींच्या अनेक लिस्ट जाहीर केल्यात. त्यात सगळ्यात जास्त शोले गेलेले सिनेमांमध्ये टॉप १० सिनेमे कोणते आहेत ते पाहा.

10 most searched movies of 2019 as per google india check out the list
10 Most Searched Movies Google India: गूगल इंडियाची नवीन यादी, या आहेत ‘१० मोस्ट सर्चड् मूव्हिज २०१९’  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • गुगल इंडियाची ‘१० मोस्ट सर्चड् मूव्हिज २०१९’ लिस्ट जाहीर
  • हॉलिवूड आणि बॉलिवूड सिनेमांचा समावेश
  • कबीर सिंगने टाकलं अॅवेन्जर्सला मागे

मुंबई: गुगल इंडिया दर वर्षाअखेरीस अनेक लिस्ट जाहीर करत असते. विविध कॅटेगरीच्या या लिस्टमध्ये सर्वाधिक शोध झालेल्या गोष्टींचा समावोश असतो. टॉप १० मोस्ट सर्चड् गोष्टी त्यात विविध लिस्टमध्ये नमूद केल्या जातात आणि त्या लिस्ट जाहीर होतात. नुकत्याच या लिस्ट जाहीर झाल्या असून त्यात अनेक कॅटेगरीज आहेत. २०१९ हे वर्ष बॉक्स ऑफिससाठी कमाल गेलं. अनेक मोठे रिलीज या वर्षी पहायला मिळाले. त्यामुळे गुगलच्या या लिस्टमध्ये ‘१० मोस्ट सर्चड् मूव्हिज २०१९’ सुद्धा आहेत आणि त्यामध्ये कबीर सिंगने मात्र बाजी मारली आहे. बॉक्स ऑफिसवरचे आकडे जाऊद्या पण या गूगलच्या यादीत मात्र कबीर सिंगने हॉलिवूडच्या अवेन्जर्सला सुद्धा मागे टाकलं आहे. चला या लिस्टवर एक नजर टाकूयात.

 

१. कबीर सिंग (२१ जून २०१९)

 

 

या ‘१० मोस्ट सर्चड् मूव्हिज २०१९’च्या पहिल्या नंबरवर आहे शाहीद कपूरचा कबीर सिंग. अनेक कॉन्ट्रोवर्सिजमध्ये अडकलेला हा सिनेमा तितकाच पसंतीस देखील उतरला. अर्जुन रेड्डी या साऊथच्या सिनेमाचा रिमेक असलेला कबीर सिंगने बॉक्स ऑफिसवर बरीच कमाल केली. तेवढीच कमाल या सिनेमामे सोशल मीडियावर सुद्धा केली. या सिनेमाने तर सर्चच्या बाबतीत चक्क अवेन्जर्स: एन्डगेमला सुद्धा मागे टाकलं.

 

२. अॅवेन्जर्स: एन्डगेम (२६ एप्रिल २०१९)

 

 

कबीर सिंगच्या अगदी पाठोपाठ आहे हॉलिवूडचा सुपरहिट सिनेमा अॅवेन्जर्स: एन्डगेम. या सिनेमाने एवढे रेकॉर्ड कायम केले की ते मोजण्याचा एक वेगळा रोकॉर्ड नक्कीच होईल. या सिनेमाने तर हॉलिवूडच्या कित्येक क्लासिक सिनेमांचे रेकॉर्ड तोडले. एवतार, टायटॅनिक अशा सिनेमांना मागे टाकत हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किंग ठरला. भारतात तर या सिनेमाच्या रिलीजमुळे अनेक बॉलिवूड सिनेमांचं रिलीज रखडलं.

 

३. जोकर (२ ऑक्टोबर २०१९)

 

 

जोकर हा एक आर-रेटेड सिनेमा असून सुद्धा जगात सर्वत्र सर्वाधिक कमाई करताना दिसला. वाकीन फिनिक्सची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाने भारतात सुद्धा पली जादू दाखवली. अनेक ऑनलाईन वाद, विभाजीत झालेली मतं आणि त्यात घडणारी एक अप्रतिम कलाकृती असलेला जोकर या लिस्टमध्ये नसता तरंच नवल.

 

४. कॅप्टन मार्वेल (८ मार्च २०१९)

 

 

आणि पुन्हा एकदा मार्वेल Vs डीसी हा वाद सुरुच राहीला. गेले अनेक वर्ष सुरु असलेला हा क्रिएटिव्ह वाद या वर्षी सुद्धा बॉक्स ऑफिसवर दिसला. गूगलच्या ट्रेन्ड्समध्ये कॅप्टन मार्वेल या सिनेमाने चौथं स्थान पटकवलं. मार्वेलची पहिली-वहिली स्त्री सुपरहिरो. तसं पाहिलं तर ब्लॅक विडो आहे पण तिचं फक्त इन्ट्रोडक्शन झालं आहे तिचा उगम अजून सांगितला जायचा आहे. त्यामुळे २०२० साली जव्हा ब्लॅक विडोचा सिनेमा येईल तेव्हा तो स्पष्ट होईल. तत्पूर्वी कॅप्टन मार्वेल हिच मार्वेलची पहिली स्त्री सुपरहिरो ठरली.

