National Film Awards 2022 : अजय देवगण-सुर्या सर्वोत्कृष्ट अभिनेता, 'गोष्ट एका पैठणीची' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

68th National Film Awards: चित्रपटांशी संबंधित देशातील प्रतिष्ठित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर होत आहेत. ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात विविध शैलीतील आणि भाषांमधील सर्वोत्कृष्ट अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यांना गौरविण्यात येत आहे. चित्रपट निर्माते विपुल शाह यावर्षीच्या चित्रपट पुरस्कारांसाठी 10 सदस्यीय ज्युरीचे अध्यक्ष आहेत. हे चित्रपट पुरस्कार 2020 मध्ये प्रमाणित चित्रपटांना देण्यात आले आहेत.

68th National Film Awards Announced, Ajay Devgan-Suriya became Best Actor and 'Soorarai Potaru' Best Feature Film
National Film Awards 2022 : अजय देवगण-सुर्या सर्वोत्कृष्ट अभिनेता, 'गोष्ट एका पैठणीची' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
 • ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
 • यावर्षीच्या चित्रपट पुरस्कारांसाठी 10 सदस्यीय ज्युरीचे अध्यक्ष चित्रपट निर्माते विपुल शाह आहेत.
 • हे चित्रपट पुरस्कार 2020 मध्ये प्रमाणित चित्रपटांना देण्यात आले आहेत.

मुंबई : ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा शुक्रवारपासून (२२ जुलै) सुरू झाली आहे. हा कार्यक्रम भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आयोजित केला आहे. पीआयबीच्या सोशल मीडिया हँडलवर त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या वर्षी सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार 'तुलसीदास ज्युनियर' आणि सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म 'सूरराई पोतारू'ला मिळाला आहे. अजय देवगण ('तानाजी द अनसंग वॉरियर') आणि साऊथ सुपरस्टार सुर्या या दोघांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर दक्षिणेतील अभिनेत्री अपर्णा बालमुरली हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. (68th National Film Awards Announced, Ajay Devgan-Suriya became Best Actor and 'Soorarai Potaru' Best Feature Film)

अधिक वाचा : Reena Roy daughter : रीना रॉयची मुलगी सनम खानच्या सौंदर्यापुढे स्टार किड्सही फिके,फोटो झाला व्हायरल


राष्ट्रीय पुरस्कार 2022 ची संपूर्ण यादी 

 • सर्वश्रेष्ठ बंगाली फिल्म - अविजात्रिक
 • सर्वश्रेष्ठ हिंदी फिल्म - तुलसीदास जूनियर
 • सर्वश्रेष्ठ कन्नड़ फिल्म - डोलू
 • सर्वश्रेष्ठ मराठी फिल्म -  गोष्ठा एका पैठानाची
 • सर्वश्रेष्ठ तमिल फिल्म - शिवरंजनियम इन्नुम सिला पैंगुल्लमट
 • सर्वश्रेष्ठ तेलुगु फिल्म -  कलर फोटो
 • सर्वश्रेष्ठ असामी फिल्म - ब्रिज 
 • सर्वश्रेष्ठ मलायलम फिल्म - थिंकड़युवा निश्चियम
 • सर्वश्रेष्ठ हरियाणवी फिल्म - दादा लखमी
 • सर्वश्रेष्ठ तेलगू फिल्म -  जितिगे
 • बेस्ट फीचर फिल्म - सूरराई पोट्रू (तमिल फिल्म)
 • बेस्ट एक्ट्रेस - अपर्णा बालामुरली (सूरराई पोट्रू)
 • बेस्ट एक्‍टर - अजय देवगन (तान्हाजी: द अनसंग वॉरियर), सूर्या (सूरराई पोट्रू)
 • बेस्टर मेल प्लेबैक सिंगर - राहुल देशपांडे (मी वसंतराव)
 • बेस्टर फीमेल प्लेबैक सिंगर - नचम्मा  (ए.के.अयप्पन कोशियम) 
 • बेस्ट सपोर्टिंग एक्टर - बिजू मेनन  (ए.के.अयप्पन कोशियम) 
 • बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस - लक्ष्मी प्रिया चंद्रमौली (सिवरंजमनियम इन्नम सिले पेंगल्लम)
 • बेस्ट डायरेक्टर - सच्चिदानंदन के.आर (ए.के.अयप्पन कोशियम)
 • बेस्ट एक्शन एंड डायरेक्शन- राजशेखर, माफिया सासी और सुप्रीम सुंदर (ए.के.अयप्पन कोशियम)
 • बेस्ट कोरियोग्राफर- संध्या राजू (नाट्यम, तेलुगु)
 • बेस्ट लिरिक्स- मनोज मुतंशिर (साइना)
 • बेस्ट म्यूजिक डायरेक्शन- थमन एस (अला वेकेंटापुर्रामुल्लू)
 • बेस्ट कॉस्ट्यूम डिजाइनर- नचिकेत बर्वे और महेश शेर्ला (तान्हाजी द अनसंग वॉरियर)
 • बेस्ट स्क्रीनप्लो (ऑरिजनल)- शालिनी ऊषा नायर और सुधा कोंगारा (सूरराई पोट्रू

यासाठी राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो

कला, संस्कृती, चित्रपट आणि साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिला जातो. कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ते सुरू करण्यात आले.

अधिक वाचा : Shamshera Movie Review & Rating: 'शमशेरा' अ‍ॅक्शन आणि रोमान्स तडका, डाकू आणि शुद्ध सिंग यांच्यात भयंकर टक्कर 

या श्रेणींमध्ये पुरस्कार दिले जातात

श्रेण्यांबद्दल बोलायचे तर हिंदी, बंगाली, कन्नड, मराठी, मणिपुरी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढ़ी, हरियाणवी, खासी, मिसिंग, तुलू आणि पानिया भाषांसाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार दिला जातो.

अधिक वाचा : Kangana Ranaut कशी बनली इंदिरा गांधी?, Emergency च्या फर्स्ट लुकचा मेकिंग व्हिडिओ आऊट

गोष्ट एका पैठणीची’ उत्कृष्ट मराठी चित्रपट

दिग्दर्शक शांतनू रोडे यांच्या ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर गायक राहुल देशपांडे याला पार्श्वगायक पुरस्कार जाहीर झाला आहे. जून या मराठी चित्रपटातील अभिनेता सिद्धार्थ मेनन याला विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. गोदाकाठ आणि अवांछित या चित्रपटांसाठी अभिनेते किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटचा पुरस्कार विवेक दुबे यांच्या ‘फनरल’ला जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार टकाटक या चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अनिश गोसावीला जाहीर झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी