Jennifer Lopez: रणवीर सिंगनंतर या अभिनेत्रीनं केलं न्यूड फोटोशूट, 53 व्या Birthday दिवशी सौंदर्य बघून चाहते घायाळ

झगमगाट
पूजा विचारे
Updated Jul 25, 2022 | 19:12 IST

Jennifer Lopez Birthday Nude Photoshoot: पॉप गायिका आणि हॉलिवूड (Hollywood) अभिनेत्रीने देखील न्यूड फोटोशूट केलंय.

Hollywood Actress Jennifer Lopez
हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेज  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • सध्या बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या (Bollywood actor Ranveer Singh) न्यूड फोटोजची (Nude Photos) बरीच चर्चा सुरू आहे.
  • रणवीरचं न्यूड फोटोशूट चर्चेत असताना आता पॉप गायिका आणि हॉलिवूड (Hollywood) अभिनेत्रीने देखील न्यूड फोटोशूट केलंय.
  • हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेजने (Jennifer Lopez) 24 जुलै रोजी तिचा 53 वा वाढदिवस (Birthday) साजरा केला.

नवी दिल्ली: Hollywood Actress Jennifer Lopez Nude Photos: सध्या बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या (Bollywood actor Ranveer Singh) न्यूड फोटोजची (Nude Photos) बरीच चर्चा सुरू आहे. त्यातच आता एका अभिनेत्रीच्या न्यूड फोटोजची सोशल मीडियावर आग लावली आहे. रणवीरचं न्यूड फोटोशूट चर्चेत असताना आता पॉप गायिका आणि हॉलिवूड (Hollywood) अभिनेत्रीने देखील न्यूड फोटोशूट केलंय. हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लोपेजने (Jennifer Lopez)  24 जुलै रोजी तिचा 53 वा वाढदिवस (Birthday)  साजरा केला. लग्नानंतर जेनिफरचा हा पहिला वाढदिवस होता, त्यामुळे तिनं हा बर्थडे एकदम खास केला आहे. 

अलीकडेच, बेन ऍफ्लेकसोबत  (Ben Affleck)  चौथ्यांदा लग्न करून अभिनेत्री चर्चेत आली. या कपलने त्यांच्या लग्नाची आनंदाची बातमी देऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आणि चाहत्यांनाही ते खूप आवडले.

अधिक वाचा-  आता मुंबई आणि ठाणे (Thane) परिसरात स्वाईन फ्लूच्या (swine flu)  वाढत्या रुग्णांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली 

जेनिफरच्या बर्थडेचं खास सेलिब्रेशन

जेनिफरच्या Instagram अकाऊंटवर एक व्हिडिओ थंबनेल आहे. ज्यात तिचा न्यूड फोटो दिसतोय. मात्र व्हिडीओ प्ले केल्यास काळ्या रंगाच्या मोनोकनीमध्ये जेनिफरची अदाकारी पाहायला मिळतेय.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Jennifer Lopez (@jlo)

जेनिफरने तिचा वाढदिवस पती बेनसोबत साजरा केला, मात्र ती केवळ सेलिब्रेशनमुळेच नाही तर आणखी काही कारणांमुळे चर्चेत आली आहे. जेनिफर लोपेजने नुकतेच तिचा ब्यूटी प्रोडक्ट लाँच केलं आहे. या ब्रँड लॉन्चसाठी पॉप सिंगर आणि अभिनेत्री जेनिफरने न्यूड फोटोशूट करून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. या शूटचा एक व्हिडिओ जेनिफरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

जेनिफर लोपेजची स्किनकेअर लाइन जेएलओ ब्युटीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर फोटोजची सीरिज देखील शेअर केली आहे. ज्यामध्ये गायिका जेनिफर लोपेजने न्यूड पोज दिली आहे. जेनिफरने या प्रोडक्टची माहिती ही दिली आहे. जेएलओने इन्स्टा स्टोरीवर ही फोटो शेअर करण्यात आले आहेत. 

वेगवेगळ्या पोझ देत जेनिफर लोपेजने तिच्या शरीरावर लोशन लावते आणि व्हिडिओ संपताच ती हसते. हे फोटो पाहून लोकांनी प्रतिक्रिया दिली की, 'हे 53 वर्षांच्या दिवासारखे दिसते'. त्याच वेळी, आणखी एका इंस्टाग्राम यूजरनं 'जगातील सर्वात सुंदर महिला' असं म्हटलं आहे. जेनिफरचे हजारो चाहते आहेत जे तिच्या पोस्टवर कमेंट करत आहेत.

नुकतेच जेनिफरने लास वेगासमध्ये एका खासगी समारंभात बेनशी लग्न केले. या लग्नाची बातमी देताना जेनिफरने तिच्या भावना आणि तपशीलही शेअर केले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी