मुंबई: Sanjana's special post for Arundhati: स्टार प्रवाहावरील (Star Pravah) आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका खूप लोकप्रिय आहे. लोकप्रिय मालिकांमध्ये या मराठी मालिकेचा (Marathi Serial) समावेश आहे. हा मालिकेत असलेले सगळे कलाकार प्रेक्षकांना आवडतात. या कलाकारांचा चाहता वर्ग लाखोंमध्ये आहे. या मालिकेला भरभरून प्रेम प्रेक्षकांकडून मिळत असतं. एक गृहिणी ते स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहून आर्थिकरित्या सक्षम झालेल्या अरूंधतीचा (Arundhati) प्रवास प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत बरेच ट्विस्ट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ऑन स्क्रिन नेहमी अरूंधती आणि संजनामध्ये (Sanjana) सतत वाद होत असतात. पण ऑफ स्क्रिन चित्र थोडं वेगळं आहे. खऱ्या आयुष्यात दोघी ही एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत. आता एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ बघून नक्कीच दिसेल की या दोघी किती घट्ट मैत्रिणी आहेत.
या मालिकेत अरूंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर तर संजनाची भूमिका रूपाली भोसलेनं साकारली आहे. रूपाली नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. रूपालीनं आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ मालिकेच्या सेटवरील शूटिंग दरम्यानच्या ब्रेकचा आहे.
अधिक वाचा- उभ्या असलेल्या बसनं दिली दुसऱ्या बसला धडक, 8 ठार; 35 हून अधिक जखमी
काय आहे शेअर केलेल्या व्हिडिओत
संजना आणि अरूंधती समृद्धी बंगल्याच्या अंगणात बसलेल्या दिसत आहेत. यावेळी अरूंधती काही तरी खाताना दिसत आहे. पण दोघींमध्ये कुठल्या तरी विषयावर गप्पा सुरू आहेत. यानंतर संजना अरूंधतीकडे धावत येताना दिसते आणि अरूंधती तिला एक घास भरवते. त्यावर संजना हातवारे करत फार मस्त झाल्याचं सांगते. रूपालीनं याच व्हिडिओ शेअर केला आहे.
हा व्हिडिओ शेअर करत रूपालीनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, अनेकदा शूटींगच्या वेळी संध्याकाळी नो ब्रेक असे सांगितले जाते. मला आजपर्यंत हे असे का करतात हे आतापर्यंत कळालं नाही? अनेकदा आम्ही कलाकार शूटमध्ये असतो किंवा वाचत असतो आणि त्यामुळे काहीही खाल्लं जात नाही. त्यानंतर मात्र खाण्याची वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे मग हा असा पर्याय अवलंबला जातो.
पुढे पोस्टमध्ये तिनं लिहिलं की, लाईटींग सुरु असताना किंवा कॅमेरा सेट होत असतो तेव्हा खाऊन घ्यायचं. मग नंतर चला नाहीतर पॅकअपला उशीर होईल असा आवाज दिग्दर्शक देतो आणि खाणं अर्धवट ठेवून पुन्हा कामाला लागतो. हे असं आहे तर….मधुराणी प्रभूलकर थालीपीठ फार मस्त होते. त्यात ते तू भरवलेस म्हणून अजूनच चविष्ठ झाले. ऑन स्क्रीन कितीही वाद घातले तरी ऑफस्क्रीन असे असते बघा…
रूपालीनं शेअर केलेला हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर बरेच जण कमेंट करत आहेत. तर लाईक्सचा वर्षाव पडत आहे.