 

५. सुपर ३० (१२ जुलै २०१९)

 

 

कबीर सिंगनंतर गुगलच्या या लिस्टमध्ये पहिल्या ५मध्ये झळकणारा एकमात्र बॉलिवूड सिनेमा म्हणजे सुपर ३०. अनेक दिवसांच्या ब्रेकनंतर हृतिक रोशनचा एक अफलातून सिनेमा भेटीला आला. तसा सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला पण बॉक्स ऑफिसवर फार रेकॉर्ड तोड कमाई झाली नाही. त्यामुळे हा सिनेमा या लिस्टमध्ये झळकण्याचं संपूर्ण श्रेय जातं सिनेमाच्या खऱ्या हिरो आनंद कुमार यांना. गणित तज्ञ आनंद यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा भेटीला येताच आनंद यांचा शोध झापाट्याने होताना दिसला. त्यामुळेच गूगल इंडियाच्या मोस्ट सर्चड् पर्सनॅलिटीच्या लिस्टमध्ये सुद्धा आनंद चौथ्या स्थआनावर आहेत. निश्चित यातलं काहीसं श्रेय हृतिक आणि त्याच्या सिनेमातल्या लूकला सुद्धा जातं.

 

६. मिशन मंगल (१३ ऑगस्ट २०१९)

 

 

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा २०१९मधला बहुचर्चीत आणि बहुप्रतिक्षीत सिनेमा मिशन मंगल  लिस्टमध्ये सहाव्या स्थानावर आहे. भारताच्या प्रसिद्ध आणि यशस्वी ठरलेल्या मंगलवारी बद्दलचा हा सिनेमा बऱ्याच गोष्टींसाठी सर्वाधिक सोधला गेला. त्यातील कास्ट, त्याची असलेली खरी कथा आणि त्यातील भारतीय वैज्ञानीकांचा साहस आणि जिद्द. या आणि अशा अनेक गोष्टींसाठी सिनेमा खास ठरला आणि या लिस्टमध्ये आपलं स्थान पक्कं केलं.

 

७. गल्लीबॉय (१४ फेब्रुवारी २०१९)

 

 

या लिस्टमध्ये पुढचा सिनेमा आहे यंदाची भारताची अधिकृत ऑस्कर एन्ट्री असलेला गल्लीबॉय. डिवाईन आणि नाझी या प्रसिद्ध रॅपर्सच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित. रणवीर सिंग आणि आलिया भटची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमांच्या गाण्यांनी फार कमाल केली आणि त्यामुळेच जास्तकरुन हा सिनेमा या लिस्टमध्ये अवतरला. खासकरुन अपना टाइम आयेगा या गाण्याने तर एनेक रेकॉर्ड तोडले.

 

८. वॉर (२ ऑक्टोबर २०१९)

 

 

बॉलिवूडचा ग्रीक गॉड हृतिकचा अजून एक सिनेमा वॉर यंदाच्या गूगल ट्रेन्डमध्ये सर्वाधिक शोधात आठव्या स्थानावर आला आहे. हृतिक आणि टायगर श्रॉफच्या जोडीसाठी हा सिनेमाची बरीच चर्चा रंगली. दोघांच्या परफॉर्मन्सने देखील फार लक्ष वेधून घेतलं.

 

९. हाऊसफुल ४ (२५ ऑक्टोबर २०१९)

 

 

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सुद्धा पुन्हा एकदा या लिस्टमध्ये झळकला आहे ते हाऊसफुल ४च्या निमित्ताने. अक्षयच्या या सिनेमाच्या प्रमोशनने फारंच कमाल केली. सोशल मीडियावर सतत विविध स्ट्रॅटर्जी वापरून केलेला गाजावाजा सिनेमाच्या हिताचा ठरला. सिनेमाचे आधीचे तिन्ही भाग उत्तम चालले आहेत त्यामुळे या चौथ्या भागाबद्दल एक वेगळी उत्सुकता निश्चितंच होती. तसंच सिनेमाचा पहिला दिग्दर्शक साजीद खानला #MeToo मुळे रिप्लेस करुन फवाद सामजी त्याच्या जागी येणं हा सुद्धा चर्चेचा विष. ठरला होता.

 

१०. उरी: द सर्जिकल स्ट्राईक (११ जानेवारी २०१९)

 

 

या लिस्टचा शेवट या सिनेमाने झाला नसता तरंच नवल. वर्षाची सुरुवात ज्या Joshने केली तोच जोश सोशल मीडियावर प्रचंड दिसला आणि हा सिनेमा या लिस्टमध्ये १०व्या स्थानावर आला. योगायोग म्हणजे सिनेमा जानेवारीमध्ये रिलीज झाला आणि लगेचंच फेब्रुवारी आणि मार्चमध्ये फुलवामा आणि बलालकोटचे हल्ले झाले. त्यामुळे सिनेमाभवती एक वेगळी चर्चा रंगली आणि त्यामुळे सिनेमा बराच अधोरेखीत झाला.

 

 

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी